कृषी विभागाकडून एचटी बीटीविरोधात चंद्रपुरात जागृती अभियान

एचटी बीटीविरोधात चंद्रपुरात जागृती अभियान
एचटी बीटीविरोधात चंद्रपुरात जागृती अभियान

चंद्रपूर ः जिल्ह्यात एचटी बीटीचा पेरा वाढू नये याकरिता कृषी विभागाकडून जागृतीवर भर दिला जात आहे. गेल्या हंगामात चंद्रपूरसह यवतमाळ जिल्ह्यात एचटी बीटीखालील क्षेत्रात वाढ झाली होती. त्याचे अनेक दुष्परिणाम झाले होते.  तणाला प्रतिकारक बीटी कपाशी वाणाच्या चाचण्यांना केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाही. रसुद्धा गेल्या हंगामात लगतच्या तेलंगणा, आंध प्रदेश, गुजरातमधून बीटी बियाण्यांचा अनधिकृत पुरवठा झाला होता. या बियाण्याची नंतर शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर लागवड केली. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पाहणीत हा धक्‍कादायक खुलासा झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर या हंगामात एचटी बीटीची लागवड होऊ नये याकरिता कृषी विभागाने कंबर कसली आहे. त्याकरीता एचटी बिटी बियाण्याविषयी माहिती मिळताच अशा ठिकाणांवर छापा टाकला जात आहे. जिल्ह्यात आजवर ६८ लाख रुपयांचे एचटी बिटी बियाणे जप्त करण्यात आले. या प्रकरणांमध्ये ९ जणांवर फौजदारी गुन्हे देखील दाखल झाले. या घडामोडीनंतर आता कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये देखील एचटी बियाण्यांच्या दुष्परिणामाची माहिती पोचवित त्यांना लागवडीपासून रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. २५ मे सात जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानातील कार्यशाळांमध्येदेखील एचटी बीटी बियाण्यांच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन केले जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या नेतृत्वात हे काम होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com