नगर जिल्ह्यात सव्वाबारा हजार हेक्टरवर कांदा लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात यंदा अजूनही पुरेसा पाऊस नसल्याचा परिणाम कांदा लागवडीवर झाल्याचे दिसत आहे. यंदा खरिपात आतापर्यंत केवळ १२ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. दरवर्षी खरिपात साधारण वीस ते पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होत असते. आता परतीचा पाऊस चांगला झाला तर कांद्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. 

नगरसह राज्यात सध्या कांद्याचा विषय चर्चिला जात आहे. कांद्याला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी यंदा अपुऱ्या पावसाचा परिणाम कांदा लागवडीवर झाला असल्याचे दिसत आहे. खरिपात साधारण वीस ते पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होत असते. यंदा अजूनही अनेक भागांत पाऊस नाही. चांगल्या पावसाची नोंद झालेली असली तरी पाणीसाठा झालेला नाही आणि अनेक शेतकरी शाश्वत पाणी उपलब्ध असल्याशिवाय कांदा लागवड करत नाही.

गेल्या वर्षी दुष्काळ होता. पावसाळ्याच्या सुरवातीला शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी रोपे टाकली, पण त्यानंतर पाऊस झाला नसल्याने ही रोपे वाया गेली. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी रोपेच टाकली नाहीत. त्याचाही कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यात तर कांद्याची लागवड झाली नाही असे कृषी विभागाच्या खरीप अंतिम आकडेवारीतून दिसते. विशेष म्हणजे ज्या भागात कांदा हे प्रमुख पीक आहे तेथील लागवडीची आकडेवारीही मोजकीच आहे. आतापर्यंत पुरेसा पाऊस नसला तरी परतीचा पाऊस चांगला पाऊस होईल अशी आशा आहे.    तालुकानिहाय कांदा लागवड झालेले क्षेत्र (हेक्टर) :  नगर- २,०००, पारनेर- १९३१, श्रीगोंदा- १५२२, कर्जत-२८१३, जामखेड-६१७, शेवगाव- ३५७, पाथर्डी- १३७५, नेवासा- २१, राहुरी- १५०, संगमनेर- १२४५, राहाता- २४४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com