माहितीबरोबरच बदलाचेही ‘ॲग्रोवन’कडून काम : आदिनाथ चव्हाण

आदिनाथ चव्हाण
आदिनाथ चव्हाण

पुणे : जगाच्या कानाकोपऱ्यातील शेतीसंबंधीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवत असतानाच, शेतकऱ्यांना बदलत्या परिस्थितीत नव्या बदलासाठी तयार करण्याचे दुहेरी काम अॅग्रोवन करीत आहे, असे प्रतिपादन अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २९) केले.

अॅग्रोवनच्या स्मार्ट शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात मनोगतावेळी श्री. चव्हाण बोलत होते. येथील टिळक स्मारक मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. श्री. चव्हाण म्हणाले, की आपण सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या टप्प्यावर उभे असताना शेतकऱ्याच्या कर्तृत्वाचा, प्रतिष्ठेचा सन्मान करणारा, त्याचा गौरव करणारा हा सोहळा आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या बारा वर्षांच्या काळात वाचक शेतकऱ्यांचे मोठे पाठबळ अॅग्रोवनला मिळाले. त्याचमुळे या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सरपंच महापरिषद, स्थानिक मेळावे, दिवाळी अंक, विशेषांक या माध्यमांतून शेतकऱ्यांमध्ये कृषीविषयक ज्ञान, माहितीच्या प्रसाराचे काम निष्ठेने आणि जोमाने सुरू आहे. राज्याच्या कृषी क्षेत्रात मोलाची भर टाकण्यात अॅग्रोवनचा पुढाकार असल्याचे सांगत ते म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांचा कैवार घेत प्रसंगी सरकारला अन्यायकारी ध्येय-धोरणे, निर्णय बदलण्यास भाग पाडण्याचे कामही अॅग्रोवनने केल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

ते म्हणाले, गेली तीन-चार वर्षे शेतीसाठी प्रतिकूल होती. अनेक संकटे ओढवली असताना सगळेच वाईट नाही, चांगलेही घडतेय तेच आजच्या कार्यक्रमातून दिसून येत आहे. श्री. चव्हाण यांनी पुरस्कार निवड समितीतील सदस्यांचे विशेष आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com