जमिनी हडपल्याप्रकरणी आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण

काही शेतकऱ्यांच्या जमिनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आदिवासींना अंधारात ठेवून परस्पर विकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
Farmers
FarmersAgrowon

बुलडाणा : जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आदिवासींना अंधारात ठेवून परस्पर विकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

याविरुद्ध आदिवासी शेतकऱ्यांनी(Tribal farmers) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात केले जात आहे.हडपलेल्या जमिनी आदिवासी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात व दोषींवर कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेत शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आंदोलनास(Agitation) बसले आहेत.आदिवासींच्या(Tribal farmers) जमिनी हडपणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून हडपलेल्या जमिनी आदिवासींना परत द्या, गैर आदिवासी लोकांनी बनावट सातबारावर वेळोवेळी सोनाळा स्टेट बँक (State Bank) शाखेकडून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची वसुली करा.

Farmers
जांभूळ उंचावतेय आदिवासी शेतकऱ्यांचे अर्थकारण

आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील १९६६ नुसार कलम ३६ व ३६ अ हटविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, जमिनीच्या मूळ मालकाविना जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, बेकायदेशीरपणे जमिनीचे क्षेत्रफळ वाढवून रजिस्टर दस्तावेजाविना जमिनीची हेराफेरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. या उपोषणात ‘स्वाभिमानी’चे प्रशांत डिक्कर, पंचायत समिती माजी सदस्य अख्तर मोरे, दिलीप जयस्वाल, हम्मद केदार, फकिरा केदार, अमोल आगरकर, विशाल सांवत, सादिक डांगरे यांच्यासह बहुसंख्य आदिवासी शेतकरी (Tribal farmers) सहभागी झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com