agriculture story in marathi, A Young Engineer farmer has started honey bee keeping business & getting success in it. | Agrowon

तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात प्रावीण्य

मुकूंद पिंगळे
मंगळवार, 21 जानेवारी 2020

नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या इंजिनिअर तरुणाने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन मधमाशीपालनाची व्यवसाय म्हणून निवड केली आहे. सध्या तीनशे पेट्यांचे संगोपन करताना मधासह पराग, परागीभवनासाठी पेट्या देणे आदींच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार व उत्पन्न वाढवण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या इंजिनिअर तरुणाने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन मधमाशीपालनाची व्यवसाय म्हणून निवड केली आहे. सध्या तीनशे पेट्यांचे संगोपन करताना मधासह पराग, परागीभवनासाठी पेट्या देणे आदींच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार व उत्पन्न वाढवण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे यांनी २०१५ साली मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून बीईची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. वडील बांधकाम व्यावसायिक तर भाऊ सिव्हिल इंजिनिअर असल्याने गौतमनेही नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा होती. घरची सहा एकर शेती होती. ती पाहण्याबरोबरच गौतम यांनी मधमाशीपालन व्यवसायाकडे अधिक कल दाखवला. सुरुवातीला घरच्यांचा अप्रत्यक्ष विरोध झाला. मात्र, धडपड पाहून कुटुंबाने पाठबळ दिले. सुरुवातीला भांडवल उपलब्ध करण्यासाठी मित्रपरिवाराकडून अडीच लाख रुपयांची मदत उभी करून गुंतवणूक केली. यातून ५० मधमाशी पेट्या खरेदी झाल्या.

व्यवसायाची पूर्वतयारी

 • मधमाशीपालन व्यवसाय करणाऱ्या विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यातून व्यवसायाचे स्वरूप,
 • तांत्रिक व्यवस्थापन समजून घेतले.
 • सन २०१६ मध्ये केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (CBRTI) येथे प्रशिक्षण.
 • त्यानंतर नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मधमाशी बोर्ड येथेही प्रशिक्षण.

व्यवसायाचे स्वरूप

 • मधमाशी संगोपन - एपीस मेलिफेरा (इटालीयन)
 • सद्य:स्थितीत ३०० पेट्या
 • हंगामनिहाय कामांच्या नियोजनासह पाच कामगारांचे बळ
 • हंगामात मधमाशी पेट्यांचे स्थलांतर, मधकाढणी, परागकण संकलन, वसाहतींची निगराणी, मधमाश्यांची रोग, प्रतिबंधात्मक उपाययोजना अशी कामे प्रामुख्याने त्यांच्याकडून केली जातात.

फुलोऱ्यासाठी पेट्या स्थलांतर

 • सोलापूर: सूर्यफूल, बाजरी, तूर
 • नाशिक : मका, डाळिंब, शेवगा, टरबूज, खरबूज
 • पुणे- बाजरी
 • गुजरात- कच्छ- बाभूळ, तीळ, ओवा
 • कर्नाटक- विजयवाडा, विजापूर- सूर्यफूल, तूर
 • मध्यप्रदेश-मुरैना- घोडेघास
 • राजस्थान- ओवा, तुळस, मोहरी, कोथिंबीर, बाभूळ
 • उत्तरप्रदेश- मथुरा- मोहरी
 • मधसंकलन व फुलोरा हंगाम- ऑगस्ट ते मे
 • उत्तर भारतात मुख्यतः रब्बी व त्यापुढेच हंगाम मिळतो.

व्यवस्थापन:

 • मधमाशी वसाहती तयार करण्याआधी सर्वेक्षण करून फुलोरा उपलब्धता व पूर्वनियोजन
 • एखाद्या पेटीत मधमाश्यांचा अधिवास जास्त झाल्यास त्यांची विभागणी केली जाते
 • राणी माशीचा अधिवास पेटीत आहे याकडे विशेष लक्ष
 • वेळोवेळी वसाहतींची स्वच्छता
 • रोग पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाय. निवडक औषधांचे डोसेस
 • फुलोरा नसताना माश्या जगविण्यासाठी गरजेनुसार पर्यायी खाद्य- साखरपाणी

मधाचे मार्केट

 • वर्षभर सुमारे सात टन मध संकलित. ५० टक्के मधाची जागेवरच व्यापाऱ्यांकडून खरेदी
 • ‘शिवम हनी’ नावाने ब्रँड. २००, २५०, ३००, ५०० ग्रॅम व एक किलो वजनात बरण्यांमधून विक्री
 • किरकोळ स्वरूपात स्थानिक ग्राहकांसह आयुर्वेदिक डॉक्टर, व्यापारी यांच्याकडून ठोक खरेदी. नाशिक, पुणे, मुंबई येथे आगाऊ मागणी

फुलोऱ्यानुसार दर

 • फुलोरा – दर (रुपये)
 • तुळस- ५००
 • सूर्यफूल- ३५०
 • ओवा - ३५०
 • शिसम - ३५०
 • कोथिंबीर -३५०
 • घोडेघास -३५०
 • मोहरी - ३००

अन्य आर्थिक स्रोत:

पेट्यांचा पुरवठा

 • शेवगा, डाळिंब, वेलवर्गीय फळभांज्याच्या परागीकरणासाठी शेतकऱ्यांकडून मधमाशी पेट्यांची मागणी असते. जिल्ह्यात सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी या तालुक्यांमध्ये प्रतिपेटी प्रति महिना १५०० रुपये दराने भाडेतत्त्वावर पेटी पुरवठा.
 • वसाहतीसह पेटी विक्री- ४५०० रु.

परागकण विक्री :
मोहरी, सूर्यफूल, बाजरी, मका, डाळिंब आदींमधून परागकण (पोलन्स) मिळतात. ते संकलित करण्यासाठी पोलन ट्रॅप पेटीसमोर बसविले आहेत. त्यातून यंदाच सुमारे एक क्विंटलपर्यंत संकलन केले आहे. डॉक्टरांकडून खरेदी होते. त्यास एकहजार ते १२०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो.

हनी कोंब
मेण व मधासह पोळ्याच्या स्वरूपात असलेल्या लवचिक भागाची प्रक्रिया न करता चॉकलेटच्या तुकड्याप्रमाणे काढून विक्री. २०० किलोपर्यंत उत्पादन घेतले आहे. त्यास प्रतिकिलो ५०० रुपये दर मिळतो.

‘बी व्हेनम’ अर्थात मधमाश्यांचे विषदेखील आयुर्वेदिक उपचारासाठी वापरण्यात येते. नाशिक शहरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना त्यासाठी मासिक दोनहजार रुपये दराने मधमाशी पेट्या देण्यात येतात.

आशादायक उलाढाल
सुरुवातीच्या वर्षांत या व्‍यवसायातून फार काही हाती लागले नाही. मात्र, दोन वर्षांपासून
आता बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले आहे. मागील दोन वर्षांतील उलाढाल नऊ लाख ते बारा लाखापर्यंत
पोचल्याचे गौतम सांगतात.

विस्तारासाठी प्रयत्न
पर्यावरणासाठी मधमाशीचा अधिवास टिकून राहणे गरजेचे आहे. त्यासाठी या व्यवसायाचे महत्त्व गौतम
शेतकऱ्यांना समजावून देत असतात. शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. परागीभवनासाठी अनेक शेतकरी मधमाशीचा वापर करतात. मात्र, त्यांची हाताळणी
करताना घ्यावयाची काळजी, कीडनाशक फवारणीबाबत ते सल्ले देतात. नाशिकजवळील पिंपळगाव बसवंत येथे अलीकडेच झालेल्या ‘मधुक्रांती’ महोत्सवात दैनिक ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्या हस्ते ‘बसवंत मधुक्रांती पुरस्कार २०१९’ ने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

संपर्क : गौतम डेमसे- ८३७८०८९९१२, ७८४१०८१७६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...
शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या...चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने...