हळदीचे केलेले निर्जलीकरण
हळदीचे केलेले निर्जलीकरण

निर्जलीकरण केलेल्या शेतमालाला देशांतर्गत मिळवली बाजारपेठ

दुधोंडी (जि. सांगली) येथील ‘कृष्णाकाठ’ सहकारी संस्थेने बाजारपेठांची बदलती गरज ओळखूनशेतमाल व फळे निर्जलीकरण उद्योग साकारला आहे. भाजीपाला व फळे मिळून २० ते २५शेतमालांवर प्रक्रिया करून राज्यासह परराज्यांत त्यास बाजारपेठ तयार केली आहे.

दुधोंडी (जि. सांगली) येथील ‘कृष्णाकाठ’ सहकारी संस्थेने बाजारपेठांची बदलती गरज ओळखून शेतमाल व फळे निर्जलीकरण उद्योग साकारला आहे. भाजीपाला व फळे मिळून २० ते २५ शेतमालांवर प्रक्रिया करून राज्यासह परराज्यांत त्यास बाजारपेठ तयार केली आहे. सध्या प्रतिदिन सुमारे १३०० किलो एवढी प्रक्रिया क्षमता संस्थेने तयार केली असून त्याची वार्षिक उलाढाल ३ ते ३.५० कोटींपर्यंत पोचवली आहे.  . सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका ऊस, द्राक्षे, भाजीपाला या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील दुधोंडी हे कृष्णाकाठी वसलेलं गाव आहे. त्यामुळे परिसराला समृद्धीला आली आहे. गावात सन २००० मध्ये सहकारी तत्त्वावर कृष्णाकाठ शेतीमाल प्रकिया आणि साठवणूक सहकारी या संस्थेची स्थापना झाली. दुधावर प्रक्रिया करणे हा प्रमुख उद्देश होता. हे दूध मुंबई येथे पाठवण्यात येत होते. त्याच बरोबर द्राक्षनिर्यातीतही संस्था कार्यरत झाली. दरम्यानच्या काळात मुंबई- वाशी येथील मार्केटमध्ये गाळा घेतला. या माध्यमातून भाजी विक्री सुरु झाली. बदलता काळ व बाजारपेठांचा अभ्यास करून संस्थेने प्रक्रियेचे अन्य पर्याय शोधण्याविषयी अभ्यास सुरु झाला. संस्थेची सुरूवात पंचक्रोशीत जे. के.बापू जाधव नावाने ओळखले जाणारे संस्थेचे संस्थापक जनार्दन कृष्णाजी जाधव म्हणाले की संस्थेच्या स्थापनेवेळी भांडवलाची आवश्यकता होती. त्यासाठी शेतकऱ्यांची सहमती महत्त्वाची होती. प्रत्येक शेतकऱ्याकडून दोन हजार रुपयांचे भांडवल जमा करून घेतले. ते कमी पडत असल्याने गावातीलच मानसिंग बँकेकडून कर्ज घेतले. गावात शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुरु व्हावा. यादृष्टीने विचारविनिमय सुरु होता. परिसरातील शेतकऱ्यांसोबत चर्चा देखील झाल्या. ऊस पिकातून अठरा महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या तात पैसे येतात. अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्या हाती ताजा पैसा आला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. तसे प्रयत्न सुरू होते. निर्जलीकरणाचा पर्याय सन २०१० चा काळ. त्यावेळी शेतमालावर निर्जलीकरण करण्याविषयी माहिती मिळाली. त्यावेळी हे तंत्रज्ञान तसे फारसे लोकप्रिय देखील नव्हते. इंटरनेटवरुन अधिक माहिती घेण्यास सुरवात झाली. आपल्या परिसरात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. त्यामुळे त्यातून संधी निर्माण करता येईल का असा अभ्यास झाला. सर्व अंगाने शक्यता अजमावल्यानंतर ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यास सुरूवातही झाली. सर्वस्तरावर माहिती घेणे सुरु केले. राज्यात जेथे असे प्रकल्प उभे आहेत त्यांच्या भेटी घेण्यास सुरू झाल्या. अन्न प्रक्रियेसाठी शासकीय अर्थसाहाय्य मिळत असल्याचे कळले. प्रस्ताव सादर केला. काही वर्षांतच ६१ लाख रुपये कर्ज मिळाले. सन २०१३-१४ प्रत्यक्षात प्रकल्प उभारणी सुरू केली. आज तो चांगल्या प्रकारे सुरू आहे. उत्पादनांची निर्मिती

  • पालक, कोथिंबीर, मेथी, पुदीना, गाजर, दुधीभोपळा, टोमॅटो आदी विविध शेतमालाचे निर्जलीकरण.
  • दुधीभोपळा, टोमॅटो यांची पावडर निर्मिती
  • फळांमध्ये चिकू, पपईपासून स्लाइस, डाळिंबापासून अनारदाना
  • एकूण २० ते २५ उत्पादनांची मागणीनुसार निर्मिती
  • मार्केटिंग मुळात अशा प्रक्रियायुक्त शेतमालाचे मार्केटिंग व विक्री करण्याचे खूप मोठे आव्हान होते. त्यासाठी संस्थेने वेबसाइट तयार केली. त्यात उत्पादनांची छायाचित्रे अपलोड केली. संस्थेची वैशिष्ट्ये सादर केली. त्यासह पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई आदी ठिकाणी काही कंपन्यांना भेटी दिल्या. त्यांना उत्पादनांचे नमुने दिले. आजचा उद्योग दृष्टिक्षेपात

  • प्रकल्प खर्च- ७ कोटी
  • भागभांडवल- सुमारे ३८ लाख रू.
  • प्रकल्प क्षेत्र- सुमारे १८ हजार चौरस फूट
  • अन्न उद्योगातील मानके प्राप्त करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा
  • ड्रायर, कटिंग मशिन, स्लायसर, आदी यंत्रांची सुविधा
  • प्रक्रिया क्षमता- दोन टन प्रति दिन
  • सध्या साध्य झालेली क्षमता- १३०० ते १४०० किलो
  • सभासद संख्या- ३६४
  • रोजगार निर्मिती- १५ व्यक्ती
  • वार्षिक उलाढाल : ३ ते ३.५० कोटी
  • शेतमाल साठविण्यासाठी शीतगृह
  • कोणत्याही रासायनिक घटकांचा समावेश न करता उत्पादन निर्मिती
  • जशी ऑर्डर येईल तेवढेच उत्पादन. त्याची साठवणूक केली जात नाही.
  • संस्थेला आयएसओ नामांकन
  • पुणे, मुंबई, तुर्की आदी ठिकाणाहून यंत्रांची खरेदी
  • कच्च्या मालाची खरेदी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावरून
  • सांगली, पुणे, बेळगाव, मिरज या बाजार समितीतूनही आवश्‍यक त्यावेळी खरेदी
  • उत्पादनांची विक्री पुणे, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांना
  • वीजदर कमी करण्याची गरज संस्थेचे कार्यकारी संचालक दिगंबर जाधव म्हणाले की आम्ही उत्पादनांसाठी व्यापारी निश्‍चित केले आहेत. दरवर्षी त्यांना मालाचा पुरवठा करण्यात येतो. या उद्योगातून चांगल्या प्रकारे नफाही आम्ही मिळवू लागलो आहोत. मात्र काही समस्या देखील भेडसवतात. मुळात आपल्या राज्यात शेती प्रक्रिया उद्योगासाठी वीज दर अधिक आहे. सध्या आमच्या उद्योगाला प्रति युनिट १० ते ११ रुपये असा दर आहे. यामुळे आम्ही मागणीनुसारच प्रक्रिया करतो. शासनाने वीज दर कमी करण्याची गरज आहे. तरच अशा उद्योगांना चालना मिळेल. प्रतिक्रिया शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रक्रिया उद्योग कष्टातून उभा केला आहे. दूध, द्राक्ष निर्यात या बाबी सुरुच आहेत. कोणत्याही उद्योगात सातत्य ठेवले तरच यशस्वी होता येते. पूर्ण क्षमतेने उत्पादन क्षमता वाढविण्याचा विचार आहे. -जनार्दन कृष्णाजी जाधव संस्थापक, ‘कृष्णाकाठ’ संस्था संपर्क- दिगंबर जाधव-९३७२११०९०० कार्यकारी संचालक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com