आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहील

महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४ हेप्टापास्कल तर पूर्वेस १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब आठवड्याच्या सुरवातीच्या काळात राहील. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण चांगले राहील. त्यात उत्तर महाराष्ट्र व विदर्भात थंडीचे प्रमाण अधिक राहील. संपूर्ण कोकणात थंडीचे प्रमाण चांगले राहील. त्यात उत्तर कोकणात थंडीचे प्रमाण अधिक तर दक्षिण कोकणात थंडीचे प्रमाण कमी राहील. थंडीचे प्रमाण रात्री व पहाटे अधिक राहील तसेच दुपारी ते मध्यम राहील. मात्र कडाक्‍याची थंडी सध्या तरी या आठवड्यात जाणवणार नाही. मात्र हवामान कोरडे राहील. संपूर्ण भारताचा विचार करता थंडीचे प्रमाण चांगले राहील. संपूर्ण उत्तरप्रदेश, दिल्ली, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मध्यप्रदेश, गुजरात या भागात थंडीची तिव्रता अधिक राहील. मात्र थंडीची लाट राहणार नाही.

संपूर्ण दक्षिण भारतातील महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू व केरळवर हवेचे दाब १०१४ हेप्टापास्कल राहण्यामुळे थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. म्हणजेच रात्री व पहाटे थंडी जाणवेल. मात्र दुपारी थंडी जाणवणार नाही. इशान्य भारतातही थंडीचे प्रमाण अधिक राहील. उत्तर भारतात हवेचे दाब अधिक राहतील तर दक्षिण भारतावर हवेचे दाब कमी राहण्यामुळे वाऱ्याची दिशा वायव्येकडून व इशान्येकडून दक्षिणेकडे राहण्यामुळे या आठवडाभर थंडीचे प्रमाण चांगले राहील. २० जानेवारी रोजी थंडीच्या प्रमाणात अल्पशी वाढ होईल. संपूर्ण भारतभर थंडीचे प्राबल्य राहील. त्यात पश्‍चिम उत्तर भागावर आणि इशान्य भारतावर अधिक राहील.

२१ जानेवारी रोजी विदर्भात व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण वाढेल. उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी राहील. संपूर्ण पश्‍चिम भारतात पश्‍चिम महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान भागात थंडीचे प्रमाण कमी होईल. मात्र इशान्य भारतावर व काश्‍मिरच्या पायथ्यास ते प्रमाण अधिक राहील. २२ जानेवारी रोजी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक भागांत थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. थंडीचे प्राबल्य कमी होईल. राजस्थान भागातही थंडी कमी होईल.

कोकण ठाणे व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस इतके अधिक राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. दक्षिण कोकणात आकाश अंशतः ढगाळ राहील. तर उत्तर कोकणात ते निरभ्र राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ टक्के राहील. तर रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ७६ ते ९४ टक्के इतकी सापेक्ष आर्द्रता राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३५ टक्के राहील. तसेच सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ती ५० ते ६२ टक्के इतकी अधिक राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. मराठवाडा बीड जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. लातूर, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तसेच उस्मानाबाद, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ टक्के राहील. तसेच लातूर जिल्ह्यात ती ७५ टक्के राहील व नांदेड जिल्ह्यात ५१ टक्के राहील. उर्वरित उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६९ टक्के राहील. जालना जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ टक्के राहील. उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३८ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. तसेच बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. वाशीम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील. उर्वरित बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ६५ टक्के व अकोला जिल्ह्यात ७० टक्के राहील. बुलढाणा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत ती ५० ते ५५ टक्के राहील. तर वाशीम जिल्ह्यात ४२ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील व वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. तसेच यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ६५ टक्के राहील, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के राहील. नागपूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ टक्के राहील. पूर्व विदर्भ पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. चंद्रपूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील तर गडचिरोली जिल्ह्यात ती ६२ टक्के राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील. भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ टक्के राहील. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. तसेच पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यात ते निरभ्र राहील. कृषी सल्ला

  • गव्हाच्या पिकाला वाढीच्या अवस्थेनुसार २० ते २१ दिवसांनी पाणी दिल्यास उत्पादन चांगले येते. हरभरा पिकास फुले येताना व घाटे भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • सुरु उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत करावी.
  • फळबागांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. खोडाभोवती आच्छादनांचा वापर करावा.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com