विना नांगरणी तंत्राने खर्चात केली बचत

विनामशागत शेती फायद्याची आहे. दुष्काळात हे तंत्र शेतीला सावरते. शिवाय शेतीतील खर्चही कमी करते. -विकास कांडेकर
विना मशागत तंत्र व पीक अवशेषांचा वापर, याआधारे डाळिंब बाग फुलवली
विना मशागत तंत्र व पीक अवशेषांचा वापर, याआधारे डाळिंब बाग फुलवली

गेल्या तीन वर्षांपासून विनामशागत तंत्रज्ञान व पीक अवशेषांचा वापर या बळावर संगमनेर (जि. नगर) येथील विकास श्रीहरी कांडेकर यांनी स्वीट कॉर्न, टोमॅटो, डाळिंब तसेच अन्य हंगामी पिकांची शेती यशस्वी केली आहे. या तंत्राच्या शेतीने एकरी सुमारे पाच हजार रुपयांचा नांगरणीचा खर्च वाचवला. दुष्काळात जमिनीची जलधारणक्षमता वाढवत मधुमक्याचे उत्पादन घेण्याबरोबर दहा टन मूरघास व सेंद्रिय खतही उपलब्ध करण्यात ते यशस्वी झाले. 

कांडेकर यांची ओळख  विकास कांडेकर यांचे पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. एकत्रित कुटुंब असताना विकास वडिलांसोबत रांजणगाव खुर्द (ता. राहाता) येथे वास्तव्याला होते. तेथील साडेपाच एकर जमीन कसण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. तेथे वडिलांसह १८ वर्षे शेती केली. कुटुंब विभक्त झाल्यावर विकास यांच्या वाट्याला मूळ पळसखेडे (ता. संगमनेर) येथील पाच एकर जमीन आली.  विनामशागत तंत्राचे चिपळूणकर यांचे प्रयोग  पळसखेडे येथील खाचखळगे असलेल्या जमिनीचे सपाटीकरण केले. दोन एकरांवर भगवा डाळिंबाची लागवड केली. दरम्यान नैसर्गिक शेतीचे धडे त्यांनी शिबिरांमधून घेतले. आपल्या जमिनीतील समस्या दूर करण्यासाठी कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचा दूरध्वनीवरून संपर्क झाला. त्यांनी विनामशागत शेती तंत्राची आपली पुस्तके वाचण्यास सांगितले. गरजेनुसार विकास त्यांच्याकडून नियमित मार्गदर्शनही घेऊ लागले.  अशी आहे विकास यांची शेती 

  • शेती तंत्र-विना नांगरणी व पीक अवशेषांचा वापर 
  • या तंत्राचा अनुभव- ४ वर्षे 
  • केलेले प्रयोग 

  • २० गुंठे 
  • खरिपात टोमॅटो 
  • रब्बीत कांदा 
  • उन्हाळ्यात- चवळी 
  • पुन्हा खरिपात- टोमॅटो 
  • दोन एकर डाळिंब 
  • विनानांगरणी अधिक पीक अवशेष तंत्राचे झालेले फायदे 

  • नांगरणीचा खर्च वाचला. उदा. नांगरट १५०० रु., रोटाव्हेटर, सरी सोडणे, ड्रीप अंथरणे व अन्य असा एकरी ५००० रुपये खर्च असा प्रत्येत पिकात वाचला. 
  • रासायनिक खतांचा वापर थांबवला. त्यावरील खर्च व मजुरी खर्च वाचला. 
  • जमिनीत गांडुळांची संख्या वाढली. 
  • जलधारण क्षमता वाढली  यंदा तीव्र दुष्काळ होता. खरिपात स्वीट कॉर्न होते. मात्र पीक अवशेष व विनानांगरणी यांचा सातत्याने वापर.  त्यामुळे वाढली-

  • जमिनीची सुपीकता 
  • जलधारणक्षमता 
  • जमिनीतील ह्युमस 
  • ज्यायोगे कमी पाण्यात पीक आले. 
  • शेततळ्यात पाणी राहिले  अगदी शेततळ्यातील पाणी दोन ते तीन दिवसांमागे १० मिनिटे दिले तरी पुरले. मागील वर्षी पावसाच्या पाण्याने शेततळे भरून घेतले होते. यंदा त्यात ५० लाख लिटर पाणी आहे. सातत्याने विना नांगरणी तंत्राच्या वापराने पाण्याची गरज कमी केल्याने त्यातील साठा फार जलद संपत नाही हादेखील फायदाच झाल्याचे विकास सांगतात. गावशिवारातील सगळे शेततलाव कोरडेठाक आहेत. त्यामुळे पीक नाहीच. बागा जगविण्यासाठी टॅंकरची मदत घ्यावी लागत आहे. विकास यांच्याकडे मात्र सध्या तलावात पन्नास टक्के पाणी आहे. 

  • हे तंत्र वापरले नसते तर- उत्पादन काहीच हाती नसते. 
  • तंत्र वापरल्याने- दीड एकरात दुष्काळातही सहा टन उत्पादन हाती लागले. 
  • सुमारे १० टन मूरघास मिळाला. त्यामुळे शेळ्या, गायींच्या चाऱ्याचा १० महिन्यांचा प्रश्न सुटला आहे. 
  • सेंद्रिय खत जमिनीला उपलब्ध झाले. 
  • स्वीट कॉर्न विक्रीतून मिळाले दीड एकरात २१ हजार रुपये. 
  • व्यापाऱ्याकडून जागेवर खरेदी. 
  • दोन एकर डाळिंबात झालेले फायदे 
  • पहिल्या वर्षी एकूण पाच टन, पुढील वर्षी बारा टन तर यंदा १५ टन ४४० किलो उत्पादन. 
  • यंदा ४४ रुपये प्रति किलो दर. सुमारे साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न. दोन एकरांत ८० हजार रुपये खर्च. 
  • ठळक बाबी 

  • विना मशागत शेतीचा प्रयोग करणारे विकास या भागातील पहिलेच शेतकरी. 
  • मजुरी वगळता अन्य फारसा खर्च करीत नाहीत. 
  • केवळ गोमूत्र, शेण, डाळीचे पीठ, गुळापासून तयार केलेल्या स्लरीचा वापर. 
  • काही प्रमाणात डाळिंबात रासायनिक कीडनाशकांचा वापर 
  • पाण्याच्या नियोजनाने तारले  यंदा तीव्र दुष्काळाला संगमनेर तालुकाही अपवाद नाही. नाशिक जिल्ह्याला जोडून तालुक्‍यातील पठार भागाला तर गंभीर फटका बसला आहे. पळसखेड गावासह परिसरात बहुतांश शेतकरी डाळिंब घेतात. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने शेततळे घेतले आहे. विकास यांनीही २०१५ मध्ये विहीर खोदली. तर २०१६ साली एक कोटी लिटर क्षमतेचे स्वखर्चाने शेततळे उभारले.  माहेर भेटीतून शेळीपालनाचा विस्तार  विकास यांच्या सौभाग्यवतींना माहेराहून २००८ मध्ये शेळी भेट दिली होती. त्यातूनच कांडेकर दांपत्याने शेळीपालनाचा विस्तार केला आहे. सध्या १० शेळ्या आहेत. त्यातून संसाराला दोन लाखांपेक्षा अधिक रकमेचा आधार मिळाला आहे. मुक्त संचार पद्धतीने पंधरा कोंबड्यांचे पालन होते. त्यात वाढ करत कडकनाथ कोंबडीपालनाचे नियोजन आहे.  गीर गायीतून उत्पन्न स्रोत 

  • एक गाय. दररोज नऊ लिटर दूध देते. 
  • दररोज साधारण ताक निर्मिती- १० लिटर. फळशेती किंवा नैसर्गिक शेती करणारे वीस रुपये प्रति लिटर दराने घेऊन जातात. 
  • मागणी असल्यास तुपाची दोन हजार रुपये प्रति किलो दराने विक्री. 
  • संपर्क- विकास कांडेकर- ९८५०६१९१०६ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com