शहरी लोक झाडे नाकारताहेत...

पर्यावरणासह आरोग्यासाठी झाडे महत्त्वाची असताना शहरवासीयांमध्ये झाडांना नकार देण्याची वृत्ती का आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. (स्रोत ः ख्रिस्टीन कॅर्मिचेल )
पर्यावरणासह आरोग्यासाठी झाडे महत्त्वाची असताना शहरवासीयांमध्ये झाडांना नकार देण्याची वृत्ती का आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. (स्रोत ः ख्रिस्टीन कॅर्मिचेल )

डेट्राइट शहरातील एक चतुर्थांश लोकांना शक्य असूनही आणि मोफत झाडे उपलब्ध असूनही झाडांना नकार दिला. अमेरिकेतील न्यूयॉर्क ते लॉस एन्जेलिस शहरामध्ये झाडांच्या लागवडीसाठी राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत २०११ आणि २०१४ मध्ये डेट्राइट शहरातील ७४२५ पात्र रहिवाशांशी संपर्क करण्यात आला. त्यातील १८०० पेक्षा अधिक लोकांनी (अंदाजे प्रमाण २५ टक्के) ‘झाड नको’ असे नोंदवले होते. व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधकांनी शहरातील झाडे लावण्याच्या कार्यक्रमाला असलेल्या विरोधामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही कारणे टाळून पुन्हा एकदा हरित डेट्राइट हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. सातत्याने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. नवी झाडे लावण्यासाठी सर्वत्र प्रोत्साहन दिले जात आहे. असाच एक झाडे लावण्याचा कार्यक्रम अमेरिकेतील मुख्य शहरांमध्ये (न्यूयॉर्क ते लॉस एन्जेलिस) हाती घेण्यात आला होता. २०११ आणि २०१४ मध्ये राबवलेल्या या कार्यक्रमामध्ये एकट्या डेट्राइट शहरातील पात्र रहिवाश्यांपैकी २५ टक्के लोकांनी झाडांना नकार दिला. या मागील नेमक्या कारणांचा शोध व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधिका ख्रिस्टीन कॅर्मिचेल यांनी घेतला आहे. त्यांनी मौरीन मॅकडोनौघ यांच्यासह तीन वर्षे या प्रकल्पाचा अभ्यास केला. या संशोधनाचे निष्कर्ष सोसायटी अॅण्ड नॅचरल रिसोर्सेस जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधनाविषयी माहिती देताना ख्रिस्टीन कॅर्मिचेल म्हणाल्या, की वस्तूतः पर्यावरण संरक्षणामध्ये रुची असूनही, स्थानिक प्रशासनाच्या वतीने राबवलेल्या कृती कार्यक्रमामुळे व पूर्वीच्या अनुभवामुळे लोकांनी त्याकडे पाठ फिरवली. मोकळ्या जागा व रस्त्यावरील झाडांच्या संदर्भातील मागील अनुभव चांगला नव्हता. एकट्या २०१४ मध्ये शहरामध्ये लावलेल्या झाडांपैकी २० हजार झाडे मृत किंवा धोकादायक स्थितीमध्ये असल्याचा अंदाज आहे. प्रशासनाने झाडांच्या लागवडीनंतर त्यांची निगा घेण्याच्या कामासाठी आर्थिक तरतूदच केली नव्हती. -घराजवळ झाडांच्या लागवडीबरोबरच देखभालीची जबाबदारी पडण्याचा धोका लक्षात घेता दीर्घकाळ रहिवाश्यांनी नवी झाडे लावण्यालाच नकार दिला. -जरी शासकीय जागेमध्ये झाडे लावावयाची असली, तरी त्याची योग्य निगा होत नाही, ही बाब अनेकांनी अधोरेखित केली. -झाडांची निवड करण्याचा निर्णयही लोकांना स्वतः घ्यावयाचा आहे. कोणीतरी दुसऱ्याने निवडलेली झाडे लावण्यामध्ये उत्साह कसा वाटेल, असाही प्रश्न एकाने केला. हिरवे शहर

  • शहरी भागामध्येही झाडांची लागवड आणि संवर्धन व्हावी, या उद्देशाने हरित डेट्राइट या ना नफा तत्त्वावरील प्रकल्पाला सुरुवात केली आहे. यात मागील चुका टाळण्याचा प्रयत्न असून, शहरी वातावरणामध्ये तग धरतील, अशा झाडांची निवड करण्यात येत आहे. त्यात तीन वर्षांची देखभाल अंतर्भूत आहे.
  • यात लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न केले जात असले, तरी लोकांच्या आवडी व निवडीचा पर्याय खुला ठेवण्याचा सल्ला ख्रिस्टीन कॅर्मिचेल देतात.
  • एक धडा सर्वांसाठी

  • दी ग्रिनिंग डेट्राइट च्या मोनिका ताबारेस म्हणाल्या, की शहराच्या वनविभागातून आर्थिक निधीत वाढ केली असून, लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
  • यात केवळ झाडे लावण्यासाठी लोकांना एकत्र आणले जात नाही, तर समाजासाठी आणि भविष्यासाठी झाडे कशी महत्त्वाची आहेत, यावर काम केले जात आहे.
  • डेट्राइट येथील अनुभवाचा फायदा विविध शहरात राबविण्यात येणाऱ्या ना नफा कार्यक्रमांसाठी होऊ शकतो. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com