agriculture story in marathi, a young, agri diploma holder farmer is doing progress in farming through horticulture crops. | Agrowon

द्राक्ष, पेरूतून प्रगतीकडे कृषी पदविकाधारकाची वाटचाल

सुदर्शन सुतार
गुरुवार, 16 जुलै 2020

ताडसौंदणे (जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी विष्णू चौधरी यांनी आपल्या भागातील हवामान, पाणी व मजूरीसमस्या या बाबी लक्षात घेऊन त्यांनी द्राक्ष आणि पेरू या दोन फळपिकांची निवड केली. दोन्ही फळांची गुणवत्ता आणि उत्पादकता या वाढीवर भर देताना प्रयोगशीलताही जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे

कृषी पदविका घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर करीत ताडसौंदणे (जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी विष्णू चौधरी यांनी शेतीत प्रगती करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या भागातील हवामान, पाणी व मजूरीसमस्या या बाबी लक्षात घेऊन त्यांनी द्राक्ष आणि पेरू या दोन फळपिकांची निवड केली. दोन्ही फळांची गुणवत्ता आणि उत्पादकता या वाढीवर भर देताना प्रयोगशीलताही जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
 
सोलापूर जिल्ह्यात बार्शी-भूम मार्गावर बार्शीपासून अवघ्या पाच किलोमीटरवर ताडसौंदणे गाव आहे. येथील विष्णू चौधरी यांची वडिलोपार्जित साडेआठ एकर शेती आहे. त्यांचे वडील बार्शी बाजार समितीत हमाली करीत शेती कसत आले. ज्वारी, गहू, तूर अशा पारंपरिक पिकांच्या पुढे शेतीत फारसे काहीच होत नव्हते. विष्णू यांनी २००७ च्या दरम्यान कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. घरच्याच शेतीत आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचे ठरवून त्यादृष्टीने पीक पद्धती बदलण्यास सुरुवात केली. आपल्या भागातील हवामान, पाणी, मजूरबळ आदींचा विचार करून त्यांनी फळबागांमध्येच नवीन काही तरी करण्याचा विचार केला. त्यातूनच २०१० मध्ये द्राक्षशेतीचा निर्णय घेतला. आई-वडील, लहान भाऊ परशुराम या सर्वांनी त्यांच्या या विचारांना पाठिंबा दिला.

द्राक्षाची शेती
सन २०१० मध्ये एक एकर माणिकचमन वाणापासून द्राक्षशेतीला सुरुवात झाली. पुढे २०१५ मध्ये एक एकर आरके आणि २०१९ मध्ये एसएस वाण एक एकर असे तीन एकर क्षेत्र वाढवले. क्षेत्र वाढवताना एकाच वाणावर विसंबून न बसता बाजारपेठेत असणारी मागणी,
गुणवत्ता यांचा अभ्यास केला. दहा वर्षांत तयार झालेल्या या अनुभवातूनच अनुभवी द्राक्ष उत्पादक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख तयार झाली आहे.

पेरूचा प्रयोग
तुलनेने कमी देखभाल व खर्चाचे पीक म्हणून पेरु लागवडीचा विचार केला. त्यानुसार काही ठिकाणी बागाही पाहिल्या. सन २०१५ मध्ये एक एकरवर व्हीएनआर वाणाची लागवड १२ बाय ८ फूट अंतरावर केली. या पिकात सातत्य ठेवत एकरी उत्पादनवाढ साधण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.

या पिकातील मुख्य व्यवस्थापन

  • मृग बहार धरला जातो.
  • एकरी सुरुवातीला साधारण ३५० झाडे होती. आता ती ३०० पर्यंत आहेत.
  • जूनमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर प्रतिझाड १० किलो शेणखत वापरले जाते.
  • त्यानंतर झाडाची पानगळ केली जाते. फांद्या, पानांची जास्त दाटी असल्यास हातानेही छाटणी केली जाते.
  • पुढे महिनाभरानंतर विरळणी होते. त्यात झाडावरील अतिरिक्त फुटी काढल्या जातात.
  • जुलैमध्ये फळांची विरळणी होते. एका फांद्यावर दोन ते तीन फळे ठेवली जातात.
  • विरळणी झाल्यानंतर १८-४६-० आणि सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत
  • साधारण अर्धा किलो प्रतिझाड बुडात टाकले जाते.
  • त्यानंतर ०-५२-३४ प्रति 7 ते 8 किलो याप्रमाणात दर पंधरवड्याला दिले जाते.
  • ऑक्टोबरमध्ये काढणीस सुरुवात होते. तेथून डिसेंबरपर्यंत फळहंगाम राहतो.

शेततळ्याची सोय
शेतात विहीर होतीच. त्यानंतर बोअरही घेतले. मात्र पाण्याची ऐनवेळी अडचण होऊ नये शिवाय फळबागांचे क्षेत्रही सुमारे चार एकरांपर्यंत विस्तारात नेल्याने संरक्षित उपाय म्हणून शेततळे तयार केले आहे. त्याची क्षमता आठ लाख लीटरपर्यंत आहे. उन्हाळ्यात टंचाईच्या काळात त्याचा विशेष उपयोग होतो. अलीकडील काळात कीडनाशकाची फवारणी अधिक प्रभावी व काटेकोर व्हावी यासाठी ट्रॅक्टरचलित ब्लोअर घेतला आहे.

विक्री व्यवस्था
द्राक्षासाठी जागेवरच विक्री व्यवस्था तयार झाली आहे. व्यापारी थेट शेतात येऊन खरेदी करतात. द्राक्षाचे एकरी सरासरी १२ ते १४ टनांपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षात द्राक्षाचे दर काहीसे स्थिरच राहिले. तर पेरुलाही बऱ्यापैकी उठाव मिळाला. पेरूचे एकरी सरासरी १४ ते टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याची विक्री बार्शी बाजार समितीत केली जाते.

एकरी सरासरी उत्पादन, मिळालेला प्रति किलो दर

पेरू
वर्ष         उत्पादन---------------दर (रू.)
२०१९-    १७ टन------------------ ३५ रु.
२०१८     १२ टन-------------------३२ रु.
२०१७    १५ टन--------------------- ३५ रु.

द्राक्ष
२०२०      १५ टन -------------------३८ रू.
२०१९-     १४ टन --------------------४० रू.
२०१८-      १२ टन -------------------३४ रू.

संपर्क- -विष्णू चौधरी-९४०५३२००५१


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
केळी पिकात तयार केली ओळखमोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव,जि.सांगली) येथील...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
शेतकरी नियोजन- कपाशीच्या पिकाला खत...सध्या माझे कापसाचे पीक ६० दिवसांचे झाले असून...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः...प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
प्रयोगशीलतेला प्रयत्नवादाची जोड फळबाग...पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप...
बारमाही भाजीपाला शेतीतून आर्थिक बळकटीमेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...