agriculture story in marathi, Zapdekar family of Ratnagiri has installed ripening chamber for mango. | Page 2 ||| Agrowon

आंब्यासाठी उभारले स्वतःचे रायपनिंग चेंबर

राजेश कळंबटे
गुरुवार, 18 नोव्हेंबर 2021

रत्नागिरी येथील संयुक्त झापडेकर कुटुंब आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. कोरोना काळात थेट ग्राहक विक्री करून त्यांनी पर्यायी बाजारपेठ शोधलीच. शिवाय काळाची गरज ओळखून देवेंद्र झापडेकर यांनी दहा टन क्षमतेचे रायपनिंग चेंबर उभारले. त्याद्वारे स्वतःकडील व अन्य बागायतदारांकडील २० हजार क्रेट आंबा अडीच महिन्याच्या हंगामात पिकवला. 

रत्नागिरी येथील संयुक्त झापडेकर कुटुंब आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. कोरोना काळात थेट ग्राहक विक्री करून त्यांनी पर्यायी बाजारपेठ शोधलीच. शिवाय काळाची गरज ओळखून कुटुंबातील युवा पिढीचे देवेंद्र झापडेकर यांनी दहा टन क्षमतेचे रायपनिंग चेंबर उभारले. त्याद्वारे स्वतःकडील व अन्य बागायतदारांकडील २० हजार क्रेट आंबा अडीच महिन्याच्या हंगामात पिकवला. ग्राहकांना दर्जेदार आंबा उपलब्ध झाला.
 
रत्नागिरी येथील संयुक्त झापडेकर कुटुंब अनेक वर्षांपासून हापूस आंबा उत्पादन घेत आहे. कुटुंबातील युवा बागायतदार देवेंद्र यांनी बारावीनंतर स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका घेतली. शिक्षण सुरू असतानाच घरची आंबाबागही ते सांभाळत होते. रत्नागिरी तालुक्यात हातखंबा, फणसवळे या ठिकाणी कुटुंबाची १२ एकर जमीन असून एकूण सुमारे ७०० पर्यंत कलमे आहेत. जुन्या पद्धतीने लागवड केलेली भलीमोठी हापूसची कलमे बागेत दिसून येतात. मार्चमध्ये दर्जेदार आंबा उपलब्ध करण्यासाठी जूनपासूनच प्रयत्न सुरू होतात. ऑगस्टमध्ये कलमांना सेंद्रिय व रासायनिक खतांचे डोस दिले जातात. कुजवलेले शेणखत, गांडुळ खत १२ ते १५ किलो प्रति झाड प्रमाणे दिले जाते. अशा खतांमुळे पालवी लवकर फुटते. उत्पादन वेळेत येते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आंबा काढणीस सुरवात होते. रासायनिक व सेंद्रिय अशी एकात्मिक पद्धतीची झापडेकर यांची शेती आहे.

रायपनिंग चेंबरचा वापर
ग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला हापूस हवा असतो. तशी मागणीही नोंदवली जाते. यासाठी आढी घातलेला किंवा पिकवणी कक्ष (रायपनिंग चेंबर) चा वापर करून पिकविलेला आंबा उपलब्ध केला जातो. देवेंद्र सुमारे २५ किलोच्या प्रति क्रेटमागे ७० रुपये देऊन वायंगणी, पूर्णगड येथील खासगी रायपनिंग चेंबरमधून आंबा पिकवून घेत. तेथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अन्य बागायतदारही येत असल्याने वेळही खूप लागायचा. झाडावर तयार आंबा तसाच पेटीत भरून बाजारात पाठवला तर तो पिकण्यासाठी १० ते १३ दिवस लागायचे. त्यात ग्राहकांची ऑर्डर घेतली असेल तर ती वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी अंगावर असायची.

कोरोना संकट व संधी
सन २०२०१ च्या ऐन आंबा हंगामात आलेल्या कोरोना संकटामुळे बाजार समित्यांमधील व्यवहारांवर मर्यादा आल्या. थेट ग्राहक विक्रीचा पर्याय बागायतदारांना निवडावा लागला. अशावेळी कृषी विभागाच्या मदतीमुळे झापडेकर यांनाही मुंबई, पुणे, अहमदाबाद, नागपूर, नाशिक आदी ठिकाणच्या निवासी सोसायट्यांमधील ग्राहक उपलब्ध झाले. अशावेळी सरसकट आंबा ग्राहकांना पाठविण्याऐवजी तो रायपनिंग चेंबरमध्ये पिकवून देताना देवेंद्र यांना तारेवरची कसरत करावी लागली. तो धडा घेतल्यानंतर मात्र देवेंद्र यांनी स्वतःचे रायपनिंग चेंबर उभारण्याचा निर्णय घेतला.

केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ
केंद्र शासनाच्या ‘अ‍ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ योजनेतून ‘रायपनिंग चेंबर’ साठी देवेंद्र यांनी बँक ऑफ इंडियाकडे प्रस्ताव दिला. दहा टन क्षमतेच्या चेंबरसाठी सतरा लाखाची गुंतवणूक अपेक्षित होती. दहा लाखांचे कर्ज ८. ८५ टक्के दराने मिळाले. मात्र योजनेंतर्गत व्याजदरावर तीन टक्के सवलत मिळाली. यंदाच्या फेब्रुवारीत प्रस्ताव सादर झाला आणि पंधरा दिवसांत मंजूरही झाला. त्यानंतर घराच्या जवळच १५ बाय १२ फूट आकाराचे चेंबर उभारले. एकावेळी सुमारे ३०० क्रेट ( प्रति २५ किलो) त्यात ठेवले जाऊ शकतात. क्षमता ४०० ते ५०० क्रेटपर्यंतही वाढवणे शक्य होते.

 शासकीय योजनेचा योग्य पद्धतीने लाभ घेत उभारलेल्या चेंबरची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेलिव्हिजन च्या माध्यमातून देशभरातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यात देवेंद्र यांचा समावेश होता.

रायपनिंग चेंबर- ठळक बाबी

 • २७ ते ३० अंश से. तापमानाला आंबा पिकविणे आवश्यक असते. तसे तापमान ‘सेट’ केले जाते.
 • या पद्धतीने फळ पिकले तर त्यात साका राहत नाही
 • चेंबरमध्ये चार दिवस आंबा ठेवला जातो
 • यात विशिष्ट रसायनाचा ९० पीपीएमचा डोस दिला जातो
 • हवा खेळती राहील या प्रकारे क्रेटस ठेवले जातात.
 • चेंबरमधून काढलेला आंबा सुमारे सात दिवसांत खाण्यायोग्य होतो. स्वाद आणि रंग हे नैसर्गिक राहतात
 • अडीच महिन्यात सुमारे २० हजार क्रेट आंबा पिकवला.

झालेले फायदे

 • अन्यत्र पिकविण्यासाठी प्रति क्रेट ७० रुपये खर्च यायचा. स्वतःच्या चेंबरमध्ये तो सरासरी ३५ रुपये येतो
 • ग्राहकांना वेळेत आणि दर्जेदार आंबा मिळाला. दरात दहा टक्के वाढ. ग्राहक कायमस्वरूपी टिकून राहण्यास मदत.
 • आंबा पिकविण्यासाठी गवताची आढी घालताना पाच टक्के आंबा वाया जात होता. ते प्रमाण चेंबरमुळे एक टक्क्यावर आले. गवतात पिकवताना तापमान कमी-जास्त होत असल्यामुळे साका होण्याची शक्यता असते. ते प्रमाणही कमी झाले.
 • अन्य बागायतदारांनाही सेवा दिल्याने उत्पन्नाचे अतिरिक्त साधन मिळाले.
 • झापडेकर यांच्याकडे वर्षाला पाच हजार पेटीपर्यंत आंबा उत्पादन होते. ग्रेड व बॉक्स वजनानुसार
 • सरासरी प्रति पेटी दोन ते अडीच हजार रुपये दर मिळतो. हंगामात ४० कामगार तैनात असतात.

संपर्क- देवेंद्र झापडेकर- ७०२००२४२४२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
रेशीम शेतीतील समाधानकिनगाव (ता.यावल, जि.जळगाव) येथील समाधान भिकन...
शेतकऱ्यांच्या खात्रीची, सोयीची...राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ २०१८...
पापड, बेकरी उद्योगात तयार केली ओळखभादोले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील नसीमा...
गृहद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...औरंगाबाद शहरातील संपदा अनिल बाळापुरे यांनी...
नागली उत्पादनांचा ‘स्टार बाइट’ ब्रॅण्डनाशिक ः  कोरोना संकटकाळात अनेकांनी संधी...
जागतिक दर्जाच्या शेतीतून वाटा केल्या...निघोज (जि. नगर) येथील आपल्या साठ एकरांत विज्ञान-...
निराधार विधवांना ‘शेक हॅंड’ फाउंडेशनचा...परभणी जिल्ह्यातील मांडळाखळी येथील शरद लोहट...
सालईबनला मिळाली नवी ओळखबुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनने...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत कांदा...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
टेरेसवर द्राक्ष बागेचा फिलकांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या...
‘ड्रायझोन’मध्ये आली गंगाअमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे दोन्ही तालुके...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
मोबाईल अन्‌ प्रक्षेत्रभेटीतून मिळतोय...हवामान बदलाच्या काळात तातडीने हवामान, पीक नियोजन...
साहिवाल पालनात तरुणाने दाखवली जिद्दकुठल्याही व्यवसायात टक्के-टोणपे, यश -अपयश येतच...
कुक्कुटपालन, फलोत्पादनातून मिळवले...विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर दीपक खैरनार यांना...
पूरक उद्योगातून शेती झाली किफायतशीरभातशेतीसह पशुपालन व्यवसायामध्ये उतरत एकात्मिक...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
रोपवाटिका व्यवसायातून साधली प्रगतीकामशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथील शुभांगी दळवी...
प्रयोगशीलतेतून वाढवले तुरीचे उत्पादनलोणी मसदपूर (ता. कर्जत, जि. नगर) येथील एकनाथ...