ढगाळ हवामानासह दिवस, रात्रीच्या तापमानात घट

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्रावरील मध्य भागापासून कोकणट्टीपर्यंत १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. मात्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ भागाच्या उत्तरेकडील भागावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील, त्यामुळे या भागात थंडीचे प्रमाण पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक राहील. उस्मानाबाद, गोंदिया, औरंगाबाद व नगर जिल्ह्यांत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात हवामान स्थिती याप्रमाणेच कायम राहील.

२९ डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण मध्यमच राहील. ही स्थिती १ जानेवारीपर्यंत कायम राहील. या सर्व कालावधीत हवामान ढगाळ राहील. या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मराठवाड्यात व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता २८ व २९ डिसेंबर रोजी असून, ३० व ३१ डिसेंबर रोजी तसेच १ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यात, विदर्भात प्रामुख्याने वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातही ती आग्नेयेकडून राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वातावरणावर हवामान बदलाचा प्रभाव राहील. उत्तर भारत ः उत्तर भारतात हवेचे दाब १०१८ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे किमान तापमानात घट होईल आणि थंडीचे प्रमाण अधिक राहील. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना व हिमाचल प्रदेश भागात थंडीचे प्रमाण अधिक असेल. २ जानेवारीनंतर हवेचे दाब वाढत आहेत. १ व २ जानेवारी रोजी उत्तरप्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व भारताच्या पूर्व भागात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. दक्षिण भारत ः पश्‍चिम किनारपट्टीच्या भागाच्या जवळील कर्नाटक व केरळ भागावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, त्यामुळे थंडीचे प्रमाण अत्यल्प राहील तर आंध्र, कर्नाटक, तेलंगणा भागात थंडीचे प्रमाण अल्प राहील. ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. कोकण रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे जिल्ह्यात २१ अंश व रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. हवामान अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ८१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५६ टक्के. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर धुळे जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस आणि नंदूरबार जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७९ टक्के तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ६६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. मराठवाडा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्‍यता आहे. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. उस्मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ किलोमीटर राहील; हिंगोली जिल्ह्यात ताशी ११ किलोमीटर व बीड व परभणी जिल्ह्यांत ताशी १० किलोमीटर व लातूर व नांदेड जिल्ह्यांत ताशी ९ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, तर बीड जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.

उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. परभणी व जालना जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील, तर बीड जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६० टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ पश्‍चिम विदर्भात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७५ टक्के राहील. वाऱ्याची ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील. मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ किलोमीटर राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, तर नागपूर जिल्ह्यात ते २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील व यवतमाळ जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७० टक्के राहील. मध्य विदर्भात या आठवड्यात पावसाची शक्‍यता राहील. तापमानात घट होईल. थंडीची तीव्रता वाढण्यास सुरुवात होईल. पूर्व विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ते १६ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा भंडारा जिल्ह्यात आग्नेयेकडून, गडचिरोली जिल्ह्यात ती पूर्वेकडून, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ती ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता या आठवड्यात आहे. दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता ८ ते ९ मिलिमीटर राहील. सातारा व पुणे जिल्ह्यांत अल्पशा २ ते २ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ती आग्नेयेकडून राहील. सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत तो ४ ते ९ किलोमीटर राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात तो ४ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस व किमान तापमान १४ ते १९ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८५ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६१ टक्के राहील. यापुढेही पावसाची शक्‍यता राहील. कृषी सल्ला

  • ढगाळ हवामान व ७० टक्क्यांच्या वर आर्द्रता तसेच अल्पसा पाऊस किडींच्या पैदाशीस अनुकूल ठरून कांदा पिकावर फुलकीडे, करडईवर मावा, गहू पिकावर मावा, इतर भाजीपाला पिकावर मोठ्या प्रमाणात रस शोषणाऱ्या व पाने खाणाऱ्या आळ्यांचा प्रादुर्भाव वाढेल. त्यानुसार वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
  • ठिबक सिंचन व तुषार सिंचन प्रणालीचा वापर करून पिकांना पाणी द्यावे. द्रवरूप खतांचा वापर करावा.
  • फुले, भाजीपाला काढणीस आलेला असल्यास त्याची काढणी करावी.
  • काढणी केलेला शेतमाल बाजारात विक्रीसाठी पाठवावा. उघड्यावर ठेवू नये.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व सदस्य पर्जन्य कृती दल सुकाणू समिती)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com