Agriculture success story in marathi strawberry grower farmer Mayur konde khed shivapur district pune | Agrowon

खेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी 

सोमवार, 20 जानेवारी 2020

खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या तरुणाने खासगी कंपन्यांमध्ये काम केले. मात्र तेथे मन न रमल्याने शेतीच करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित अडीच एकरांपैकी दहा गुंठ्यांत स्ट्रॉबेरीचा प्रयोग सुरू केला. उत्तम व्यवस्थापन, योग्य जातींची निवड, दर्जेदार फळ पिकवण्याचे प्रयत्न यातून दरवर्षी तीन टनांपर्यंत उत्पादन ते घेऊ लागले आहे. विक्री व्यवस्थेची जोड देत परिसरातील शेतकऱ्यांसाठी  या पीकबदलाचा आदर्श त्यांनी तयार केला आहे. 

खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या तरुणाने खासगी कंपन्यांमध्ये काम केले. मात्र तेथे मन न रमल्याने शेतीच करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित अडीच एकरांपैकी दहा गुंठ्यांत स्ट्रॉबेरीचा प्रयोग सुरू केला. उत्तम व्यवस्थापन, योग्य जातींची निवड, दर्जेदार फळ पिकवण्याचे प्रयत्न यातून दरवर्षी तीन टनांपर्यंत उत्पादन ते घेऊ लागले आहे. विक्री व्यवस्थेची जोड देत परिसरातील शेतकऱ्यांसाठी  या पीकबदलाचा आदर्श त्यांनी तयार केला आहे. 

स्ट्रॉबेरी म्हणजे महाबळेश्‍वर हे जणू समीकरणच झाले आहे. राज्यातील अन्य भागातील काही शेतकऱ्यांनीदेखील या पिकाचा प्रयोग यशस्वी केला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरात असणाऱ्या भोर या डोंगरी भागातील थंड हवामानाचा उपयोग करून स्ट्रॉबेरी उत्पादन घेण्याचा प्रयोग खेड शिवापूर येथील मयूर कोंडे या तरुणाने केला आहे. मयूर वाणिज्य शाखेचा द्विपदवीधर असून, शिक्षणानंतर त्याने विविध कंपन्यांमध्ये नोकरी केली. मात्र नोकरीत मन न रमल्याने वडिलांसोबत शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी घरच्या अडीच एकरांत पारंपरिक हंगामी पिके व्हायची. या पिकांना पर्याय देण्याचा विचार सुरू होता. दरम्यान, केळवडे येथील बापू कोंडे यांनी स्ट्रॉबेरी पिकाचा प्रयोग करण्याचा सल्ला दिला. केळवडे शिवारात काही शेतकरी या पिकात यशस्वी झाले होते. 
पूर्ण अभ्यासाअंती मयूर यांनी २०१४ मध्ये १० गुंठ्यांत स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचे ठरवले. 

स्ट्रॉबेरीची पहिली लागवड 

यापूर्वी गाव परिसरात स्ट्रॉबेरी घेण्याचा प्रयोग फारसा झालेला नव्हता. मयूर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र बापू कोंडे यांचे आणि परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा वापर करत प्रत्येकी साडेतीन फुटांच्या अंतरावर गादीवाफे केले. पहिल्यावर्षी १० गुंठ्यांवर स्वीट चार्ली या वाणांच्या रोपांची लागवड सप्टेंबरमध्ये केली. योग्य मार्गदर्शनातून पहिले पीक व्यवस्थित जमले. हवामानाचीही साथ मिळाली. साधारण ७५ हजार रुपयांच्या पुढे उत्पन्न मिळाले. आपल्या भागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेऊ शकतो, असा आत्मविश्‍वास आणि उत्साहही आला. 

पिकात तयार होतोय हातखंडा 

सन २०१४ च्या यशस्वी प्रयोगानंतर सलग तीन वर्षे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत दरवर्षी ५० हजारांपासून ते एक ८० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मयूर मिळवित गेले. गेल्या वर्षी दुचाकीचा अपघात झाला. सुमारे नऊ महिने काही हालचाल करता येत नसल्याने तो हंगाम चुकला. त्यातून सावरल्यानंतर यंदा पुन्हा लागवड केली असून पीक उत्तम स्थितीत आहे. आता काढणी सुरू होईल. 

मार्केटनुसार वाणात बदल 

आत्तापर्यंत स्वीट चार्ली व विंटर या वाणांची लागवड होती. महाबळेश्‍वर परिसरातून रोपे आणण्यात यायची. स्वीट चार्लीचे फळ नाजूक असून त्याची काढणी सकाळी १० वाजण्याच्या आतच करावी लागायची. फळाची साल फारच पातळ असल्याने हाताळणीही नाजूक करावी लागे. थोडी जरी जाड हाताने काढणी झाली तर फळाला हाताचे ठसे पडायचे. पनेटमध्ये पॅक केल्यावर फळांना पाणी सुटायचे. यामुळे नुकसान व्हायचे. बाजारपेठेत जाईपर्यंत फळे काळी पडायची. आता विंटर वाणाच्या जोडीला स्वीट सेन्सेशन या वाणाचीही लागवड केली आहे. विंटरचे फळ इथल्या हवामानाला अनुकूल आहे. तोडणी थोड लेट झाली तरी चालते. त्याच्या जोडीला वैविध्य हवे म्हणून स्वीट नेन्सेशनचा पर्याय निवडला आहे असे मयूर यांनी सांगितले. 

व्यवस्थापनातील बाबी 

थंडीच्या हंगामाचा फायदा स्‍ट्रॉबेरीला मिळण्यासाठी साधारण सप्टेंबरमध्ये लागवड केली जाते. 
त्यानंतर अडीच महिन्यांनी म्हणजेच डिसेंबरच्या सुमारास हंगाम सुरू होतो. तो मार्चअखेरपर्यंत असतो. रोपवाढीच्या अवस्थेत, फुलोरा, फळधारणा आणि फळफुगवण आदी विविध टप्प्यांमध्ये आठवड्यातून तीन वेळा अन्नद्रव्यांचा वापर होतो. गरजेवेळी कीडनाशके वापरण्यात येतात. साधारण दिवसाआड तोडणी सुरू होते. प्रतितोडणीला साधारण ५० किलो उत्पादन मिळते. 

उत्पादन व उत्पन्न 
साधारण चार महिन्यांच्या काळात दहा गुंठ्यांत तीन टनांच्या आसपास उत्पादन मिळते. 
साधारण दहा गुंठ्यांसाठी पाच हजार रोपे लागतात. विंटरच्या रोपांची किंमत पाच रुपये तर स्वीट सेन्सेशनची किंमत ९ रुपये आहे. सुमारे ४७ ते ४८ हजार रुपये खर्च रोपांवरच होतो. मल्चिंग पेपर, खते, फवारणी, पॅकिंग, बॉक्स पनेट असा एकूण खर्च साधारण दीड लाख रुपये येतो. हंगामाच्या सुरुवातीस किलोला ३०० ते २५० रुपये दर असतो. हंगामाच्या अखेरीस तो कमी होऊन 
१०० रुपयांपर्यंत राहतो. एकूण उत्पन्नातून सुमारे ४० टक्क्यांपर्यंत नफा होतो. 

विक्री व्यवस्थापन 
मयूर यांचा परिसर पुणे- बंगळूर महामार्गापासून नजीक आहे. साहजिकच टोल नाक्याजवळ 
फळे विक्री करणाऱ्यांना स्ट्रॉबेरी दिली जाते. हे विक्रेते थेट बागेत येऊन खरेदी करत असल्याने ते किफायतशीर होते. फळे विक्रेत्यांनाही विक्री होते. सुमारे ६० टक्के उत्पादन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पाठविले जाते. या तीनही व्यवस्थेमध्ये १०० ते २५० ते ३०० रुपये प्रति किलो असा दर राहतो. साधारण २५० ग्रॅमचे पनेट असते. आठ पनेटचा एक बॉक्स असतो. 

मजूर समस्येवर मात 
दोन वर्षांपूर्वी मजूर उपलब्ध होत होते. मात्र परिसरात वाढलेले उद्योग, हॉटेल आणि मंगल कार्यालये यामुळे मजूर मिळणे मुश्‍किल झाले आहे. डिसेंबरमध्येच लग्न हंगाम असल्याने कामगार जेवण वाढपीच्या कामाला जातात. शिवाय जेवणाचीही सोय होते. त्याचा परिणाम शेतीतील मजूर उपलब्धतेवर होतो. यावर उपाय यामुळे मयूर, पत्नी, आई- वडील व लहान भाऊ असे सर्वजण शेतीत राबतात. त्यातून वेळेवर कामे होऊन ती पूर्णत्वाला जातात. 

संपर्क - मयूर कोंडे - ८३७८०२९४४६ 
 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...