द्राक्ष, पेरूतून प्रगतीकडे कृषी पदविकाधारकाची वाटचाल

ताडसौंदणे (जि. सोलापूर) येथीलयुवा शेतकरी विष्णू चौधरी यांनीआपल्या भागातील हवामान, पाणी व मजूरीसमस्या या बाबी लक्षात घेऊन त्यांनी द्राक्ष आणि पेरू या दोन फळपिकांची निवड केली.दोन्ही फळांची गुणवत्ता आणि उत्पादकता या वाढीवर भर देताना प्रयोगशीलताही जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे
द्राक्षबागेत फवारणी करताना विष्णू चौधरी
द्राक्षबागेत फवारणी करताना विष्णू चौधरी

कृषी पदविका घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर करीत ताडसौंदणे (जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी विष्णू चौधरी यांनी शेतीत प्रगती करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या भागातील हवामान, पाणी व मजूरीसमस्या या बाबी लक्षात घेऊन त्यांनी द्राक्ष आणि पेरू या दोन फळपिकांची निवड केली. दोन्ही फळांची गुणवत्ता आणि उत्पादकता या वाढीवर भर देताना प्रयोगशीलताही जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.   सोलापूर जिल्ह्यात बार्शी-भूम मार्गावर बार्शीपासून अवघ्या पाच किलोमीटरवर ताडसौंदणे गाव आहे. येथील विष्णू चौधरी यांची वडिलोपार्जित साडेआठ एकर शेती आहे. त्यांचे वडील बार्शी बाजार समितीत हमाली करीत शेती कसत आले. ज्वारी, गहू, तूर अशा पारंपरिक पिकांच्या पुढे शेतीत फारसे काहीच होत नव्हते. विष्णू यांनी २००७ च्या दरम्यान कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. घरच्याच शेतीत आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचे ठरवून त्यादृष्टीने पीक पद्धती बदलण्यास सुरुवात केली. आपल्या भागातील हवामान, पाणी, मजूरबळ आदींचा विचार करून त्यांनी फळबागांमध्येच नवीन काही तरी करण्याचा विचार केला. त्यातूनच २०१० मध्ये द्राक्षशेतीचा निर्णय घेतला. आई-वडील, लहान भाऊ परशुराम या सर्वांनी त्यांच्या या विचारांना पाठिंबा दिला. द्राक्षाची शेती सन २०१० मध्ये एक एकर माणिकचमन वाणापासून द्राक्षशेतीला सुरुवात झाली. पुढे २०१५ मध्ये एक एकर आरके आणि २०१९ मध्ये एसएस वाण एक एकर असे तीन एकर क्षेत्र वाढवले. क्षेत्र वाढवताना एकाच वाणावर विसंबून न बसता बाजारपेठेत असणारी मागणी, गुणवत्ता यांचा अभ्यास केला. दहा वर्षांत तयार झालेल्या या अनुभवातूनच अनुभवी द्राक्ष उत्पादक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख तयार झाली आहे. पेरूचा प्रयोग तुलनेने कमी देखभाल व खर्चाचे पीक म्हणून पेरु लागवडीचा विचार केला. त्यानुसार काही ठिकाणी बागाही पाहिल्या. सन २०१५ मध्ये एक एकरवर व्हीएनआर वाणाची लागवड १२ बाय ८ फूट अंतरावर केली. या पिकात सातत्य ठेवत एकरी उत्पादनवाढ साधण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. या पिकातील मुख्य व्यवस्थापन

  • मृग बहार धरला जातो.
  • एकरी सुरुवातीला साधारण ३५० झाडे होती. आता ती ३०० पर्यंत आहेत.
  • जूनमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर प्रतिझाड १० किलो शेणखत वापरले जाते.
  • त्यानंतर झाडाची पानगळ केली जाते. फांद्या, पानांची जास्त दाटी असल्यास हातानेही छाटणी केली जाते.
  • पुढे महिनाभरानंतर विरळणी होते. त्यात झाडावरील अतिरिक्त फुटी काढल्या जातात.
  • जुलैमध्ये फळांची विरळणी होते. एका फांद्यावर दोन ते तीन फळे ठेवली जातात.
  • विरळणी झाल्यानंतर १८-४६-० आणि सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत
  • साधारण अर्धा किलो प्रतिझाड बुडात टाकले जाते.
  • त्यानंतर ०-५२-३४ प्रति 7 ते 8 किलो याप्रमाणात दर पंधरवड्याला दिले जाते.
  • ऑक्टोबरमध्ये काढणीस सुरुवात होते. तेथून डिसेंबरपर्यंत फळहंगाम राहतो.
  • शेततळ्याची सोय शेतात विहीर होतीच. त्यानंतर बोअरही घेतले. मात्र पाण्याची ऐनवेळी अडचण होऊ नये शिवाय फळबागांचे क्षेत्रही सुमारे चार एकरांपर्यंत विस्तारात नेल्याने संरक्षित उपाय म्हणून शेततळे तयार केले आहे. त्याची क्षमता आठ लाख लीटरपर्यंत आहे. उन्हाळ्यात टंचाईच्या काळात त्याचा विशेष उपयोग होतो. अलीकडील काळात कीडनाशकाची फवारणी अधिक प्रभावी व काटेकोर व्हावी यासाठी ट्रॅक्टरचलित ब्लोअर घेतला आहे. विक्री व्यवस्था द्राक्षासाठी जागेवरच विक्री व्यवस्था तयार झाली आहे. व्यापारी थेट शेतात येऊन खरेदी करतात. द्राक्षाचे एकरी सरासरी १२ ते १४ टनांपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षात द्राक्षाचे दर काहीसे स्थिरच राहिले. तर पेरुलाही बऱ्यापैकी उठाव मिळाला. पेरूचे एकरी सरासरी १४ ते टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याची विक्री बार्शी बाजार समितीत केली जाते. एकरी सरासरी उत्पादन, मिळालेला प्रति किलो दर पेरू वर्ष         उत्पादन---------------दर (रू.) २०१९-    १७ टन------------------ ३५ रु. २०१८     १२ टन-------------------३२ रु. २०१७    १५ टन--------------------- ३५ रु. द्राक्ष २०२०      १५ टन -------------------३८ रू. २०१९-     १४ टन --------------------४० रू. २०१८-      १२ टन -------------------३४ रू. संपर्क- -विष्णू चौधरी-९४०५३२००५१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com