agriculture story in marathi, a young farmer has raised his economics through commercial goat farming. | Agrowon

अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे अर्थकारण

गोपाल हागे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता मोहाडी (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील नागेश गजानन काळे या तरुणाने शेतीवर लक्ष केंद्रित केले. त्यातही अर्धबंदिस्त पध्दतीने शेळीपालन करण्यावर भर देऊन अभ्यास, प्रशिक्षणातून पाच वर्षांच्या काळात हा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवला आहे. कोरोना संकटाच्या काळात व्‍यवसायावर मंदी आली असली तरी पुढील काळात त्यातून तरून जाऊ अशी हिंम्मत काळे यांनी दाखवली आहे.  

कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता मोहाडी (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील नागेश गजानन काळे या तरुणाने शेतीवर लक्ष केंद्रित केले. त्यातही अर्धबंदिस्त पध्दतीने शेळीपालन करण्यावर भर देऊन अभ्यास, प्रशिक्षणातून पाच वर्षांच्या काळात हा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवला आहे. कोरोना संकटाच्या काळात व्‍यवसायावर मंदी आली असली तरी पुढील काळात त्यातून तरून जाऊ अशी हिंम्मत काळे यांनी दाखवली आहे.  

बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यातील मोहाडी येथील नागेश काळे यांच्या कुटूंबाची एकत्रित ११ एकर शेती आहे. त्यात फळबागा, सोयाबीन तसेच अन्य हंगामी पारंपरिक पिके घेण्यात येतात. कृषी पदवीधर झाल्यानंतर कुटूंबातील नागेश यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीवरत संपर्ण लक्ष केंद्रित केले. शेतीचे अर्थकारण उंचावण्यासाठी पूरक व्यवसाय त्यांना आवश्‍यक वाटला. त्यासाठी शेळीपालनाची निवड केली. अर्धबंदिस्त पध्दतीचा वापर करण्याचे त्यांनी ठरवले. अत्यंत डोळस पद्धतीने सन २०१४ च्या दरम्यान हा व्यवसाय सुरु करताना सुरूवातीला प्रशिक्षण घेतले. अनेक शेळीपालकांच्या भेटी घेतल्या. नफ्याबरोबरच या व्यवसायातील धोके, अडचणी समजून घेतल्या.

कमी खर्चात शेड निर्मिती
आपल्या अवतीभोवती उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करीत शेळ्यांसाठी १०० बाय ३० फूट आकाराचे शेड उभे केले. यासाठी लाकूडफाटा वापरला. शेततळ्यासाठी वापरात येणाऱ्या अस्तरीकरणाची ताडपत्री शेडसाठी आच्छादन म्हणून वापरली. वडगाव तेजन (ता. लोणार) येथील राजेश शिरसाट यांच्या राजे संभाजी गोट फार्मला वेळोवेळी भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्यास सुरूवात केली.

शेळ्यांची निवड
या व्यवसायासाठी कुटुंबाची मोलाची साथ मिळाल्याचे नागेश सांगतात. सुरुवातीला केवळ सात गावरान शेळ्या आणल्या. नंतर काही दिवसांनी १६ उस्मानाबादी शेळ्या व एक बोकड अशी खरेदी केली. आठ गाभण शेळ्यांपासून मिळालेल्या करडांचे संगोपन केले. योग्य आहार व्यवस्थापन करून करडे चार ते पाच महिन्यांचे झाल्यावर त्यांची विक्री सुरू केली. व्यवसायातील हे पहिले उत्पन्न होते. पुढे उर्वरित १२ गाभण शेळ्यापासून करड्यांचे उत्पादन झाले. पाच महिन्यांनी विक्री करून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अर्थप्राप्तीतून हळहळू आत्मविश्‍वास येण्यास सुरूवात झाली.
सन २०१६ मध्ये चाळीस बोकडांचे व्यवस्थापन व त्यांची विशेष काळजी घेतली. त्यातील बारा बोकडांची सरासरी दहा ते बारा हजार रुपयांला ईद निमित्त मार्केटमध्ये विक्री केली. आत्तापर्यंत ९७ बोकडांची विक्री केली आहे.

शेळ्यांचे व्यवस्थापन

  • सध्या सुमारे ११५ पर्यंत शेळ्यांची संख्या आहे. यात उस्मानाबादी ४२, जमनापारी १६, सिरोही दोन, बीटल दोन, आफ्रिकन बोअर पाच आदींची विविधता आहे.
  • साधारण २० गुंठे क्षेत्र चाऱ्यासाठी राखीव ठेवले आहे.
  • शेळ्यांना विविध प्रकारे झाडाझुडपांचा पाला लागतो हे लक्षात घेऊन दररोज सकाळी आठ ते दहा व दुपारी तीन ते पाच यावेळेत त्यांना रानात चरण्यासाठी मोकळे सोडण्यात येते.
  • सकाळी दहा वाजता चरून आल्यानंतर स्वच्छ पाणी व सुका चारा देण्यात येतो.
  • रवंथ व आराम करण्यासाठी भरपूर वेळ दिला जातो.
  • पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करण्यात येते.

जागेवरूनच होते विक्री
चांगले वजन व शेळ्या निरोगी ठेवल्याने नागेश यांच्याकडील शेळ्यांना चांगला उठाव असतो.
शेतकरी तसेच खरेदीदार जागेवर येऊन खरेदी करतात. स्थानिक बाजारात बोकडांची विक्री होते.
मादी शेळीला किलोला २८० रूपये तर नराला २४० रूपये दर मिळतो. महिन्याला सुमारे तीन ते चार बोकडांची विक्री होते. आत्तापर्यंतच्या एकूण कालावधीत सात ते आठ लाख रूपयांपर्यंत उत्पन्न तर महिन्याला २५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळते.

कोरोनाचे संकट
सध्या कोरोनाचे संकट असल्याने शेळ्यांची विक्री ठप्प झाली आहे. मात्र खर्चात कोणती कपात करणे शक्य नसल्याचे नागेश सांगतात. तरीही पुढील काळात हा व्यवसाय अधिक जोमाने करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

लिंबाची विकसित केली बाग
नागेश वडिलांच्या मदतीने शेतीचे व्यवस्थापनही सांभाळतात. पारंपारिक पिकांसोबतच फळबाग लागवडीकडे ते वळले आहेत. साई सरबती जातीच्या लिंबाची कलमे महात्मा फुले कृषी विद्यापीठातून आणून सुमारे आठ वर्षांपासून ती योग्य प्रकारे वाढवली आहेत. सुरुवातीला तीन वर्षे त्यामध्ये आंतरपीक म्हणून कांदा, मूग, भुईमूग, हरभरा यासारख्या पिकांची लागवड केली. कोरडे हवामान व कमी पर्जन्यमानात लिंबाच्या झाडांची वाढ चांगली होते. त्यानुसार काळी हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी चुनखडी व क्षार नसलेल्या जमिनीची निवड केली. सध्याच्या उन्हाळ्याच्या काळात लिंबांना चांगली मागणी होती. किलोला सरासरी ३०, ४० ते ६० रूपयांपर्यंत दर सुरू होते.
होटेल व्यावसायिक व रसवंतीगृहांना लिंबांची अधिक विक्री व्हायची. मात्र कोरोना संकटामुळे त्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विविध भाजीपालावर्गीय पिकांचेही उत्पादनही नागेश घेतात. त्यामध्ये काकडी, वांगी, कलिंगड, कांदा आदींचा समावेश असतो.

संपर्र्नाक- नागेश काळे- ९४०३३२२०६६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
व्यवसाय सांभाळून शेतीमध्ये वाढविली...खासगी नोकरी सोडून आपला पेपर प्रॉडक्‍ट, प्लॅस्टीक...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
मका उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रावर भर  यंदा पंधरा एकर क्षेत्रावर मका लागवडीचे...
`कोरडवाहू` प्रकल्पातून मिळाली शेती,...सिंधुदुर्ग जिल्हयातील खांबाळे गावाचे चित्र...
शेती. शिक्षण, विकासकामांतून पुढारलेले...भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत...
केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...
बियाणे बदल, संतुलित खत व्यवस्थापनातून...खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या...
कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथचिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली...
शहरात फिरून विकला वीस टन कांदा,...कांदा पीक हाती आले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन झाले....
दर्जेदार डाळिंब उत्पादनाचे नियोजनडाळिंब फळ काढणी हंगाम संपल्यानंतर बागेचे पुढील...
अडीच एकरातील स्वीटकॉर्नची थेट विक्री  लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी दर पाडले....
एकीच्या बळातून थेट विक्री व्यवस्थेचा...जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील दत्तात्रय चव्हाण...
मोसंबी विक्रीसह साधला सेवाभावही...सध्या कोरोना व लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये सर्व काही...