Agriculture success story in marathi ridge guard market updates of agriculture produce market committee pune | Agrowon

कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफा

संदीप नवले
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

गेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे सर्वच भाजीपाला व फळभाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते. याला दोडका पीकही अपवाद ठरले नाही. दोडक्याची आवक कमी असली तरी ग्राहकांची मागणी कायम आहे. दोडक्याला बऱ्यापैकी दर मिळत आहेत. त्यामुळे पावसातून वाचलेल्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

गेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे सर्वच भाजीपाला व फळभाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते. याला दोडका पीकही अपवाद ठरले नाही. दोडक्याची आवक कमी असली तरी ग्राहकांची मागणी कायम आहे. दोडक्याला बऱ्यापैकी दर मिळत आहेत. त्यामुळे पावसातून वाचलेल्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

पुणे जिल्ह्यासह फलटण, बारामती, मोहोळ, पंढरपूर, इंदापूर, राशीन आणि  टेंभुर्णी या भागात दोडक्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. परंतु यंदा झालेल्या पावसामुळे दोडक्याचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले. परिणामी बाजारातील आवक कमी झाली. आणि त्याचा परिणाम दरावर झाला.

दोडका लागवड क्षेत्र

दोडके पिकाला साधारणपणे कोरडे हवामान लागते, मात्र अति पाऊस व जास्त ऊन हानिकारक ठरते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, नगरमधील राशीन, साताऱ्यातील फलटण, सोलापुरातील मोहोळ, पंढरपूर या भागात अनेक शेतकरी दोडक्याचे उत्पादन घेतात. तर डिसेंबर ते मार्च या कालावधीत कोकणातील रायगड, पनवेल भागातील शेतकरी दोडक्याचे उत्पादन घेतात. साधारणपणे लागवड केल्यानंतर दीड महिन्यानंतर उत्पादन सुरू होते. पाच ते सहा तोडे होतात. एकरी जवळपास ८ ते १० टन उत्पादन होते. 

पुण्यातील मार्केटमध्ये येथून होते आवक 

  • चांगला दर मिळत असल्याने डिसेंबरमध्ये रायगड, पनवेल भागातील व्यापारी व शेतकरी पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये दोडक्याची विक्री करतात. 
  •  जिल्ह्याच्या पूर्व भागात दौड, इंदापूर, बारामती हे मार्केट जवळ असल्याने अनेक शेतकरी येथेच व्यापाऱ्यांना विक्री करतात. हे व्यापारी दोडका परराज्यात तसेच पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतात. 
  •  पावसाळ्यातील जून ते आॅक्टोबर या महिन्यात इंदापूर, राशीन, मोहोळ, पंढरपूर, उजनी परिसरातून मोठी आवक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यास मदत होते.  

या कालावधीत असतो कमी दर

जूनमध्ये बहुतांशी शेतकरी दोडका पिकाची लागवड करतात. त्यामुळे जुलै, आॅक्टोबरमध्ये उत्पादन सुरू होते आणि एकाच वेळी माल विक्रीसाठी बाजारात येतो. या कालावधीत गुलटेकडी मार्केटमध्ये सुमारे २ ते ३ हजार तर रविवारी ५ ते ६ हजार कॅरेटची आवक होते. त्यामुळे जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या कालावधीत दोडक्याचे दर कमी असतात. किलोला ३० ते ४० रु. दर मिळतो. काही वेळेस त्याहून कमी दर मिळतात. यंदा पहिल्यादाच नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये सरासरी २ हजार कॅरेटची आवक होत असल्याने बऱ्यापैकी चांगले दर मिळाले. सध्या किलोला सरासरी २५ ते ३० रु. दर मिळत आहे.        

दर महिन्याला होणारी उलाढाल 

पुणे मार्केटमध्ये दोडक्याला वर्षभर प्रति किलोसाठी सरासरी २० ते ३० रु. दर मिळतो. हंगामात उत्पादन अधिक झाल्यानंतर मार्केटमध्ये आवक जास्त होते. त्या वेळी कमी दर असले तरी उलाढाल कमी अधिक प्रमाणात असते. हंगामातील जुलै ते डिसेंबर या कालावधीत महिन्यात २० ते २५ लाख रुपयांच्या दरम्यान उलाढाल होते. तर डिसेंबर ते मार्च या कालावधीत ५ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान उलाढाल होते.  

वढू बु. (ता. शिरूर) येथील अनिल भंडारे म्हणाले की, `मी गेल्या चार ते पाच वर्षापासून ऊस पिकाऐवजी वेलवर्गीय पिकाची आॅगस्ट ते सप्टेंबर आणि मार्चमध्ये अशा दोन वेळेस लागवड करतो. साधारणपणे चार महिन्याचे पीक असल्याने दोन महिन्यानंतर उत्पादन सुरू होते. त्यासाठी शेतात मांडव, ठिबक सिंचन याशिवाय प्लॅस्टिक मल्चिंगचाही वापर करतो. गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खताचा वापर कमी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे खर्चातही बचत होते. मांडवाचा वापर केल्यामुळे रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी काही प्रमाणात फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. जीवामृत व गोमूत्राचा वापर शिफारशीनूसार केला जातो. एकरी ८ ते दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते. गावापासून पुणे शहर जवळ असल्याने या शहरांच्या जवळच मालाची विक्री करतो. परिसरातील चंदननगर, मोशी, कोरेगाव भीमा या ठिकाणी विक्री केली जाते. त्यामुळे ग्राहकांना थेट जागेवर ताजा माल मिळतो. ३०-४० रु. किलो दराने विक्री केली जाते. जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत लागवड केल्यामुळे चांगला दर मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे. 

व्यापारी प्रतिक्रिया 

`पुणे मार्केटमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक भागातून दोडका येतो. साधारणपणे रोज दोन ते तीन हजार कॅरेटची आवक होते. हंगामात मोठ्या प्रमाणात आवक होते. ग्राहकांची चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असले तरी हंगामात आवक वाढल्यानंतर दर कमी होतात.`  

अजित नवले, व्यापारी, ९८९०८६३१३१

`मार्केटमध्ये तीन प्रकारचा दोडका विक्रीसाठी येतो. यामध्ये नागा एफ वन या दोडक्याला ग्राहकांकडून अधिक मागणी असल्याने दरही चांगले मिळतात. हिवाळ्यात रायगड, पनवेल भागातून दोडका विक्रीसाठी येतो. त्यामुळे या काळात अधिक दर मिळतात.` 

धनेश्‍वर बबन आखाडे, व्यापारी

 जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत दोडक्याला चांगली मागणी असते. त्यामुळे दररोज दोडक्याची विक्री करतो. त्यामुळे किलोमागे पाच ते दहा रुपये मिळतात.    

महेंद्र कुमावत, किरकोळ विक्रेते

 सर्वाधिक दर मिळणारा कालावधी 

कालावधी आवक सरासरी दर, प्रति किलो (रु.)
जुलै ते आॅक्टोबर सर्वाधिक आवक १५  ते २५ 
आॅक्टोबर ते डिसेंबर कमी आवक २०-३० 
डिसेंबर ते मार्च सर्वात कमी आवक ३०-६०

दोडका पिकातून मागील पाच वर्षांत झालेली उलाढाल  (स्रोत - गुलटेकडी बाजार समिती, पुणे) 

वर्ष झालेली आवक (क्विंटल) सरासरी दर (रु.) झालेली उलाढाल (रु.) 
२०१४-१५ १७,३२० ३००० ५ कोटी १९ लाख ६० हजार 
२०१५-१६ २०,६५२ ३००० ६ कोटी १९ लाख ५६ हजार
२०१६-१७ ३२,७८२ २९०० ९ कोटी ८३ लाख ४६ हजार
२०१७-१८ ४२,१५० ३२०० १५ कोटी १७ लाख ४० हजार
२०१८-१९ ४९,३३३ ३००० १७ कोटी २६ लाख ६५ हजार

 वैशिष्ट्यानूसार दोडक्याचे प्रकार

दोडक्याची वैशिष्ट्ये  सरासरी दर प्रति किलो (रु.)
लांबीला मोठा, चमक जास्त, चवीला बरा, तोडे कमी असतात, मागणी जास्त, रोग किडीचा प्रादुर्भाव जास्त  ३०-३५ 
लांबी थोडी लहान, चवीला बऱ्यापैकी, चमक थोडी कमी अधिक असते, तोडे थोडे जास्त असतात, मागणी थोडी कमी, रोग किडीचा प्रादुर्भाव थोडा कमी २५-३०
लांबी कमी, चवीला चांगला, चमक कमी, आकार गोलाकार, मागणी सर्वात कमी असते, उत्पन्न जास्त, रोग किडीचा प्रादुर्भाव कमी २० -२५

  

 

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...
लाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...
शेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरणपुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून...
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यतापुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
पशुसंवर्धन विभागात ३० टक्‍के पदे रिक्‍तनागपूर : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुर्दशेसोबतच...
दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील...नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले...
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...