मका, हरभरा वगळता सर्व पिकांच्या भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका व हरभरा वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील. सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला, तर ३.७ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९१६) मिळेल. गवार बीचे भाव जूनमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.८ टक्क्यांनी अधिक (रु. ४,३७६) मिळतील. कापसाचे भाव जुलै मध्ये ५.१ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,०००). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु.१,१७३ ते रु. १,१५०). या सप्ताहात त्या रु. १,१४८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२५० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१४० वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,४२५ आहे. वाढत्या उत्पादनाच्या व नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे. साखर साखरेच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात चढत होत्या (रु. २,९५२ ते रु. ३,३६१). या सप्ताहात त्या रु. ३,३६१ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,११७ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३६१ वर आल्या आहेत. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन : २५० लाख टन). साखरेचे भाव काही प्रमाणात चढण्याची शक्यता आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. ३,९९७ पर्यंत वाढल्या व नंतर त्या रु. ३,८०० च्या दरम्यान राहिल्या. गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी घसरून रु. ३,७९१ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ३.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,७७७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,९१६ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. आंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन जरी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असली, तरी या वर्षी ती वेळ येणार नाही. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनावर जाईल, असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). शासनाचे सोया पेंडीच्या निर्यातीला उत्तेजन देण्याचे धोरण आहे. आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर वाढवले आहे. आवक कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारीमध्ये घसरत होत्या (रु. ७,३५२ ते ६,५७८). या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,७६४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,८०० वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,९२८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र, पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल. गहू गव्हाच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या. ( रु. १,६०० ते रु. १,७७७). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. १,७७६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७२१ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७५५). एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४,८३१ ते रु. ४,२७६). या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,३११ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१८ मधील फ्युचर्स किमती १.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३७६). किमती घसरण्याचा संभव आहे. हरभरा फेब्रुवारी महिन्यात हरभरयाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. ३,७८९ वरून २० तारखेला ३,९८८८ पर्यंत वाढल्या; नंतर त्या घसरत महिना-अखेर रु. ३,६६५ पर्यंत आल्या. या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,६६२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,६९६ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७४०). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. २०,५९० वरून १९ तारखेला रु. १९,९३० पर्यंत घसरल्या; नंतर त्या पुन्हा रु. २०,९९० पर्यंत वाढल्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. २०,९३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,९७४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,०००). आंतरराष्ट्रीय मागणी कमी आहे. कपाशीचा एप्रिल २०१८ डिलीवरी भाव (एनसीडीइएक्स) प्रति २० किलोसाठी रु. ९४७ आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलो गाठ).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com