Agriculture success story in marathi vegetable nursery of shrikisan nikas aurangabad | Agrowon

कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची नर्सरी

संतोष मुंढे
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे रहिवासी असेलेले श्रीकिसन भिकाजी निकस यांनी नर्सरीत केलेल्या नोकरीतील अनुभवातून औरंगाबाद शहरात स्वतःचा नर्सरी व्यवसाय सुरू केला. हंगामानुसार विविध पिकांची दर्जेदार रोपे तयार करण्यावर भर दिला. विविध भागांत रोपांची विक्री करून कुटुंबासह इतर अनेकांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यात श्रीकिसन निकस यशस्वी झाले आहेत. येत्या काळात गावाकडे असलेल्या शेतीतील अडीच एकर क्षेत्रावरही नर्सरी सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.

मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे रहिवासी असेलेले श्रीकिसन भिकाजी निकस यांनी नर्सरीत केलेल्या नोकरीतील अनुभवातून औरंगाबाद शहरात स्वतःचा नर्सरी व्यवसाय सुरू केला. हंगामानुसार विविध पिकांची दर्जेदार रोपे तयार करण्यावर भर दिला. विविध भागांत रोपांची विक्री करून कुटुंबासह इतर अनेकांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यात श्रीकिसन निकस यशस्वी झाले आहेत. येत्या काळात गावाकडे असलेल्या शेतीतील अडीच एकर क्षेत्रावरही नर्सरी सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्‍यातील सावत्रा गावचे श्रीकिसन भिकाजी निकस यांची वडिलोपार्जित जवळपास सहा एकर शेती. एका विहिरीमुळे हंगामी बागायतीची सोय. गावाकडची शेती वडील पाहायचे. श्रीकिसन यांनी दहावीनंतर २००२ मध्ये जळगाव जामोद येथून कृषी पदविका पूर्ण केली. कृषी पदविका घेतल्यानंतर त्यांनी थेट पुणे गाठूण तेथे एका नर्सरीत नौकरी सुरू केली. २००८ मध्ये त्यांचा विवाह झाला. दहा ते बारा वर्षांच्या नोकरीच्या काळात २०१५ पर्यंत त्यांनी मराठवाडा, विदर्भ आदी भागांत रोपांच्या मार्केटिंगचेही काम केले. अनेक वर्षांच्या अनुभवातून स्वत:ची नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला महिन्याला सव्वा लाख रोपांची निर्मिती केली जात होती. आता रोपांची संख्या १० ते १५ लाखांवर पोचली आहे.   

स्वतःची नर्सरी

श्रीकिसन यांचे भाऊ विजय हे औरंगाबाद येथे नोकरीला असल्यामुळे श्रीकिसन यांनी औरंगाबादमध्येच नर्सरी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमएसईबी सबस्टेशन जवळ एक एकर जागा वर्षभरासाठी भाड्याने घेतली. त्या ठिकाणी २०१६ मध्ये ‘महारुद्र हायटेक नर्सरी’ नावाने नर्सरी सुरू केली. मार्केटिंगमुळे संपर्कात आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना आपल्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या नर्सरीची माहिती दिली. नर्सरीतील अनुभवामुळे रोपांचा दर्जाही चांगला होता, त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक जोडण्यास मदत झाली. वर्षभराचा जागेचा करार संपल्यानंतर त्यांनी पुन्हा सातारा परिसरातीलच रेणुका माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर ३० गुंठे जागा पाच वर्षांच्या करारावर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी नर्सरी सुरू केली. 

रोपांच्या मागणीनुसार पुरवठा

एक ते सव्वा लाख रोपांची निर्मिती करण्यापासून सुरुवात करणाऱ्या श्रीकिसन निकस यांनी आजघडीला वाढलेल्या मागणीमुळे वार्षिक रोपनिर्मितीची क्षमता सरासरी १० ते १५ लाख रोपांपर्यंत पोचविली आहे. त्यांच्या रोपवाटिकेमध्ये वांगी, मिरची, कोबी फ्लॉवर, टोमॅटो, शेवगा, पपई, कलिंगड, खरबूज, झेंडू, पपई इ. पिकांच्या रोपांची निर्मिती होते. ज्या पिकाला भाव जास्त त्या पिकाच्या रोपांना जास्त मागणी असते. जानेवारीनंतर मिरचीच्या रोपांना जास्त मागणी असते. जवळपास आठ लाख रोपांची महिन्याला विक्री होत असल्याचे श्रीकिसन निकस सांगतात. गावाकडे असलेल्या शेतीतील अडीच एकर क्षेत्रावर नर्सरीचा विस्तार करण्याचा त्यांचा संकल्प आहे. येत्या पंधरवड्यात त्याचे काम सुरू होणार आहे, असे श्रीकीसन निकस सांगतात.

रोपांना विविध भागांतून मागणी

जास्त प्रमाणात रोपांची निर्मिती होत असल्यामुळे ग्राहकांना पाहिजे तेंव्हा रोपांचा पुरवठा केला जातो. स्वतःचे वाहन असल्यामुळे रोपांची घरपोच सेवा दिली जाते. औरंगाबादसह, बुलडाणा, अकोला, अमरावती, बीड, जळगाव, नाशिक, जालना, पालघर, नगर, पुणे आदी जिल्ह्यातून आपल्या रोपांना मागणी असते. 

कुटुंबातील प्रत्येकावर स्वतंत्र जबाबदारी

श्रीकिसन निकस यांचे एकत्र कुटुंब असल्यामुळे कुटुंबातल्या सगळ्यांनाच स्वतंत्र कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीकिसन आणि त्यांच्या पत्नी शोभा हे दोघे नर्सरीत विविध भाजीपाल्यांच्या रोपांची निर्मिती करण्याचे काम करतात. भाऊ श्रीकिसन व विजय यांचे वडील भिकाजी तुकाराम निकस हे रोप पोचविणाऱ्या वाहनासोबत जाऊन विकलेल्या रोपांची रक्‍कम व मागणी याची माहिती संकलित करतात. तर श्रीकिसन यांच्या आई गीताबाई भिकाजी निकस या मजुरांसह सर्वच कामांच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळत असल्याचे श्रीकिसन निकस सांगतात.

रोपनिर्मितीची वैशिष्ट्ये

 •    शेडनेटमध्ये रोपांची निर्मिती
 •    हंगामानुसार वाण निवड व रोपे निर्मितीवर भर
 •    निरोगी रोपांची निर्मिती करण्यावर कटाक्ष
 •    जादा रोपनिर्मितीमुळे शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हा रोपांचा पुरवठा
 •     दहा ते पंधरा लाख रोपांची निर्मिती
 •    वितरणासाठी स्वत:ची वाहन व्यवस्था
 •    विविध तालुक्‍यांतील दहा ते पंधरा प्रतिनिधींना अर्थार्जनाची संधी
 •    रोपे घेणाऱ्या शेतकऱ्यांना देतात संबंधित पिकाच्या व्यवस्थापनाचा चार्ट
 •    शेतकऱ्यांना वेळोवेळी संवादातून मार्गदर्शनावर भर
 •    कुटुंबातील प्रत्येकाकडे कामाची जबाबदारी
 •    पाच महिला व दोन पुरुषांना वर्षभर कायमस्वरूपी रोजगार
 •    कोकोपीटचा वापर 
 •    महिन्याला पाच किलोपर्यंत लागते विविध पिकाचे बियाणे.

दर्जेदार रोपनिर्मितीवर भर  
हंगामानुसार पिकाच्या वाणाची निवड केली जाते, त्यामुळे रोपांचा दर्जा चांगला राहतो. प्रो ट्रेमध्ये कोकोपिटमध्ये रोपांची निर्मिती केली जाते. रोपांची उगवण लवकर आणि चांगली होण्यासाठी बी रोवलेले प्रो ट्रे प्लॅस्टीक पेपर खाली ४ ते ५ दिवस झाकले जातात. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर केला जातो. 

संपर्क ः श्रीकिसन निकस ः ८४८२९९९९५१ 

 

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...
थंडी कायम राहण्याची शक्यता पुणे ः कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...