Agriculture story in marathi, wheat seed production by Mohan singh Sisodiya | Page 2 ||| Agrowon

गहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकता

कृषी विज्ञान केंद्र, खरगोन, मध्यप्रदेश
सोमवार, 28 जानेवारी 2019

शिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि शिकण्याच्या वृत्तीतून मध्यप्रदेशातील बैजापूर गावच्या मोहन सिंग सिसोदिया यांनी कृषी उद्योजकतेमध्ये मोठी मजल मारली आहे. अगदी शुन्यातून सुरू केलेल्या आपल्या व्यवसायाची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये पोचवली आहे. त्यामुळे खरगोन जिल्ह्यातील अग्रगण्य कृषी उद्योजकांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.

शिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि शिकण्याच्या वृत्तीतून मध्यप्रदेशातील बैजापूर गावच्या मोहन सिंग सिसोदिया यांनी कृषी उद्योजकतेमध्ये मोठी मजल मारली आहे. अगदी शुन्यातून सुरू केलेल्या आपल्या व्यवसायाची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये पोचवली आहे. त्यामुळे खरगोन जिल्ह्यातील अग्रगण्य कृषी उद्योजकांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.

मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बैजापूर येथील मोहन सिंग सिसोदिया (वय ३८ वर्षे) यांचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले आहे. १९९७ पासून आपल्या कुटुंबीयांसोबत शेतीमध्ये उतरलेल्या सिसोदिय यांनी बीजोत्पादनाच्या माध्यमातून स्वयंपूर्णता साधली आहे. २००७ मध्ये गावातील शेतकऱ्यांसह वेदश्री बीज उत्पादक सहकारी संस्थेची स्थापन करून, परिसरातील शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे पुरवण्यात येत आहे. बीजोत्पादनासाठी आवश्यक तो काटेकोरपणा न पाळता आल्याने सुरवातीला अन्य शेतकऱ्यांनी त्यातून अंग काढते घेतले. त्याचा फटका काही बसला असला तरी त्यातून सावरून आपली संस्था मोहन सिंग यांनी पुढे नेली आहे. येथे एका विस्तार कार्यक्रमाच्या निमित्ताने केव्हिकेतील तज्ज्ञांची भेट झाल्याने अडचणींवर मात करणे शक्य झाले. २०११ पासून या संस्थेला खर्गोन येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांची मदत होत आहे.

  • गहू बियाणे उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील एक महिन्याचे प्रशिक्षण सिंग यांनी पूर्ण केले. सोबत वेदश्री गटातील अकरा शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण घेण्यासाठी आग्रह धरला.
  • प्रारंभीच्या काळात पैदासकार बियाणे किंवा पायाभूत बियाणांची उपलब्धतेसारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे बियाणे प्रक्रिया केंद्रासाठी जागा आणि भांडवल उभारणीमध्येही अडचणी आल्या. मात्र, त्यातून मार्ग काढत सिसोदिया यांनी आपला बियाणे उत्पादक संस्था भरभराटीला आणली आहे.

कष्ट, धाडसातून दरमजल...

  • मध्य प्रदेश सरकारच्या वतीने आदर्श एंटरप्राईसेस म्हणून त्यांना परवाने उपलब्ध करण्यात आले.
  • सध्या इंदौर येथील आयएआरआय, ग्वाल्हेर येथील आरव्हीएसकेलव्हीव्ही, जबलपूर येथील जेएनकेव्हीव्ही आणि मध्यप्रदेश बीज फेडरेशन अशा मान्यताप्राप्त संस्थांकडून गहू, हरभरा, सोयाबीन अशा पिकांच्या पैदासकार किंवा पायाभूत बियाणे त्यांच्या संस्थेला उपलब्ध होत आहे.
  • बीज उत्पादनाचा हा व्यवसाय खर्गोन जिल्ह्यातील २५ गावामध्ये सुमारे ५०० शेतकऱ्यांपर्यंत पसरला आहे. बियाणे उत्पादनाखालील क्षेत्र २५०० एकर इतके पोचले आहे.
  • सदस्य शेतकऱ्यांकडून आलेल्या बियाणांच्या काढणीपश्चात प्रक्रियेसाठी विविध यंत्रे घेतली आहे. उदा. ग्रेडर, ग्रॅव्हिटी सेपरेटर, खडे काढणी यंत्र, बियाणे प्रक्रिया करण्याचे यंत्र, स्वयंचलित वजन करण्याचे यंत्र आणि पिशव्या भरण्याचे यंत्र इ.
  • गावामध्येच ३ हजार मे. टन क्षमतेचे बियाणे साठवणगृह बांधण्यात आले आहे. या सर्व केंद्रासाठी खासगी, सहकारी बॅंकेकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले.

असा होता प्रवास

सिसोदिया यांनी २०११ मध्ये ८६ नोंदणीकृत शेतकऱ्यांना ११०९ क्विंटल बियाणे खरेदी केले होते. आता २०१७ मध्ये ५०० नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून २२,३१४ क्विंटल बियाणे खरेदी केली. शेतकरी आणि बियाणे वितरकांकडून त्यांच्या बियाणे उत्पादक प्लॅंटची ख्याती जिल्ह्यातील सर्वोत्तम अशी सर्वत्र पसरली आहे.

  • या ख्यातीमुळेच एका प्रसिद्ध बियाणे उत्पादक कंपनीबरोबर दरवर्षी ५ हजार क्विंटल गहू बियाणे पुरवण्याचा करार २०१६ मध्ये करण्यात आला.
  • गहू बियाण्यांचा उत्तम ब्रॅण्ड तयार करण्यात सिसोदिया यशस्वी ठरले आहेत. सोबतच या संस्थेमध्ये ४६ कौशल्यवान मजुरांना रोजगारही उपलब्ध झाला.
  • सध्या सिसोदिया यांनी परिसरातील १०० गावांतील २ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या साह्याने आपला व्यवसाय प्रचंड वाढवला आहे. त्यांच्या व्यवसायाची उलाढाल ६.२६ कोटी इतकी असून, प्रतिवर्ष नफा १६.१८ लाख इतका आहे.

वर्षनिहाय बियाणे उत्पादन
 

वर्ष सदस्यांची संख्या बियाणे उत्पादन (क्विंटल) एकूण उत्पन्न (रु.) निव्वळ उत्पन्न (रु.)
२०११-२०१२ ८७ १,१०९ ३,८०,६२९ ६०,३८९
२०१२-२०१३ १४८ ३,१६४ २४,३९,४०९ ३,५९,२२६
२०१३-२०१४ २०१ ७,५३९ ४१,४३,६५८ ९,३८,६१७
२०१४-२०१५ ३३१ १३,६२५ ६९,८१,८८३ ९,५०,६४०
२०१५-२०१६ ५०० १०,८८५ १,०३,३६,०६५ ११,३१,६३१
२०१६-२०१७ ५०० २२,३१४ ६,२६,३१,३१२ १६,१८,०५९

संपर्क ः मोहन सिंग सिसोदिया, ९९७७७७११९०
(स्रोत ः कृषी विज्ञान केंद्र, खरगोन, मध्यप्रदेश) 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
मेथी वाळवण्याचे तंत्रभारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम -...
फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रेतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदेभविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार...
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेकोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या...
नत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन...कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापरपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त...
किफायतशीर बैलचलित अवजारेबैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार...
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
मातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्रमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत...
बैलचलित अवजारे ठरताहेत फायदेशीरशेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना महाराष्ट्रामध्ये शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक...
गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रेग्रामीण पातळीवर दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय...
भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेतीबहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
बहुपयोगी पॉवर टिलरपॉवर टिलरमधील रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे...
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...