आठवडाभर चांगल्या पावसाचा अंदाज

आठवडाभर चांगल्या पावसाचा अंदाज
आठवडाभर चांगल्या पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील हवेचा दाब कमी होत असून, आठवडाभर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्‍य आहे. उत्तर भारतातही काश्मीर ते सिक्कीम या उत्तरेकडील पट्ट्यात हिमालयाच्या पायथ्यापासून १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे. त्याचप्रमाणे हिंदी महासागरात अद्याप १००८ इतका हवेचा दाब अधिक राहण्यामुळे सध्यातरी आठवडाभर नैर्ऋत्य मॉन्सून पाऊस सक्रिय राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात हा आठवडा चांगला पाऊस होईल.

समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ५० ते १०० रेखांशामध्ये आणि विषववृत्तापासून दक्षिणेस ५ अंश अक्षांशापासून ते उत्तरेकडे ८ अक्षांशापर्यंत समुद्राच्या पाण्याचे तापमान काही ठिकाणी ३०० ते ३०१ आणि ७० ते १०० रेखांशामध्ये ते ३०१ ते ३०२ केल्व्हीन्सपर्यंत वाढत अाहे. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढगनिर्मिती होऊन पाऊस होण्यास वातावरण तयार होईल. हे चिन्ह या आठवड्याच्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल आहे. पावसात अधूनमधून उघडीप आणि पाऊस अशी स्थिती राहील. ता. १६ ते १८ सप्टेंबरच्या काळात कोकणात विस्तृत स्वरूपात पाऊस चालू राहील. दक्षिण कोकणात ता. १८ रोजी सिंधुदुर्ग भागात जोराचा पाऊस होऊन काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. ता. १८, १९ व २० सप्टेंबर रोजी मुंबई भागात आणि रायगड, ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस होणे शक्‍य आहे.

मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. १७, १८, १९ व २० तारखेस विदर्भात पावसाचा जोर वाढेल. ता. २४ सप्टेंबरपर्यंत दक्षिण कोकणात पावसाचा जोर कायम राहील. ता. १६ सप्टेंबर रोजी दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. एकूणच सप्टेंबर महिन्यात होणारा पाऊस हा रब्बी पिकांसाठी निश्‍चितपणे उपयुक्त होईल. मात्र खरिपातील पिकांच्या काढणीच्या बाबतीत निश्‍चितपणे काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे नुकसान वाचेल.

कोकण कोकणात सुरुवातीच्या टप्प्यात पावसाचे प्रमाण साधारणच राहील. विस्तृत स्वरुपात पाऊस होईल. रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिदिनी १२ मिलिमीटर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिनी ९ ते १० मिलिमीटर आणि रायगड व ठाणे जिल्ह्यात प्रतिदिनी ६ मिलिमीटर पाऊस होईल. मात्र ता. १८ सप्टेंबर नंतर पावसाच्या प्रमाणात अचानक वाढ होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्‍यताही आहे. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. दक्षिण कोकणात २३ तर उत्तर कोकणात २५ अंश सेल्सिअस तापमान राहील.

रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ७५ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात काही दिवशी प्रतिदिनी ४१ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे तर नंदूरबार जिल्ह्यात आठवड्यातील काही दिवशी ३३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. नाशिक व जळगाव जिल्ह्यात काही दिवशी १४ ते १८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील.

नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. जळगाव व नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक व धुळे जिल्ह्यात किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील तर नंदूरबार जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९५ टक्के चर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७९ टक्के राहील.

मराठवाडा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण मध्यमच राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे परतीच्या मान्सूनसारखी स्थिती जाणवेल. प्रतिदिनी काही दिवशी औरंगाबाद जिल्ह्यात ८ मिलिमीटर तर हिंगोली जिल्ह्यात काही दिवशी प्रतिदिनी १८ मिलिमीटरपर्यंत पाऊस होईल. उर्वरित सर्वच जिल्ह्यात १० ते १५ मिलिमीटर काही दिवशी पाऊस होईल. हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांचे पेरणीस  उपयुक्त ठरेल. 

वाऱ्याचा ताशी वेग औरंगाबाद जिल्ह्यात १२ किलोमीटर तर उर्वरित जिल्ह्यात तो ताशी ७ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान नांदेड व बीड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस आणि इतर जिल्ह्यात २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित जिल्ह्यात ते पूर्णतः ढगाळ राहील.  

पश्‍चिम विदर्भ वाशीम व अमरावती जिल्ह्यात प्रतिदिनी १० मिलिमीटर व पावसाची शक्‍यता असून अकोला जिल्ह्यात ५ मिलिमीटर व बुलडाणा जिल्ह्यात ८ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता राहील.

वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग बुलडाणा व अकोला जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील. कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ६० टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ७० ते ७२ टक्के राहील.

मध्य विदर्भ मध्य विदर्भात पावसाचे प्रमाण अल्पसेच राहील. प्रतिदिनी ४ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ प्रतिदिनी ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात ३२ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र पुणे व सातारा जिल्ह्यात प्रतिदिनी काही दिवशी २५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. तर कोल्हापूर व नगर जिल्ह्यात काही दिवशी १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. सांगली जिल्ह्यात प्रतिदिनी १३ मिलिमीटर तर सोलापूर जिल्ह्यात प्रतिदिनी ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून तर सोलापूर जिल्ह्यात वायव्येकडून राहील. उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते १३ किलोमीटर राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते १३ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

डॉ. रामचंद्र साबळे (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com