तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात प्रावीण्य

तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात प्रावीण्य
तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात प्रावीण्य

नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या इंजिनिअर तरुणाने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन मधमाशीपालनाची व्यवसाय म्हणून निवड केली आहे. सध्या तीनशे पेट्यांचे संगोपन करताना मधासह पराग, परागीभवनासाठी पेट्या देणे आदींच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार व उत्पन्न वाढवण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे यांनी २०१५ साली मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून बीईची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. वडील बांधकाम व्यावसायिक तर भाऊ सिव्हिल इंजिनिअर असल्याने गौतमनेही नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा होती. घरची सहा एकर शेती होती. ती पाहण्याबरोबरच गौतम यांनी मधमाशीपालन व्यवसायाकडे अधिक कल दाखवला. सुरुवातीला घरच्यांचा अप्रत्यक्ष विरोध झाला. मात्र, धडपड पाहून कुटुंबाने पाठबळ दिले. सुरुवातीला भांडवल उपलब्ध करण्यासाठी मित्रपरिवाराकडून अडीच लाख रुपयांची मदत उभी करून गुंतवणूक केली. यातून ५० मधमाशी पेट्या खरेदी झाल्या. व्यवसायाची पूर्वतयारी

  • मधमाशीपालन व्यवसाय करणाऱ्या विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यातून व्यवसायाचे स्वरूप,
  • तांत्रिक व्यवस्थापन समजून घेतले.
  • सन २०१६ मध्ये केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (CBRTI) येथे प्रशिक्षण.
  • त्यानंतर नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मधमाशी बोर्ड येथेही प्रशिक्षण.
  • व्यवसायाचे स्वरूप

  • मधमाशी संगोपन - एपीस मेलिफेरा (इटालीयन)
  • सद्य:स्थितीत ३०० पेट्या
  • हंगामनिहाय कामांच्या नियोजनासह पाच कामगारांचे बळ
  • हंगामात मधमाशी पेट्यांचे स्थलांतर, मधकाढणी, परागकण संकलन, वसाहतींची निगराणी, मधमाश्यांची रोग, प्रतिबंधात्मक उपाययोजना अशी कामे प्रामुख्याने त्यांच्याकडून केली जातात.
  • फुलोऱ्यासाठी पेट्या स्थलांतर

  • सोलापूर: सूर्यफूल, बाजरी, तूर
  • नाशिक : मका, डाळिंब, शेवगा, टरबूज, खरबूज
  • पुणे- बाजरी
  • गुजरात- कच्छ- बाभूळ, तीळ, ओवा
  • कर्नाटक- विजयवाडा, विजापूर- सूर्यफूल, तूर
  • मध्यप्रदेश-मुरैना- घोडेघास
  • राजस्थान- ओवा, तुळस, मोहरी, कोथिंबीर, बाभूळ
  • उत्तरप्रदेश- मथुरा- मोहरी
  • मधसंकलन व फुलोरा हंगाम- ऑगस्ट ते मे
  • उत्तर भारतात मुख्यतः रब्बी व त्यापुढेच हंगाम मिळतो.
  • व्यवस्थापन:

  • मधमाशी वसाहती तयार करण्याआधी सर्वेक्षण करून फुलोरा उपलब्धता व पूर्वनियोजन
  • एखाद्या पेटीत मधमाश्यांचा अधिवास जास्त झाल्यास त्यांची विभागणी केली जाते
  • राणी माशीचा अधिवास पेटीत आहे याकडे विशेष लक्ष
  • वेळोवेळी वसाहतींची स्वच्छता
  • रोग पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाय. निवडक औषधांचे डोसेस
  • फुलोरा नसताना माश्या जगविण्यासाठी गरजेनुसार पर्यायी खाद्य- साखरपाणी
  • मधाचे मार्केट

  • वर्षभर सुमारे सात टन मध संकलित. ५० टक्के मधाची जागेवरच व्यापाऱ्यांकडून खरेदी
  • ‘शिवम हनी’ नावाने ब्रँड. २००, २५०, ३००, ५०० ग्रॅम व एक किलो वजनात बरण्यांमधून विक्री
  • किरकोळ स्वरूपात स्थानिक ग्राहकांसह आयुर्वेदिक डॉक्टर, व्यापारी यांच्याकडून ठोक खरेदी. नाशिक, पुणे, मुंबई येथे आगाऊ मागणी
  • फुलोऱ्यानुसार दर

  • फुलोरा – दर (रुपये)
  • तुळस- ५००
  • सूर्यफूल- ३५०
  • ओवा - ३५०
  • शिसम - ३५०
  • कोथिंबीर -३५०
  • घोडेघास -३५०
  • मोहरी - ३००
  • अन्य आर्थिक स्रोत: पेट्यांचा पुरवठा

  • शेवगा, डाळिंब, वेलवर्गीय फळभांज्याच्या परागीकरणासाठी शेतकऱ्यांकडून मधमाशी पेट्यांची मागणी असते. जिल्ह्यात सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी या तालुक्यांमध्ये प्रतिपेटी प्रति महिना १५०० रुपये दराने भाडेतत्त्वावर पेटी पुरवठा.
  • वसाहतीसह पेटी विक्री- ४५०० रु.
  • परागकण विक्री : मोहरी, सूर्यफूल, बाजरी, मका, डाळिंब आदींमधून परागकण (पोलन्स) मिळतात. ते संकलित करण्यासाठी पोलन ट्रॅप पेटीसमोर बसविले आहेत. त्यातून यंदाच सुमारे एक क्विंटलपर्यंत संकलन केले आहे. डॉक्टरांकडून खरेदी होते. त्यास एकहजार ते १२०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. हनी कोंब मेण व मधासह पोळ्याच्या स्वरूपात असलेल्या लवचिक भागाची प्रक्रिया न करता चॉकलेटच्या तुकड्याप्रमाणे काढून विक्री. २०० किलोपर्यंत उत्पादन घेतले आहे. त्यास प्रतिकिलो ५०० रुपये दर मिळतो. ‘बी व्हेनम’ अर्थात मधमाश्यांचे विषदेखील आयुर्वेदिक उपचारासाठी वापरण्यात येते. नाशिक शहरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना त्यासाठी मासिक दोनहजार रुपये दराने मधमाशी पेट्या देण्यात येतात. आशादायक उलाढाल सुरुवातीच्या वर्षांत या व्‍यवसायातून फार काही हाती लागले नाही. मात्र, दोन वर्षांपासून आता बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले आहे. मागील दोन वर्षांतील उलाढाल नऊ लाख ते बारा लाखापर्यंत पोचल्याचे गौतम सांगतात. विस्तारासाठी प्रयत्न पर्यावरणासाठी मधमाशीचा अधिवास टिकून राहणे गरजेचे आहे. त्यासाठी या व्यवसायाचे महत्त्व गौतम शेतकऱ्यांना समजावून देत असतात. शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. परागीभवनासाठी अनेक शेतकरी मधमाशीचा वापर करतात. मात्र, त्यांची हाताळणी करताना घ्यावयाची काळजी, कीडनाशक फवारणीबाबत ते सल्ले देतात. नाशिकजवळील पिंपळगाव बसवंत येथे अलीकडेच झालेल्या ‘मधुक्रांती’ महोत्सवात दैनिक ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्या हस्ते ‘बसवंत मधुक्रांती पुरस्कार २०१९’ ने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. संपर्क : गौतम डेमसे- ८३७८०८९९१२, ७८४१०८१७६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com