Agriculture story in marathi wood apple processing | Page 2 ||| Agrowon

औषधी कवठाचे प्रक्रियायुक्त पदार्थ

भूषण रेंगे
सोमवार, 16 मार्च 2020

कवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या सेवनाने रोगप्रतिकार क्षमता वाढते. कवठाप्रमाणेच कवठाची पाने ही बरेचसे आजार दूर करण्यासाठी वापरली जातात. कवठामध्ये लोह, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूलद्रव्ये, प्रथिने, कार्बोदके, कॅल्शियम, जीवनसत्त्व 'क' पुरेशा प्रमाणात असतात. कवठापासून जॅम, जेली, चटणी,ज्यूस, लोणीचे असे विविध पदार्थ बनवले जातात.

कवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या सेवनाने रोगप्रतिकार क्षमता वाढते. कवठाप्रमाणेच कवठाची पाने ही बरेचसे आजार दूर करण्यासाठी वापरली जातात. कवठामध्ये लोह, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूलद्रव्ये, प्रथिने, कार्बोदके, कॅल्शियम, जीवनसत्त्व 'क' पुरेशा प्रमाणात असतात. कवठापासून जॅम, जेली, चटणी,ज्यूस, लोणीचे असे विविध पदार्थ बनवले जातात.

कवठातील पोषक घटक
कवठाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण ः जलांश ६१.१ टक्के, प्रथिने १८ टक्के, कार्बोदके ३१.८ टक्के, लोह २.६ मिली, जीवनसत्त्व 'क' २ मिली, कॅल्शियम ८५ मिली, तंतुमय पदार्थ २.९ टक्के.

कवठाचे पदार्थ
१. जॅम

साहित्य: १०० ग्रॅम पिकलेल्या कवठाचा गर, १०० ग्रॅम साखर.
सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात एक ग्लास पाणी टाकावे. त्यामध्ये कवठाचा गर घालून चांगले शिजवून घ्यावे. शिजवल्यानंतर मिश्रण गाळून घ्यावे. गाळलेला गर दुसऱ्या भांड्यात काढून ते भांडे गॅसवर ठेवावे. आणि त्यात साखर घालावी. मिश्रण सतत हलवत राहावे. मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा आणि तयार जॅम थंड होण्यास ठेवावा जॅम थंड झाला की स्वच्छ भरणीत भरून ठेवावा.

२. सरबत
साहित्य:
१०० ग्रॅम कवठाचा गर, ५० ग्रॅम गूळ, विलायची पूड.
कवठाचा गर, गूळ पातेल्यात घेऊन चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यावा. त्यात थोडीशी विलायची पूड आणि गरजेनुसार पाणी घालावे. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून गाळून घ्यावे. आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये बर्फाचा तुकडा घालू शकता. कावठाचे सरबत उन्हाळ्यामध्ये शीतपेय म्हणून वापरता येते.

३. बर्फी
साहित्य:
५० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस, ५० ग्रॅम गूळ, ५० ग्रॅम कवठाचा गर, काजू-बदामाचे तुकडे.
सर्वप्रथम कवठाचा गर मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर कढई गॅस वर ठेवून त्यात कवठाचा गर, गूळ, खोबरे एकत्र करून चांगले परतून घ्यावे. त्यात विलायची पूड काजू बदामाचे तुकडे घालावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की गॅस बंद करावा. ताटाला तुपाचा हात फिरवून त्यात हे मिश्रण पसरावे. थंड झाले की त्याच्या वड्या पाडाव्यात.
 
संपर्क ः भूषण रेंगे, ९०९७८८५५५५
(शुआट्स ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, प्रयागराज, उत्तर प्रदेश)


इतर कृषी प्रक्रिया
भाजीपाला, फळे प्रक्रियेसाठी अत्याधुनिक...भाजीपाला व फळे प्रक्रिया हा महत्त्वाचा विषय आहे....
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....
अननसापासून जॅम, स्क्वॅश, मुरंब्बाअननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात...
मोसंबी, आवळा वाढवितात रोग प्रतिकारशक्ती सध्याच्या काळात योग्य व समतोल पौष्टिक आहार...
संरक्षक पदार्थांचा प्रमाणबद्ध वापर...संरक्षक पदार्थ म्हणजे असे घटक जे पदार्थामध्ये...
आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थआंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे...
फळे व पालेभाज्यांचे प्रीकूलिंग, पॅकिंग...फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे वेळीच त्यांची...
काढणीपश्चात टिकवण क्षमतेवर परिणाम...भाजीपाला पिकांमध्ये अधिक काळ साठविण्यावर अनेक...
पदार्थाच्या मूल्यवर्धनासाठी गुलकंदाचा...गुलाब हे फूल म्हणून प्रसिद्ध आहेच त्याच बरोबरीने...
साठवणीतील धान्यावरील प्राथमिक किडीजगभरामध्ये किडीमुळे अन्नधान्याचे प्रति वर्ष...
वाढवा मटकीची पौष्टिकतामटकीचे बियाणे क्षारांमध्ये (मीठ)भिजवल्याने...
शेंगदाण्यापासून विविध पदार्थांची...पौष्टिक गुणधर्मामुळे शेंगदाण्यापासून बनविलेल्या...
औषधी कवठाचे प्रक्रियायुक्त पदार्थकवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या...
केक विक्रीतून मिळतील रोजगाराच्या संधीबेकरी पदार्थांत केक या पदार्थाला अनन्यसाधारण...
कसावापासून स्नॅक्‍सनिर्मितीअन्न सुरक्षेच्या दृष्टीने कसावा महत्त्वाचे पीक...
सोयापदार्थांची निर्मिती फायदेशीरसोयाबीनवर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता...
ताडगूळ निर्मिती प्रक्रियाताड, माड, पाम आणि खजुरीच्या झाडांपासून मिळणारा...
जास्त प्रमाणात पदार्थ सुकविण्यासाठी...टनेल टाइप सोलर ड्रायरमध्ये गरम हवेचा वापर करून...
अशी ओळखा अन्नातील भेसळ..अन्नपदार्थातील भेसळीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप...
फळबाग अन् प्रक्रिया उद्योगांवर भरजर्मनीमधील शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने दूध, मांस,...