agriculture story in marathi, young farmer became progressive in manadarin farming, takarkheda, amaravati | Agrowon

उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा शेतकऱ्याचा आदर्श 

विनोद इंगोले
मंगळवार, 18 जून 2019

वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश सोनटक्‍के (टाकरखेडा, जि. अमरावती) या २४ वर्षीय तरुणाने चार वर्षांतच संत्रा शेतीत दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सध्या दहा एकरांतील ११०० झाडांचे काटेकोर व्यवस्थापन तो आत्मविश्‍वासपूर्वक करतो आहे. स्वतः प्रशिक्षण, मार्गदर्शन घेत अन्य शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतो आहे. उत्पादन, दर्जा, कमी खर्च व विक्री अशा सर्व स्तरावर त्याने केलेले नियोजन अनुकरणीय असेच आहे. 
 

वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश सोनटक्‍के (टाकरखेडा, जि. अमरावती) या २४ वर्षीय तरुणाने चार वर्षांतच संत्रा शेतीत दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सध्या दहा एकरांतील ११०० झाडांचे काटेकोर व्यवस्थापन तो आत्मविश्‍वासपूर्वक करतो आहे. स्वतः प्रशिक्षण, मार्गदर्शन घेत अन्य शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतो आहे. उत्पादन, दर्जा, कमी खर्च व विक्री अशा सर्व स्तरावर त्याने केलेले नियोजन अनुकरणीय असेच आहे. 
 
अमरावती जिल्हा नागपुरी संत्रा पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील अनेक शेतकऱ्यांनी संत्रा शेतीत नाव कमावले आहे. अंजनगावसूर्जी तालुक्यातील टाकरखेडा येथील ऋषीकेश सोनटक्‍के हा युवा शेतकरीदेखील नोकरीच्या मागे न लागता आपल्या वाडवडिलांनी टिकवलेली संत्रा शेती मोठ्या उत्साहाने कसतो आहे. संशोधन संस्था, प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या भेटीगाठीतून त्याने शेतीला प्रयोगशाळेचे स्वरूप दिले आहे. 

शिकाऊ वृत्तीतून प्रशिक्षण 
वयाच्या विसाव्या वर्षीच ऋषीकेशने शेतीची सूत्रे आपल्याकडे घेतली. आज तो २४ वर्षे वयाचा आहे. तथापी सूत्रे हाती घेण्यापूर्वी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (अकोला) उद्यानविद्या विभागाकडून त्याने मार्गदर्शन घेतले. त्यात सातत्य ठेवले. दिनेश पैठणकर, अंबादास हुचे तसेच अन्य शास्त्रज्ञांचे त्यास मार्गदर्शन मिळते. 

ऋषीकेशची शेती 

 • वडिलोपार्जित शेती- १६ एकर. त्यातील दहा एकरांवर संत्रा. 
 • यात सुमारे ३०० झाडे ४२ वर्षांची, ३०० झाडे २० वर्षांची व ५०० झाडे १४ वर्षांची 
 • एकूण झाडे सुमारे ११०० 
 • ऋषीकेशचे आजोबा मनोहरराव तसेच त्यानंतर वडील दिलीपराव यांनी काही झाडे लावली. 
 • उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, तूर, कपाशी अशी हंगामी पिके. 

शेती व्यवस्थापन 

 • सुमारे ४२ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतरपिकांचे प्रयोग. 
 • यात कपाशीचे एकरी २० क्‍विंटल तर तुरीचे ८ क्‍विंटल उत्पादन. 
 • अति जुन्या झाडांमध्ये आंतरपीक पर्याय उत्पन्नाचा सक्षम पर्याय ठरतो. किरकोळ खर्चाची भरपाई यातून करता येते असे ऋषीकेश सांगतो. ४२ वर्षांपूर्वीच्या बागेची कालमर्यादा संपली. खांडण्या पडल्याने ५०० झाडे असलेल्या या बागेत आता केवळ ३०० झाडे शिल्लक आहेत. त्यामुळे आंतरपीक घेणे शक्‍य होते. या बागेत आंबिया आणि मृग असे दोन्ही बहार घेतले जातात. 
 • झाडांची गरज लक्षात घेऊन शिफारसीत खते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा ठिबक आणि फवारणीव्दारे. 
 • नत्र, स्फुरद, पालाश, लोह आणि जस्त (झिंक) याची संत्रा पट्टयात कमतरता असल्याचे माती परीक्षणावरून दिसले आहे. प्रत्येकी १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम याप्रमाणे जस्त आणि लोह दिले जाते. 
 • नवीन बहार फुटण्यावेळीही जमीन आणि फवारणीतून जस्ताचा पुरवठा. 
 • झाडापासून दोन ते तीन फुटांवर ठिबकची नळी. त्यामुळे मुळांना योग्य प्रकारेच पाणी मिळते. 
 • शेतातील वेस्टपासून बेस्ट मिळविण्यावर भर. शेतातील काडीकचरा जागेवरच कुजविला जातो. 
 • सात ते आठ एकरांत बोरू या हिरवळीच्या पिकाचा वापर. 
 • मातीतील ओलावा टिकविण्यासाठी वाळलेले गवत, पीक अवशेष, गव्हांडा आदींचे मल्चिंग वा थर. त्यामुळे जमिनीचे तापमान संतुलित राहण्यास मदत. प्रत्येक महिन्याला एका पाण्याच्या पाळीत बचत शक्‍य होते. दुष्काळी दिवसात हा पर्याय चांगला फायदेशीर ठरतो. जमिनीतील उपयुक्‍त जीवाणू सक्रीय होऊन मुळांची अन्नद्रव्ये घेण्याची क्षमता वाढीस लागते असे निरीक्षण. 
 • बागेत तण नियंत्रणसाठी व फळगळ रोखण्यासही हे नियोजन उपयुक्‍त. 
 • मार्चअखेर फायटोप्थोरा रोग येण्याची शक्‍यता सर्वाधिक. त्यासाठी मेटॅलॅक्झील अधिक मॅकोझेब 
 • हे संयुक्‍त बुरशीनाशक किंवा फोसेटील एएलची फवारणी. 
 • फायप्टोथोरासह डिप्लोडिया, अल्टरनेरीया, कोलेटोट्रिकम, ग्रिनिंग यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 
 • निरीक्षणवृत्ती जपली आहे. संत्रापट्टयात शेंडेमरचा प्रादुर्भाव यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसला. त्याच्या नियंत्रणासाठी कार्बेनडेझीम एक ते दीड ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी. 
 • व्यवस्थापनातील प्रत्येक टप्प्याची नोंद. दरवेळी मागील हंगामाचा आढावा. त्यामुळेच पुढील नियोजन करणे सोपे होते. 

उत्पादन, विक्री 

 • प्रतिएकरी- १५ ते १८ टन. प्रतिझाड- १०० किलो 
 • व्यापारी बागेत येऊन दर ठरवितात. त्यानुसार वजन करून पैसे दिले जातात. 
 • दर- प्रतिकिलो २०, २५ रुपये ते ३०, ३५ रुपयांपर्यंत. ग्रेडनुसार. 
 • उत्पादन खर्च- एकरी किमान ७० हजार रु. 

हजारो शेतकरी जोडले 
ऋषीकेश यांनी परिसरातील तीन शेतकऱ्यांच्या बागांही ‘लीज’ वर घेतल्या आहेत. यात ६०- ४० गुणोत्तराप्रमाणे नफ्याचे विभाजन होते. विदर्भातील सर्व संत्रा उत्पादकांना एकत्र आणण्यासाठी तसेच सर्वांना शास्त्रशुध्द व्यवस्थापन, फळांचा दर्जा, मार्केटिंग आदी माहितीची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने "नागपुरी संत्रा' या नावाने ऋषीकेशने पाच व्हॉटस ॲप ग्रुप तयार केले आहेत. सन २०१२ पासून एक हजारांवर संत्रा उत्पादक या माध्यमातून जुळले आहेत. राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेतील तज्ज्ञांचाही यात समावेश 
आहे. त्यातून व्यापक बदल घडत आहे. 

मिळविले साडेसात लाख रुपये 
विहिगाव येथील एका शेतकऱ्याने परवडत नसल्याचे सांगत बाग तोडण्याची तयारी चालविली होती. त्याने ऋषीकेशची बाग पाहिली. त्यानुसार आपल्या बागेत ४०० झाडांचे व्यवस्थापन केले. त्यातून मिळालेल्या दर्जेदार उत्पादनातून तब्बल सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यास हा शेतकरी यशस्वी झाला. 
अशाप्रकारे फायदेशीर शेती व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यावर ऋषीकेशचा भर असतो. 

सामूहिक वापर संस्था 
ऋषीकेश म्हणाला, की पाण्यासाठी चार बोअर्स आहेत. परिसरातील आम्ही १२५ शेतकऱ्यांनी पाणीवापर संस्था स्थापन केली. वगर्णी काढून २० किलोमीटरवर अंतरावरील धरणातून पाइपलाइन करून पाणी आणले. त्यातून पाण्याबाबत शाश्‍वतता मिळवली. 

वाचनाचा जपला छंद 
पहाटे पाच वाडता ऋषीकेशचा दिवस सुरू होतो. त्याने पुस्तकांचा छंद जोपासला आहे. पहाटेचा एक तास तो विविध पुस्तके वाचतो. यात परदेशी साहित्याबरोबरच विवेकानंद, ग्रामगीता आदींचाही समावेश आहे. 

संपर्क- ऋषीकेश सोनटक्‍के- ९६६५५९८५३७ 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...