उत्तर भारतासाठी गव्हाची नवी जात ‘एचडी ३२२६’

गव्हाची नवी जात ‘एचडी ३२२६’ बागायती क्षेत्र आणि वेळेवर पेरणीसाठी उत्तर भारतासाठी प्रसारीत करण्यात आली आहे.
गव्हाची नवी जात ‘एचडी ३२२६’ बागायती क्षेत्र आणि वेळेवर पेरणीसाठी उत्तर भारतासाठी प्रसारीत करण्यात आली आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने ‘एचडी ३२२६’ ही गव्हाची नवी जात एप्रिल २०१९ मध्ये प्रसारित केली होती. या जातीच्या गव्हामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, अन्य वाणांच्या तुलनेमध्ये रोगांसाठी अधिक प्रतिकारक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकतेवर परिणाम होत असलेल्या उत्तर भारतासाठी - उत्तर पश्‍चिमी पठारी प्रदेश (पंजाब, हरियाना, दिल्ली, राजस्तान - कोटा आणि उदयपूर विभाग वगळता), पश्‍चिम उत्तर प्रदेश (झांसी वगळता), जम्मू आणि कथुआ जिल्हा, हिमाचल प्रदेशातील उना आणि पौन्ता खोरे, उत्तराखंड (तराई प्रदेश) येथील सिंचनाखालील बागयती क्षेत्र आणि वेळेवर पेरणीसाठी प्रसारित केले आहे. या वाणाला ‘पुसा यशस्वी’ या नावाने ओळखले जाते. वैशिष्ट्ये ः १) रोग प्रतिकारकता

  • पिवळा, तपकिरी आणि काळ्या करपा रोगांसाठी तीव्र प्रतिकारक.
  • भुरी, ओंब्या खराब होणे, गळून पडणे यासाठी प्रतिकारक.
  • २) उत्पादन ः सरासरी उत्पादन ५७.५ क्विंटल प्रति हेक्टर जनुकीय उत्पादन क्षमता ७९.६० क्विंटल प्रति हेक्टर. ३) दर्जा निकष ः

  • उच्च प्रथिनांचे प्रमाण १२.८ टक्के सरासरी. (अन्य जातींच्या HD२९६७ मध्ये १२.३ टक्के, तर HD३०८६ मध्ये ११.३ टक्के तुलनेमध्ये ते अधिक आहे.)
  • उच्च कोरडे आणि ओले ग्लुटेन
  • दाणे दिसण्यास आकर्षक
  • सरासरी जस्ताचे प्रमाण ३६.८ पीपीएम
  • या गव्हाचा ग्लुटेन १ निर्देशांक १० म्हणजेच आदर्श असून, ब्रेडच्या दर्जा सर्वाधिक (६.७) आणि ब्रेडच्या लादीचा आकार हा विविध उत्पादकांसाठी योग्य आहे.
  • व्यवस्थापन वैशिष्ट्ये ः

  • सिंचित क्षेत्रामध्ये वेळेवर पेरणीसाठी शिफारस.
  • बियाणे प्रमाण (किलो प्रति हेक्टर) ः १००
  • पेरणीचा कालावधी ५ ते २५ नोव्हेंबर
  • खताचे प्रमाण (किलो प्रति हेक्टर) ः नायट्रोजन १५० (युरिया @२५५ किलो / हे); स्फुरद ८० (डीएपी @ १७५ किलो /हे), पालाश ६० (एमओपी @ १०० किलो / हे.)
  • खते देण्याची वेळ ः १/३ नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळी द्यावे. उर्वरित विभागून पहिल्या आणि दुसऱ्या सिंचनावेळी द्यावे.
  • सिंचन ः पहिले सिंचन पेरणीनंतर २१ दिवसांनी आणि त्यानंतर पुढील सिंचन आवश्यकतेनुसार.
  • अधिक उत्पादकतेसाठी ः या गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात करावी.
  • नव्या गहू जातींमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, त्यामुळे निर्यातीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्यासाठी इरी संस्थेने हरियाना आणि पंजाब येथील ४० खासगी बियाणे उत्पादकांची करार केला आहे. - राजबीर यादव, प्रमुख शास्त्रज्ञ, जनुकशास्त्र विभाग, आयएआरआय.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com