agriculture story in marathi, Yuvraj Choudhari from Jalgaon Dist. has set round the year & commercial farming system.ing | Page 2 ||| Agrowon

बारमाही उत्पन्न देणारी व्यावसायिक शेती

गोपाल हागे
गुरुवार, 8 जुलै 2021

वनोली (जि..जळगाव) येथील युवराज चौधरी यांनी भाजीपाला, नगदी पिके व हंगामी पिके यांची पद्धतशीर सांगड घालून बारमाही उत्पन्न देणारी पध्दत तयार केली आहे. जागेवरच बाजारपेठ मिळवताना उत्पादनातील २५ टक्के वाट्याची थेट विक्री करण्याची हातोटीही त्यांनी साधली आहे.

वनोली (जि..जळगाव) येथील युवराज चौधरी यांनी भाजीपाला, नगदी पिके व हंगामी पिके यांची पद्धतशीर सांगड घालून बारमाही उत्पन्न देणारी पध्दत तयार केली आहे. जागेवरच बाजारपेठ मिळवताना उत्पादनातील २५ टक्के वाट्याची थेट विक्री करण्याची हातोटीही त्यांनी साधली आहे.

वनेली (ता. यावल, जि.. जळगाव) हे मोर नदीकाठी वसलेले गाव यावल शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर आहे. मात्र जलसाठे मुबलक नाहीत. तीनशे ते पाचशे फूट कूपनलिका खोदूनही पाण्याचे स्रोत सापडत नाहीत. गावातील युवराज बळिराम चौधरी या युवा शेतकऱ्याची सुमारे १० एकर शेती आहे. दोन कूपनलिका आहेत. पूर्वी केळी, ऊस आदी पिके होती. जलस्रोत आटले तशी शेती संकटात आली. त्या वेळेस वडील बळिराम, काका मच्छिंद्र, रूपसिंग हे शेती व्यवस्थापन सांभाळायचे. विभक्त झाल्यानंतर जलस्त्रोतांची स्थिती लक्षात घेऊन युवराज यांनी पीक पद्धती अवलंबली.

सुधारित पीकपद्धती
पूर्वी युवराज परिसरातील प्रसिद्ध कृषी कंपनीत नोकरीस होते. ते कृषी पदविकाधारक आहेत. सन २००९ पासून वडिलांचे मार्गदर्शन घेत शिक्षणाचा वापर करीत त्यांनी सुधारित पध्दतीचा वापर केला आहे. जमीन काळी कसदार तसेच पाण्याचा निचरा करणारीही आहे. वर्षभर उत्पन्न मिळत राहील अशी बारमाही उत्पन्न देणारी पीक पद्धती त्यांनी तयार केली आहे. ती पुढीलप्रमाणे.

मिरची हे मुख्य पीक. मेच्या दरम्यान लागवड होते. पुढे उन्हाळ्यापर्यंत प्लॉट सुरू असतो. जानेवारीनंतर मिरचीची आवक बाजारात कमी होते. अशावेळी किलोला ४० रुपये व त्यापुढे दर मिळतात. त्या दोन-अडीच महिन्यात चांगले पैसे होतात असे युवराज सांगतात. एकरी १५ पासून ते १८ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे.

भरीताचे वांगे अर्ध्या एकरात असते. जानेवारीनंतर काटेरी वांग्यालाही चांगले म्हणजे किलोला ४० रुपये दर मिळत असल्याने त्याच्याही लागवडीवर भर असतो. खरिपात चार एकरांत कापूस मुख्य पीक असते. त्यात चवळी, मूग आदींचे आंतरपीक किडींची जोखीम कमी करण्यासाठी घेतले जाते. कपाशीचे एकरी सात ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. फेब्रुवारीच्या दरम्यान कलिंगड असते. काढणी झाल्यानंतर काशीफळाची लागवड होते. त्यास श्रावणात चांगली मागणी असते. किलोला ८ रुपयांपासून १२ रुपये दर मिळतो. एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. दरवर्षी हळदीचेही पीक असते. एकरी १०० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळते. क्विंटलला ८५० ते एकहजार रुपये दराने विक्री होते. एकाच पिकावर अवलंबून न राहता बाजारातील मागणी, परिसरातील लागवडीची स्थिती लक्षात घेऊन पिकांची निवड व हंगाम साधले जातात. हिरव्या मिरचीला गेल्या वर्षा प्रतिकूल वातावरणाचा फटका बसला.

आठवडाभर हातविक्री
वनोली व परिसर भाजीपाला, भरीताची वांगी यांच्यासाठी ओळखला जातो. लगतच्या यावल परिसरातील फैजपूर, न्हावी, बामणोद, पाडळसे, भालोद, किनगाव तसेच भुसावळ, रावेरातील सावदा आदी आठवडी बाजार प्रसिद्ध आहेत. या सर्वच गावांतील बाजारांना जाऊन युवराज भाजीपाला हातविक्री करतात. एकूण उत्पादनातील २५ टक्के हातविक्रीवर भर असतो. त्यातून नफ्याचे प्रमाण वाढते.

न खचता हिमतीने काम
कोव्हीडमुळे वर्षभर काही आठवडी बाजार सुरळीत नव्हते. यामुळे अडचणीही आल्या. कलिंगडात सुमारे दोन ते अडीच लाख रूपये नुकसानही झाले. तरीही थेट विक्री करून ते कमी करण्याचा प्रयत्न केला. खचून न जाता हिंम्मत कायम ठेवली.

जागेवर मार्केट
बहुतांश मालाला युवराज यांनी जागेवरच मार्केट तयार केले आहे. व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. कलिंगडाची काढणी एकाच वेळी सुरू होते. ती दोन-तीन दिवसात पूर्ण होते. त्याची आठवडी बाजारात हातविक्री अधिक उत्पादनामुळे शक्य होत नाही. त्यामुळे जागेवरच विक्री होते. कापसाचीही बाजारपेठेतील दरांचा अंदाज घेऊन गावातच व्यापाऱ्याला विक्री होते. आठवडी बाजारात ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळतो. सचोटी ठेवल्याने नेहमीचे ग्राहक तयार झाले आहेत. काही ग्राहक घरी येऊनही खरेदी करतात.

जमीन सुपीकतेवर लक्ष
केळी व ऊस या एकेरी पध्दतीकडून युवराज आता बहुविध पद्धतीकडे वळले आहेत. जमीन सुपिकतेवर दहा वर्षांपासून ते लक्ष देत आहेत. पिकांचे अवशेष जमिनीत गाडतात. फेरपालटीवर व बेवड निवडण्यावर भर असतो. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर भर आहे. ठिबक व फर्टिगेशन तर आहेच.

कुटुंब राबते शेतात
युवराज, वडील बळिराम, आई इंदूबाई, पत्नी अश्‍विनी असे सर्वजण शेतात राबतात. त्यातून मजुरांवरील अवलंबित्व व खर्च त्यांनी कमी केला आहे. बैलजोडीद्वारे मशागतीपासून फवारणी, काढणीची कामे सर्वजण करतात. बाजारातही युवराज स्वतः भाजीपाला नेऊन विक्री करतात.

तज्ज्ञांच्या संपर्कात
क्षेत्राचा पुरेपूर वापर, पाण्याचे काटेकोर नियोजन करून शेती फुलविण्याची जिद्द युवराज यांच्यात असते. जलस्रोत कमी पडले तेव्हा नव्या कूपनलिका खोदाव्या लागल्या. त्यासाठी ५० टक्के निधी खर्च झाला. कर्जबाजारीपणही आले. पण युवराज खचले नाहीत. वडिलोपार्जित शेती करतानाच लीजवर शेती घेतली आहे. प्रयोगशील वृत्ती कायम ठेवली असून कृषी विभाग, तज्ज्ञांच्या ते संपर्कात असतात. अभ्यासू शेतकऱ्यांकडे भेटी देत नवे शिकून घेण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच पॉवर टिलरही घेतला आहे. ॲग्रोवनचेही ते नियमित वाचक आहेत.

संपर्क- युवराज चौधरी- ८००७७६९५६०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...
उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षमटिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता...
सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादनअभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या...
बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्डपुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर...
आधुनिक तंत्र शेतीच्या लाटेवर मंगरूळपरभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रूक गेल्या चार...
बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर...सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...