agricuture news in marathi, Increase the cost of soybean harvesting, threshing, transportation, varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात सोयाबीन सोंगणी, मळणी, वाहतूक खर्चात वाढ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

आमच्या भागात सोयाबीन सोंगणीचा दर एकरी २२०० रुपये मागितला जात अाहे. यामध्ये मजूर सोंगणी करून सुडी लावून देतील. त्यानंतर इतर वेगवेगळे खर्च सोयाबीन घरात येईपर्यंत करावे लागणार अाहेत. महागाईची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत अाहे.      
- निंबाजी लखाडे पाटील, खुदनापूर, ता. मेहकर जि. बुलडाणा.

अकोला  ः सोयाबीनचा हंगाम लवकरच सुरू होत आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने त्याचा परिणाम या वेळी उत्पादनावर होण्याची शक्यता अाहे. असे असतानाच सोयाबीन काढणी, मळणी, वाहतूक अशा सर्वच खर्चात यावर्षी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याचा अर्थिक ताण सहन करावा लागणार अाहे.

या हंगामात लागवड झालेले सोयाबीन बहुतांश ठिकाणी काढणीला अाले अाहे. शेतकरी मजुरांची जुळवाजुळव करीत अाहे. या हंगामात सोयाबीन सोंगणीचा दर एकरी दोन हजार ते २२०० रुपये करण्यात अाली अाहे. सोंगणी व सुडी लावून देण्याचे काम एवढ्या पैशात मजूर करून देतील. यानंतर सोयाबीन मळणी ही या हंगामात १५० रुपये पोत्यापर्यंत करण्यात अाली. डिझेलचे दर वाढल्याने मळणीचा दर पोत्याला २० ते ५० रुपयांपर्यंत वाढविण्यात अाला अाहे.

या हंगामात वऱ्हाडात तीनही जिल्ह्यांचा विचार केल्यास आठ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन लागवड झाली अाहे. काही ठिकाणी सोयाबीन सोंगणीला सुरवात झाली. अागामी दसऱ्यापर्यंत हा हंगाम जोरात सुरू होणार अाहे. या वर्षी पावसात खंड पडल्याने बहुतांश ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन सुमारे ४० टक्क्यांपेक्षा अधिक घटण्याची चिन्हे अाहेत. एकरी पाच ते सात पोत्यांचा सरासरी उतारा मिळण्याची शक्यता शेतकरी वर्तवित अाहेत.

चांगला हंगाम राहिल्यास उत्पादन एकरी नऊ ते १२ क्विंटलपर्यंत राहते. यंदा त्यात घट शक्य अाहे. एकीकडे असे असताना उत्पादन खर्च मात्र वाढला अाहे. सोंगणीची मजुरी २०० ते ३०० रुपयांनी एकरी वाढली. मळणीचाही दरही थ्रेशर चालकांनी वाढविला अाहे. शिवाय मजुरांची समस्या असल्याने अधिक पैसे देऊन मजूर पळविण्याचे प्रकार होण्याची चिन्हे अाहेत. सध्या मजुरांची बुकींग केली जात अाहे. मजुरी देतानाच त्यांना शेतापर्यंत ने-अाण करण्यासाठी वाहनाचा वेगळा खर्चही काही भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागणार अाहे.
 

इतर ताज्या घडामोडी
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...