कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

हवामान
हवामान

पुणे: कोकण आणि मध्य महाराष्ट्र ते अमदाबाद यादरम्यान चक्रीकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती उत्तरेकडे सरकणार असून, माॅन्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजराच्या दक्षिण भागात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे.  सध्या ओडिशा आणि परिसर, छत्तीसगडचा उत्तर भाग आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ३.६ आणि ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या परिसर व गुजरातच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे येत्या रविवार (ता. २) पासून कोकणसह, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होईल.  गुरुवारी (ता. ३०) सकाळपर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे ७० मिलिमीटर, तर कुडाळ, मुलदे येथे ५० मिलिमीटर पाऊस पडला. तसेच कोयना, दावडी, शिरगाव, ताम्हिणी, अंबोणे, डुंगरवाडी या घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.  गुरुवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः कोकण ः कणकवली ७०, कुडाळ, मुलदे ५०, देवगड, सावंतवाडी, सुधागड, पाली ४०, राजापूर, वैभववाडी, वाल्पोई ३०, मालवण, मडगाव, संगमेश्वर देवरूख, वेंगुर्ला २०, दोडामार्ग, गुहागर, लांजा, म्हापसा, म्हसळा, पोलादपूर, रत्नागिरी, ठाणे १०, मध्य महाराष्ट्र ः राधानगरी ४०, चंदगड, महाबळेश्वर ३०, एरंडोल, गगनबावडा, शाहूवाडी २०, आजरा, धरणगाव, गारगोटी, कागल, कोल्हापूर, मंगळवेढा, शहादा १० विदर्भ ः आमगाव, वर्धा ३०, अहिरी २०, एटापल्ली, गोंदिया, हिंगणा, सालेकसा, सेलू, तिरोरा १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com