Agriculture story in marathi wood apple processing | Agrowon

औषधी कवठाचे प्रक्रियायुक्त पदार्थ

भूषण रेंगे
सोमवार, 16 मार्च 2020

कवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या सेवनाने रोगप्रतिकार क्षमता वाढते. कवठाप्रमाणेच कवठाची पाने ही बरेचसे आजार दूर करण्यासाठी वापरली जातात. कवठामध्ये लोह, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूलद्रव्ये, प्रथिने, कार्बोदके, कॅल्शियम, जीवनसत्त्व 'क' पुरेशा प्रमाणात असतात. कवठापासून जॅम, जेली, चटणी,ज्यूस, लोणीचे असे विविध पदार्थ बनवले जातात.

कवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या सेवनाने रोगप्रतिकार क्षमता वाढते. कवठाप्रमाणेच कवठाची पाने ही बरेचसे आजार दूर करण्यासाठी वापरली जातात. कवठामध्ये लोह, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूलद्रव्ये, प्रथिने, कार्बोदके, कॅल्शियम, जीवनसत्त्व 'क' पुरेशा प्रमाणात असतात. कवठापासून जॅम, जेली, चटणी,ज्यूस, लोणीचे असे विविध पदार्थ बनवले जातात.

कवठातील पोषक घटक
कवठाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण ः जलांश ६१.१ टक्के, प्रथिने १८ टक्के, कार्बोदके ३१.८ टक्के, लोह २.६ मिली, जीवनसत्त्व 'क' २ मिली, कॅल्शियम ८५ मिली, तंतुमय पदार्थ २.९ टक्के.

कवठाचे पदार्थ
१. जॅम

साहित्य: १०० ग्रॅम पिकलेल्या कवठाचा गर, १०० ग्रॅम साखर.
सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात एक ग्लास पाणी टाकावे. त्यामध्ये कवठाचा गर घालून चांगले शिजवून घ्यावे. शिजवल्यानंतर मिश्रण गाळून घ्यावे. गाळलेला गर दुसऱ्या भांड्यात काढून ते भांडे गॅसवर ठेवावे. आणि त्यात साखर घालावी. मिश्रण सतत हलवत राहावे. मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा आणि तयार जॅम थंड होण्यास ठेवावा जॅम थंड झाला की स्वच्छ भरणीत भरून ठेवावा.

२. सरबत
साहित्य:
१०० ग्रॅम कवठाचा गर, ५० ग्रॅम गूळ, विलायची पूड.
कवठाचा गर, गूळ पातेल्यात घेऊन चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यावा. त्यात थोडीशी विलायची पूड आणि गरजेनुसार पाणी घालावे. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून गाळून घ्यावे. आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये बर्फाचा तुकडा घालू शकता. कावठाचे सरबत उन्हाळ्यामध्ये शीतपेय म्हणून वापरता येते.

३. बर्फी
साहित्य:
५० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस, ५० ग्रॅम गूळ, ५० ग्रॅम कवठाचा गर, काजू-बदामाचे तुकडे.
सर्वप्रथम कवठाचा गर मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर कढई गॅस वर ठेवून त्यात कवठाचा गर, गूळ, खोबरे एकत्र करून चांगले परतून घ्यावे. त्यात विलायची पूड काजू बदामाचे तुकडे घालावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की गॅस बंद करावा. ताटाला तुपाचा हात फिरवून त्यात हे मिश्रण पसरावे. थंड झाले की त्याच्या वड्या पाडाव्यात.
 
संपर्क ः भूषण रेंगे, ९०९७८८५५५५
(शुआट्स ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, प्रयागराज, उत्तर प्रदेश)


इतर कृषी प्रक्रिया
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...