हवामान ढगाळ, थंड, कोरडे राहण्याची शक्यता

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे वाढलेले थंडीचे प्रमाण कायम राहील. ४ फेब्रुवारी रोजी पश्चिम भागावर १०१२ तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागांवर हवेचा दाब १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक राहील. त्यामुळे मध्यपूर्व भागात, उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्राबल्य अधिक राहील. विशेषतः नाशिक जळगाव व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सें. राहील. उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस इतके कमी राहील.

मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या आठवड्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांत दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून असल्याने किमान तापमानात फारशी घट होणार नाही. फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा थंड हवामानाचा राहील.

उत्तर भारत ः पंजाब, हरियाना, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात या सर्व राज्यांत थंडीची तीव्रता कमी होण्यास या आठवड्यापासून सुरुवात होईल. एकूण उत्तरायणाचा काळ सुरू झाल्याने यापुढे किमान तापमानात हळूवारपणे वाढ होत थंडीची तीव्रता कमी होत जाईल.  

दक्षिण भारत ः कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या भागांवर हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका राहून, बहुतांश दक्षिणेतील राज्यांमध्ये थंडीची तीव्रता कमी होईल. यापुढील काळात दुपारचे कमाल तापमान वाढेल. या आठवड्यात दक्षिण भारत थंडीचे प्रामण मध्यम स्वरूपाचे राहील. कोकण ः

रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी, ठाणे ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६८ टक्के राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २९ टक्के राहील, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३१ ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी ८ ते १० कि.मी., दिशा ईशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक, नंदूरबार जिल्ह्यांत २७ ते २९ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १२ अंश, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्व जिल्ह्यांत ५१ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी ६ ते ७ कि.मी., दिशा नैऋत्येकडून राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ती आग्‍नेयेकडून राहील. पावसाची शक्यता नाही. मराठवाडा ः नांदेड जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, परभणीमध्ये १३ अंश, तर औरंगाबाद जिल्ह्यात १४ अंश, नांदेड व जालना जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. बीड व हिंगोली जिल्ह्यांत ते १७ अंश सेल्सिअस राहील व लातूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत ५२ ते ५४ टक्के राहील. हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ४४ ते ४९ टक्के राहील. बीड, परभणी, जालना व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे या जिल्ह्यात किमान तापमान घसरेल. या जिल्ह्यामध्ये हवामान थंड राहील. पश्‍चिम विदर्भ ः बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात ३१ अंश राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात ते १४ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला व वाशीम जिल्ह्यात ७० ते ८० टक्के, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ५० ते ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वाशीम व अकोला जिल्ह्यांत ५० ते ५४ टक्के राहील. अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात ४२ ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ कि.मी. व दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील. मध्य विदर्भ ः नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यांत २९ अंश, यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ७५ टक्के, यवतमाळ व बीड जिल्ह्यांत ८० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ४९ टक्के, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात ५५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ कि.मी., दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील. मध्य विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ ः चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १५ अंश, भंडारा जिल्ह्यात १६ अंश. गडचिरोली जिल्ह्यात १७ अंश, तर चंद्रपूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ कि.मी., दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील. मात्र, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. पूर्व विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता आहे. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः पुणे जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यांत ३२ अंश, सोलापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६० टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ४२ ते ४९ टक्के राहील. दुपारची आर्द्रता पुणे जिल्ह्यात ३४ टक्के राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २१ ते २५ टक्के राहील. त्यामुळे दुपारी वातावरण कोरडे राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील. कृषी सल्ला ः

  • उन्हाळी भुईमूग, भेंडी, बाजरी, तीळ, दोडका, गवार, काकडी, उन्हाळी भात इ. पिकांच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
  • जनावरांना लाळ्या खुरकूत रोगासाठी रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
  • शेवंतीची लागवड केली असल्यास सिंचनाची योग्य व्यवस्था करावी.
  • उन्हाळी हंगामात पिकांना पाण्याचा वापर करताना पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन उपयुक्त ठरते.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com