लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !

लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !

लातूर बाजार समितीत सोमवारी (ता. २६) सोयाबीनच्या भावाने गगनभरारीच घेतली. या बाजारात कमाल भाव नऊ हजार १४२ रुपये प्रति क्विंटलला राहिला तर सर्वसाधारण भाव नऊ हजार रुपये राहिला आहे.

लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही महिन्यापासून सोयाबीनच्या भावात कमालीची वाढ होत आहे. काही महिने सात ते साडे सात हजार रुपये स्थिर राहिलेल्या भावाने गेल्या काही दिवसात मोठी उसळी घेतली आहे. यात सोमवारी (ता. २६) तर या भावाने गगनभरारीच घेतली. या बाजारात कमाल भाव नऊ हजार १४२ रुपये प्रति क्विंटलला राहिला तर सर्वसाधारण भाव नऊ हजार रुपये राहिला आहे. लातूर ही सोयाबीनची मोठी बाजारपेठ आहे. हंगाम सुरु असताना दररोज किमान पन्नास हजार क्विंटलची आवक येथील आडत बाजारात राहते. या वर्षी हंगामाच्या सुरवातीला चार ते साडे चार हजार रुपये क्विंटलला भाव मिळाला. त्यानंतर मात्र सोयाबीनच्या भावात सातत्याने वाढ होत गेली आहे. काही महिने सात ते साडे सात हजार रुपये स्थिर भाव राहिला. त्यानंतर त्यातही वाढ होत गेली. सोमवारी (ता. २६) तर या भावाने गगनभरारी घेतली आहे. सोमवारी येथील आडत बाजारात सोयाबीनचा कमाल भाव नऊ हजार १४१ रुपये प्रति क्विंटला मिळाला आहे. किमान भाव सात हजार ८०० रुपये प्रति क्विंटल राहिला आहे. तर सर्वसाधारण भाव हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल राहिला. आतापर्यंत सोयाबीनला इतका भाव कधीच मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनच्या पेंडीला मागणी वाढली आहे. त्यात आवक मोठी नाही त्याचा परिणाम सोयाबीनचे भाव वाढत चालले आहेत. येत्या दोन तीन दिवसात आणखी साडे नऊ हजार रुपये प्रति क्विंटलला भाव जाईल असे व्य़ापाऱयांचे म्हणणे आहे. पण सध्या शेतकरयापेक्षा व्यापाऱयांचाच फायदा होताना दिसत आहे.

सोयाबीनची ११६ टक्के पेरणी क्षेत्र लातूर हा सोयाबीनचे आगार बनत आहे. या वर्षी तर सोयाबीनचा भावाने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे कॅश क्रॉप म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहत आहे. यातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी होताना दिसत आहे. या वर्षी तर खऱीपात सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र तीन लाख ९१ हजार २९२ हेक्टर आहे. आतापर्यंत चार लाख ५६ हजार ५९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी ११६ इतकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com