कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
अॅग्रो विशेष
चंद्रपूर पुन्हा ४५ अंशांपार
पुणे : सूर्य तळपू लागल्याने राज्यात तापमान चाळिशी पार गेले आहे. दुपारच्या वेळी वाढलेला उन्हाचा चटका आणि उकाडा नकोसा होत आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे तापमानाचा पारा पुन्हा ४५ अंशांपार जात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत (ता. १) विदर्भात उष्णतेची लाट तसेच उर्वरित राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वाढत्या उन्हामुळे सकाळी १० वाजल्यापासूनच अंंगाची काहिली होत असून, उकाड्यामुळे घामाच्या धारा वाढू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा वाढत असल्याने बाहेर पडणेही त्रासदायक ठरत आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, तर विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे गेले काही दिवस सातत्याने ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. राज्याच्या उर्वरित भागातही उन्हाचा वाढलेली ताप कायम आहे.
अंदमानात कमी दाब क्षेत्राचे संकेत
दक्षिण अंदमान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारी (ता. २९) दक्षिण अंदमान बेटांलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे अंदमान निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारपासून पश्चिम बंगाल, सिक्कीमसह ईशान्य भारतातील राज्यातही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शुक्रवारी (ता.२७) सकाळी साडेआठवाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३७.९, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४२.६, नाशिक ३७.६, सांगली ३९.५, सातारा ३९.१, सोलापूर ४१.६, मुंबई (सांतक्रूझ) ३५.६, अलिबाग ३१.४, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३३.१, आैरंगाबाद ३९.९, परभणी ४३.०, नांदेड ४३.०, अकोला ४३.६, अमरावती ४२.२, बुलडाणा ३८.५, ब्रह्मपुरी ४४.४, चंद्रपूर ४५.१, गोंदिया ४१.२, नागपूर ४३.३, वर्धा ४४.०, यवतमाळ ४३.०.
- 1 of 434
- ››