मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरण

मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरण
मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरण

सुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक प्रकार होय. उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस जमिनीतील कंद वाढू लागतो.

वर्षातील आठ महिने सुप्तावस्थेत राहून, पावसाळ्याचे फक्त चारच महिने तरारून वाढणारी वनस्पती म्हणजे सुरण. सुरणाला वर्षातून एकदाच आणि एकच पान येते. चांगल्या पोसलेल्या सुरणाचे पान एखाद्या छत्रीएवढे मोठे असू शकते.  

सुरणाचे अाैषधी गुणधर्म

  • मूळव्याधीच्या नियंत्रणासाठी आहारात सुरणाचा समावेश करावा.
  • सुरणाचा कंद काहीसा ओबडधोबड, अर्धगोलाकृती, एकंदरीत काहीसा चपटा गर्द तपकिरी रंगाचा असतो आणि आतून किंचित लालसर किंवा किंचित बदामी असतो.
  • सुरण चिरताना हाताला खाज येते किंवा चिंच न घालता त्याची भाजी केली तर घसा खवखवतो. कारण त्याचा दांडा हिरवा असतो आणि त्यावर फिकट पांढरे ठिपके असतात. तो कृमींचा नायनाट करतो, म्हणून तो कृमिघ्नही आहे.
  • सुरण अरुची, अग्निमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे व प्लिहेचे विकार यांवर गुणकारी आहे.
  • संधिवातात कंद व बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते.
  • आतड्यांच्या तक्रारींवर सुरणाची भाजी खाणे हितकारक असते.
  • रताळी, काटेकणगी, करांदे, अरवी, कोनफळ, बटाटा इ. अनेक भाज्यांसाठी उपयुक्त असलेले कंद आहेत.
  • सुरणाचे प्रकार

  • सुरणाचे वन्यसुरण आणि ग्राम्यसुरण असे दोन प्रकार आहेत. ग्राम्य म्हणजे गावठी. या सुरणाची लागवड करावी लागते.
  • वन्य म्हणजे जंगली. हा सुरण जंगलात आपोआप वाढतो. जंगली सुरण औषधासाठी आणि गावठी सुरण खाण्यासाठी वापरतात.
  • सुरणात कॅल्शिअम ऑक्झलेट असल्याने खाज येते. जंगली सुरणात त्याचे प्रमाण जास्त, तर गावठी सुरणात कमी.
  • सुरणाचा खाजरेपणा घालवण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात. परंतु जंगली सुरण उकळावा लागतो.
  • अनेक व्याधींवर उपयोगी

  • सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. सुरणाच्या कंदाची बटाट्यासारखी उकडून भाजी करतात. तुपात हिरव्या मिरच्या जिरे फोडणीला घालून उपवासाची भाजी करतात; तसेच गरम किंवा गोडा मसाला घालून रसभाजी करतात.
  • फूल, कंद, पाने, दांड्यापासून पदार्थ बनवताना चिंच किंवा आमसूल घालणे आवश्यक असते.
  • सुरण रूक्ष, तुरट, तिखट गुणधर्माचे आहे. भूक व चव वाढविते. दमा, श्वासनलिकेचा दाह, वांती, पोटदुखी, मूळव्याध, रक्तविकार, हत्तीरोग यावर सुरण उपयुक्त आहे. सुरणाचा ताजा कंद क्रियाशील व उद्दीपक, कफोत्सारक आहे.
  • सुरणात अ, ब तसेच क ही जीवनसत्त्वे आहेत.
  • आयुर्वेद औषधांमध्ये सुरणाच्या कंदाची पावडर मोठ्या प्रमाणात वापरतात.
  • सुरणाच्या कंदाची भाजी मूळव्याधीसाठी गुणकारी आहे. भाजीमुळे यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होते. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते.
  • संपर्क ः ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com