दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
कार्यक्षम उत्पादनासाठी पर्यावरणीय पड तंत्र
कार्यक्षम पीक उत्पादन तंत्रात जमीन पड ठेवणे किंवा विश्रांती देणे या क्रियेला महत्त्व आहे. मात्र, जमीन पड ठेवण्यापूर्वी त्यातील पिकांचे अवशेष, तणे तणनाशकाने मारण्याचे उल्लेख डॉ. राव यांच्या तणविज्ञान या पुस्तकामध्ये येतात. कारण त्यानंतर शून्य मशागतीवर पिके घेणे शक्य होते.
कार्यक्षम पीक उत्पादन तंत्रात जमीन पड ठेवणे किंवा विश्रांती देणे या क्रियेला महत्त्व आहे. मात्र, जमीन पड ठेवण्यापूर्वी त्यातील पिकांचे अवशेष, तणे तणनाशकाने मारण्याचे उल्लेख डॉ. राव यांच्या तणविज्ञान या पुस्तकामध्ये येतात. कारण त्यानंतर शून्य मशागतीवर पिके घेणे शक्य होते.
संवर्धित शेती पद्धतीला अमेरिकेत साधारण १९६०-७० च्या सुमारास सुरवात झाली. वेळ, श्रम, खर्च व इंधनात बचत होत असल्याने ही पद्धत सुरवातीला मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. मात्र, २० वर्षांनंतर तणांचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच वाढल्याचे लक्षात आले. परिणामी शून्य मशागत तंत्राची लोकप्रियता कमी होत त्याची जागा गरजेपुरत्या मशागतीने घेतली. अमेरिकेतील दरडोई मोठ्या क्षेत्रामुळे तण समस्येची तीव्रता भारताच्या तुलनेमध्ये मोठी आहे.
इको फॅलो (पर्यावरणीय पड) तंत्र ः
कार्यक्षम पीक उत्पादन तंत्रात जमीन पड टाकणे (एक वर्ष, एक हंगाम) याला महत्त्व आहे. फळ बागेत बहाराआधी किंवा फळ काढणीनंतर काही काळ देण्यात येणारी विश्रांती ही या सदरात मोडत नाही. कोणतेही पीक न घेता शेतामध्ये मातीची हालचाल न करता जमिनीला काही काळ पूर्ण विश्रांती देणे, म्हणजे पर्यावरणीय पड होय. या तंत्राचा खास उल्लेख पुस्तकात आहे. आपल्याकडे अद्यापही या तंत्राबाबत शास्त्रीय माहिती किंवा प्रबोधन झालेले नाही. मात्र, हे तंत्र भारतामध्ये सर्वाधिक उपयुक्त ठरू शकते. वीड सायन्स (तणशास्त्र) या इंग्रजी पुस्तकातील काही वाक्यांचे मराठी भाषांतर मुद्दाम येथे देतो.
‘‘जमिनीत कोणतेही पीक न घेता ती पड टाकावी. त्यासाठी (पूर्वीच्या) पिकांचे अगर तणांचे अवशेष तणनाशकाने मारावेत. अशा पद्धतीने पडीक ठेवलेली जमीन ही अवर्षण व अतिवृष्टी अशा दोन्ही आपत्तींमध्ये जमिनीसाठी फायदेशीर ठरते. या तंत्रामुळे अवर्षण परिस्थितीत पाण्याचे संवर्धत होते, तर अतिवृष्टी असणाऱ्या भागात मातीचे संवर्धन होते. खरीप पड, रब्बीमध्ये पीक घेणे किंवा रब्बी पड, खरिपात पीक घेणे अशा प्रकारे दोन हंगामाच्या मधल्या काळात जमीन पड ठेवता येईल. येथे पेरणीपूर्व, पेरणीनंतर अगर उभ्या पिकात गरजेप्रमाणे तणनाशकाचा वापर करता येतो. पिकाच्या अगर तणांच्या मृत अवशेषात पेरणीसाठी शून्य मशागत तंत्राने पेरणी करणाऱ्या खास यंत्रांची मदत घेतली जाते.
या पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
- पीक उत्पादनात वाढ.
- पाण्याने व वाऱ्याने होणारी धूप थांबते.
- इंधन खर्चात बचत.
- जमिनीची कण रचना टिकून राहते.
- मजूर खर्चात बचत.
- रसायनांचे अवशेष किमान पातळीवर.
- ज्यांच्याकडे शेतीचे मोठे क्षेत्र आहे, अशा लोकांसाठी हे तंत्र व्यवस्थापनामध्ये सुलभता आणू शकेल.
मर्यादा ः
भारतामध्ये शून्य मशागतीवर (विना नांगरणी) पेरणी करणारे यंत्रे व अवजारे फारशी उपलब्ध नाहीत.
या मर्यादेवर मात करण्यासाठी काही युक्त्या वापरता येतात. आपल्याकडे पंजाब व हरियाना राज्यामध्ये खरीप भात पिकाच्या काढणीनंतर मशागत करून रब्बी गहू पेरण्यास विलंब झाल्यास बिना नांगरणीचे तंत्र मोठ्या प्रमाणात अवलंबिले जाते. महाराष्ट्रामध्ये खरीप कापणीनंतर रब्बी पेरणीपूर्वी २५ ते ३० दिवसांचा कालावधी उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत चांगली पूर्व मशागत करूनच पेरणी करणे चांगले असे कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांचे मत आहे. या विचारामुळेही शून्य मशागतीवर पेरणीचा विचार किंवा संशोधन फारसे झालेले नाही.
माझ्या अभ्यासानुसार, आपल्याकडील सर्व भौगोलिक विभागात सर्व पिकात शून्य मशागतीवर पेरणारी खास अवजारे नसतानाही हे तंत्र वापरता येते. शेती, जमिनी व शेतकऱ्यांच्या वाईट होत चाललेल्या परिस्थितीवर केवळ हे तंत्र शेतकऱ्यांना तारू शकते. डॉ. राव १९८४ सालच्या आपल्या पुस्तकात शून्य मशागत तंत्राला मोठे भवितव्य असल्याचे लिहितात. मात्र, त्यावरील संशोधनाबाबत अगदी २०१९मध्ये आनंदी आनंद आहे. आज शास्त्रज्ञ केवळ मशागत किमान करा, असे म्हणू लागले असले तरी ते नेमके कसे करावे याबाबत फारसे बोलत नाही. या तंत्राचे खास प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. या लेखमालेत २०१८ मध्ये कमी पाऊस व २०१९ या वर्षीच्या अति पावसातही काही शेतकऱ्यांना हे तंत्र कसे उपयुक्त ठरले, त्यांना या तंत्रामुळे अस्मानी संकटावर मात करता आली, याची उदाहरणे पुढे देणार आहे.
ऊर्जा बचत ः
आपल्याकडे मानवी पद्धत, यंत्र व अवजारे आणि तणनाशक अशा विविध प्रकारांने तण नियंत्रण केले जाते. पद्धतीनुसार तण नियंत्रणाच्या कामी किती ऊर्जा खर्च होते, याचा अभ्यास नाळेवाजे (१९७५) या शास्त्रज्ञाने केला होता. त्याची माहिती खाली दिली आहे.
तणनियंत्रकाची पद्धत - ऊर्जा वापर किलो कॅलरी/हेक्टरी
- मानवी तण नियंत्रण - ४३७९६
- आंतर मशागत अवजार (इंधनावरील) - १,८१,४४४
- तव्याचा कुळव (इंधनावरील) - १,३९,८६६
- ओळीत फिरवण्याचे दात (इंधनावरील) - ५५,३६०
- यांत्रिक कोळपे (गोल फिरणारे) (इंधनावरील) - २९,६५
- तणनाशक - ३९,३४०
वरील कोष्टकात गोल फिरणारे यांत्रिक कोळपे सर्वात कमी ऊर्जा वापरत असले तरी त्यातून गरजेइतक्या वेगाने काम होत नसावे. कारण त्याचा वापर तुलनेने फारसा वाढला नाही. वरील सर्व घटकांतील तणनाशक हाच पर्याय लहान मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना सुलभ ठरणारा आहे. दिवसेंदिवस मजुरांची उपलब्धतेची समस्या भीषण रुप धारण करीत आहे. तणनाशकांचा वापर सुरू झाला त्या वेळी तणनाशकांमुळे निंदणी करणारा मजूरवर्गाला काम शिल्लक राहणार नाही, असे वाटत होते. एका अर्थाने मनाला ते पटत नव्हते. मात्र, तसे काहीच झाले नाही. आज तणनाशके वापरुनही अन्य कामांसाठी मजूर टंचाईचा सामना करावा लागतो.
तणनाशकाचा पर्यावरणीय परिणाम
याविषयी लेखक म्हणतात, तण नियंत्रणाच्या सर्व पद्धतीने पर्यावरणाची कमी जास्त हानी होतच असते. परंतु आपण त्या दृष्टीने तिकडे पाहात नाही. कीडनाशक किंवा तणनाशकांच्या जमिनीत शिल्लक राहणाऱ्या अवशेषांकडे सर्वात जास्त संशयाने पाहिले जाते. मात्र, या पर्यावरणावरील परिणामांचा अभ्यास एखादे उत्पादन बाजारात उतरवण्यापूर्वी केला जाऊ लागला. शेवटी प्रत्येक संसाधनाचे काही फायदे व काही तोटे असतातच. तसे रसायनांच्या वापराचेही आहेत. आज रसायनांच्या तोट्याबाबत जितकी चर्चा होते, तेवढी त्यापासून होणाऱ्या फायद्याबाबत होत नाही. तणनाशकामुळे मजूर बचत, ऊर्जेचे संवर्धन, उत्पादन खर्चात बचत अशा अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. म्हणून दरवर्षी तणनाशकांच्या विक्रीचा आलेख वाढत चालल्याचे दिसून येते.
समाजातील एक ठराविक वर्ग रसायनांच्या वापरावर टीका करीत असतो. त्यापैकी बहुतेकांचे शेताला कधी पाय लागलेले नसतात. सेंद्रिय शेतीमध्ये रसायनांचा वापर केला जात नसला तरी पर्यावरणाची हानी होत नाही, असे थोडेच आहे. मानवाच्या आरोग्यासाठी सेंद्रिय उत्पादने चांगली, हे खरे वाटत असले तरी सेंद्रिय शेती उत्पादकांचे काय? त्यांच्या अडचणींचा कोण विचार करणार? खासगी संस्था व सरकारी संस्थांच्या मोठ्या प्रचारानंतरही सेंद्रिय शेतीचे प्रमाण जागतिक पातळीवर १ ते २ टक्क्यांपेक्षा का वाढत नाही. आरोग्य सर्वांना हवे असतानाही सेंद्रिय शेतीचे प्रमाण न वाढण्यामागे तंत्रातील काही त्रुटी कारणीभूत आहेत का? यांचा विचार होणे गरजेचे आहे.
- 1 of 1030
- ››