Agriculture success story in marathi, farm implimentation by bharat kalmegh, kasli bruduk, tal. dist. Akola | Agrowon

स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली निर्मिती

गोपाल हागे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली. साहजिकच अनेक कामांसाठी मानवी श्रम अपुरे पडत आहे. अशावेळी खारपाणपट्ट्यात मोडल्या जाणाऱ्या कासली बुद्रुक (ता. जि. अकोला) येथील भरत प्रभाकर काळमेघ या तरुण शेतकऱ्याने यांत्रिकीकरणाची कास धरली आहे. मशागत, फवारणी, खत देणे आदी कामांसाठी त्यांनी आपल्या गरजेनुरूप बैलगाडी व ट्रॅक्टरचलित यंत्रे तयार करून त्यांचा सुलभ वापर सुरू केला आहे. त्यातून श्रम, मजूरबळ व पैसे यांची बचत केली आहे.

बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली. साहजिकच अनेक कामांसाठी मानवी श्रम अपुरे पडत आहे. अशावेळी खारपाणपट्ट्यात मोडल्या जाणाऱ्या कासली बुद्रुक (ता. जि. अकोला) येथील भरत प्रभाकर काळमेघ या तरुण शेतकऱ्याने यांत्रिकीकरणाची कास धरली आहे. मशागत, फवारणी, खत देणे आदी कामांसाठी त्यांनी आपल्या गरजेनुरूप बैलगाडी व ट्रॅक्टरचलित यंत्रे तयार करून त्यांचा सुलभ वापर सुरू केला आहे. त्यातून श्रम, मजूरबळ व पैसे यांची बचत केली आहे.

शेतीतील मजूरबळ आता कमी झाले आहे. त्यामुळे मोठे क्षेत्रफळ असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कासली बुद्रुक (ता. जि. अकोला) येथील भरत काळमेघ यांची ९० एकर शेती आहे. त्यात बहुतांशी म्हणजे ९० एकर कपाशी असते. यंदा मूग १० एकर आहे. पूर्वी ते मजुरांकरवी कामे करून घेत. त्यांनाही मजुरांच्या उपलब्धतेत समस्या येऊ लागल्या. अशावेळी पर्याय शोधताना यांत्रिकीकरणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला.

यांत्रिकी शेतीचा मार्ग
काळमेघ यांच्याकडे १९९० पासून ट्रॅक्टरचा वापर होतो. आता तर तीन ट्रॅक्टर व दोन बैलजोड्या त्यांच्याकडे आहेत. आपल्या ९० एकरांतील शेती आणि त्यातही कापसासारखे पीक म्हटल्यावर पेरणी ते वेचणीपर्यंत असंख्य कामे करावी लागतात. त्यातही पेरणी, खते देणे, फवारणी यासाठी मजुरांची पावलोपावली गरज भासत राहते. हे लक्षात घेत त्यांनी ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राचा आधार घेतला. पीक मोठे झाल्यानंतर त्यात ट्रॅक्टरने मशागत करणे सोयीचे होत नाही. अशावेळी ट्रॅक्टरच्या चाकांची उंची वाढवून घेतली. गुजरातमधील व्यावसायिकांकडून गरजेनुसार लोखंडी फ्रेम, स्ट्रक्चर व यंत्रसामग्री घेतली. यामध्ये कल्टीव्हेटर आहे. मागे एका व्यक्तीस बसण्यासाठी खुर्चीप्रमाणे आसन व्यवस्था केली आहे.

या यंत्राद्वारे होणारी कामे
हा ट्रॅक्टर सुमारे तीन लाख रुपये किमतीचा असून त्याची क्षमता वीसएचपीच्या आत आहे. त्याला कृषी विभागाकडून अनुदान मिळाले आहे. त्याला जोडलेले यंत्र वखरणी करू शकते. फवारणी करू शकते. या यंत्राला बी पेरणीची पेटीही जोडता येते. अर्थात अशावेळी तो थोडा जड होतो. मात्र कपाशी पिकात वापरता येतो. फ्रेम, स्र्टक्चर व कल्हीवेटर असा मिळून ९० हजार रुपये त्याचा खर्च आहे.

बैलगाडीचलित फवारणी यंत्र
मोठ्या क्षेत्रातील पिकांत फवारणी करण्यासाठी काळमेघ यांनी आपल्या गरजेनुसार यंत्र बनवून घेतले आहे. त्यासाठी सुमारे ३५ हजार रुपये खर्च आला आहे. मूग, सोयाबीन, कापूस, हरभरा आदी पिकांत त्याचा वापर करता येतो. यामध्ये सुमारे २२५ लिटर पाणी क्षमता असलेला प्लॅस्टिकचा बॅरेल आहे. मागे लोखंडी वेल्डिंग केलेली फ्रेम व बूम आहे. त्याला दोन्ही बाजूस प्रत्येकी चार व मध्यभागी दोन असे १० नोझल्स लावले आहेत.

फवारणी यंत्राची कार्यक्षमता
बैलगाडी हाकणारी व्यक्ती हे यंत्र वापरण्यासाठी पुरेशी ठरते. यंत्राची उंची पिकाच्या वाढीनुसार ‘ॲॅडजेस्ट’ करता येते. एकाच वेळी १० तासांमधील पिकाची फवारणी होत असते. त्यामुळे कामालासुद्धा गती येते. हे यंत्र चालवण्यासाठी वाहनांचे वॉशिंग करण्यासाठी असलेला दीड एचपी क्षमतेचा इंजिन असलेला पंप बसविला आहे. पेट्रोलवर हे यंत्र चालविण्यात येते. दिवसभरात सहा ते सात तास फवारणी केली तर सुमारे अडीच ते तीन लिटर पेट्रोल लागते. दिवसभरात सुमारे १५ एकर फवारणी साधता येते, असे काळमेघ सांगतात.

आंतरमशागतीसह खत देणे शक्य
आंतरमशागतीसाठी वापरले जाणारे वखर, डवऱ्याला विशिष्ट प्रकारची रचना करून खत देण्याचीही सोय केली आहे. दोन पाइप्स व त्यावर बकेट बसवून वखराच्या दात्याशेजारी खत देण्याची सोय केली आहे. खत समप्रमाणात थेट पिकाला मिळते. एकाच वेळी आंतरमशागत होत असते तर दुसरीकडे खत देण्याचे काम सुरू राहते. खत दिल्यानंतर व्यवस्थितरीत्या मातीत ते झाकले जाते.

मजुरांवरील अवलंबित्व झाले कमी
पेरणी, आंतरमशागत, फवारणी ही कामे यंत्राच्या साह्याने होत असल्याने या कामांसाठी मजुरांची गरज ५० ते ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे काळमेघ सांगतात. फवारणीचे काम बैलगाडीवरील यंत्राद्वारे दोन व्यक्ती दिवसभरात १५ एकरांत करू शकतात. यासाठी दोन मजुरांची ५०० रुपये मजुरी, तीन लिटर पेट्रोल हा खर्च लागतो. पूर्वी २० एकरांत फवारणीसाठी १०० पंप लागायचे. प्रति पंप फवारणीसाठी ३० रुपये मजुरी द्यावी लागते. म्हणजेच ३००० रुपये मजुरी व्हायची. आता केवळ ७०० ते ८०० रुपये मजुरीत ही फवारणी सुरक्षित होते. बैलगाडीला उंच चाके बसविल्याने पिकातून ती सहज चालविता येते.

शेतकऱ्यांना मदतीसाठी केव्हाही सज्ज
शासनाकडून ट्रॅक्टर व काही यंत्रांसाठी पाठबळ मिळाले. आता काळानुरुप यंत्राची गरज व वापरही बदलला आहे. पेरणीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण कामे यंत्राद्वारे करताना स्थानिक गरजेनुसार यंत्रांत बदल करावा लागतो. शेतकऱ्यांना अशी यंत्रे घेण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन मिळाले तर फायदा होईल. मी व्यावसायिक म्हणून नव्हे तर माझ्या गरजेनुसार यंत्रे बनविली आहेत. शेतकऱ्यांना याबाबतीत कोणतीही मदत वा मार्गदर्शन हवे असल्यास मी नेहमीच सज्ज आहे, असे काळमेघ यांनी सांगितले.

काळमेघ यांच्या यांत्रिकी शेतीतील ठळक बाबी

  • खारपाणपट्ट्यात ट्रॅक्टर, बैलचलित यंत्रांचा वापर
  • गरजेनुसार कमी खर्चात यंत्रांमध्ये केले बदल
  • त्यातून मजुरांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत
  • कमी वेळात अधिक क्षेत्रात होते काम
  • पेरणी, खत देणे, फवारणीची कामे झाली सोपी
  • कपाशीचे उत्पादन कोरडवाहू स्थितीत- एकरी ८ ते १४ क्विंटलपर्यंत

भरत प्रभाकर काळमेघ- ९९२२५२२००६ 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
खासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या...पुणे  : देशातील दुग्ध व्यवसायाला चालना...
तब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवलेपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या...
शेतकरी म्हणतात...तोपर्यंत बँकांच्या...मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा उतारा...
बदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंबरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...
बियाणे कायद्यात होणार सुधारणापुणे : देशाचा जुनाट बियाणे कायदा बदलण्याच्या...
ढगाळ हवामानाचा अंदाजपुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची...पुणे  ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या...
घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दरनगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा...
जमिनीच्या आरोग्याबाबत ३५१ गावे होणार...पुणे  ः शेतकऱ्यांना जमीन आरोग्य तपासणीचे...
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले...कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण...
रुईच्या टक्‍केवारीवर ठरणार कापसाचा दर...वर्धा ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत...