agriuculture news in marathi, Soyabean rate crosses nine thousand rupees per quintal in Latur | Page 3 ||| Agrowon

लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !

हरी तुगावकर
मंगळवार, 27 जुलै 2021

लातूर बाजार समितीत सोमवारी (ता. २६) सोयाबीनच्या भावाने गगनभरारीच घेतली. या बाजारात कमाल भाव नऊ हजार १४२ रुपये प्रति क्विंटलला राहिला तर सर्वसाधारण भाव नऊ हजार रुपये राहिला आहे.

लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही महिन्यापासून सोयाबीनच्या भावात कमालीची वाढ होत आहे. काही महिने सात ते साडे सात हजार रुपये स्थिर राहिलेल्या भावाने गेल्या काही दिवसात मोठी उसळी घेतली आहे. यात सोमवारी (ता. २६) तर या भावाने गगनभरारीच घेतली. या बाजारात कमाल भाव नऊ हजार १४२ रुपये प्रति क्विंटलला राहिला तर सर्वसाधारण भाव नऊ हजार रुपये राहिला आहे.

लातूर ही सोयाबीनची मोठी बाजारपेठ आहे. हंगाम सुरु असताना दररोज किमान पन्नास हजार क्विंटलची आवक येथील आडत बाजारात राहते. या वर्षी हंगामाच्या सुरवातीला चार ते साडे चार हजार रुपये क्विंटलला भाव मिळाला. त्यानंतर मात्र सोयाबीनच्या भावात सातत्याने वाढ होत गेली आहे. काही महिने सात ते साडे सात हजार रुपये स्थिर भाव राहिला. त्यानंतर त्यातही वाढ होत गेली. सोमवारी (ता. २६) तर या भावाने गगनभरारी घेतली आहे.

सोमवारी येथील आडत बाजारात सोयाबीनचा कमाल भाव नऊ हजार १४१ रुपये प्रति क्विंटला मिळाला आहे. किमान भाव सात हजार ८०० रुपये प्रति क्विंटल राहिला आहे. तर सर्वसाधारण भाव हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल राहिला. आतापर्यंत सोयाबीनला इतका भाव कधीच मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनच्या पेंडीला मागणी वाढली आहे. त्यात आवक मोठी नाही त्याचा परिणाम सोयाबीनचे भाव वाढत चालले आहेत. येत्या दोन तीन दिवसात आणखी साडे नऊ हजार रुपये प्रति क्विंटलला भाव जाईल असे व्य़ापाऱयांचे म्हणणे आहे. पण सध्या शेतकरयापेक्षा व्यापाऱयांचाच फायदा होताना दिसत आहे.

सोयाबीनची ११६ टक्के पेरणी क्षेत्र
लातूर हा सोयाबीनचे आगार बनत आहे. या वर्षी तर सोयाबीनचा भावाने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे कॅश क्रॉप म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहत आहे. यातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी होताना दिसत आहे. या वर्षी तर खऱीपात सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र तीन लाख ९१ हजार २९२ हेक्टर आहे. आतापर्यंत चार लाख ५६ हजार ५९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी ११६ इतकी आहे.


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...