कोकणात जोरदार पावसाची शक्यता

मॉन्सूनने राज्य व्यापल्यानंतर राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे; तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.१६) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
heavy Rain prediction in konkan region
heavy Rain prediction in konkan region

पुणे : मॉन्सूनने राज्य व्यापल्यानंतर राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे; तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.१६) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज (ता.१६) पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, नाशिक, बीड, लातूर, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यातच शुक्रवारपर्यंत (ता.१९) बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्यास राज्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता  आहे.  धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) चार दिवसांतच संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे; तर जवळपास आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. डोंगरांचे झरे वाहू लागले असून, ओढे, नाले, नद्यांना पाणी आले आहे.  नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने गंगापूर, कश्यपी व आळंदी, गौतमी, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत  होत्या.  पावसाचा जोर कमी अधिक होत असल्याने सोमवारी (ता.१५) विसर्गही कमी करण्यात आला गौतमी गोदावरी धरणातून अवघा २० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण क्षेत्रातही पाऊस असल्याने ११०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. नगर जिल्ह्याच्या मुळा खोऱ्यात असलेले आंबित धरण यंदा २० दिवस आधीच भरून ओसंडून वाहिले. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाला सुरुवात झाली  आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या आहेत. तर मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : मोखेडा ३७, पालघर ७०, माणगाव ६१, मुरूड ३८, चिपळूण ३२, लांजा ५७, राजापूर ३५, रत्नागिरी ३९, कणकवली ८२, सावंतवाडी ४७. मध्य महाराष्ट्र : पाथर्डी ४०, गगणबावडा ५५, महाबळेश्वर ४७. मराठवाडा : सेनगाव ३३, धर्माबाद ३४, परभणी ३१. विदर्भ : चंद्रपूर ५४, नागपूर ३७, सेलू ३७. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com