agro agriculture nes marathi ; Washim District deprived of 'Prime Minister Kisan Samman' due to errors | Agrowon

वाशीम : त्रुट्यांमुळे ‘किसान सन्मान’च्या लाभापासून शेतकरी वंचित

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

वाशीम  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसल्याने गावागावात तक्रारी आहेत. असंख्य शेतकरी तलाठी, तहसील कार्यालयात चकरा मारून थकले आहेत. शेतकऱ्यांना लाभ का मिळाला नाही, याची कारणे शोधली असता आधारकार्डाशी संबंधित चुकांमुळे शेतकरी वंचित राहिल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठी आता मोहीम स्तरावर पुन्हा एकदा यंत्रणा काम करणार आहेत.

वाशीम  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसल्याने गावागावात तक्रारी आहेत. असंख्य शेतकरी तलाठी, तहसील कार्यालयात चकरा मारून थकले आहेत. शेतकऱ्यांना लाभ का मिळाला नाही, याची कारणे शोधली असता आधारकार्डाशी संबंधित चुकांमुळे शेतकरी वंचित राहिल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठी आता मोहीम स्तरावर पुन्हा एकदा यंत्रणा काम करणार आहेत.

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वाशीम जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार १०० एवढ्या शेतकरी कुटुंबांचा डाटा लाभार्थी म्हणून पाठविण्यात आला होता. एकट्या वाशीम जिल्हयात यापैकी ९७ हजार ५७१ लाभार्थ्यांच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: चुका आढळून आलेल्या आहेत. चुका राहिल्याने लाभार्थ्यांना मदत मिळालेली नाही.

या चुका दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. आधारकार्डशी संबंधित चुका दुरुस्त न झाल्यास आधार क्रमांकावर आधारित निधी हस्तांतरित करण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहे. अशा सर्व याद्या येत्या दोन दिवसात प्रत्येक गावात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थींची नावे या यादीत आहे त्या लाभार्थ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन आधारकार्ड व बचत खाते, पुस्तकांची छायांकित प्रत कॉमन सर्व्हिस सेंटरच्या केंद्र चालकाकडे देऊन आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे. सदर कार्यवाही पूर्ण करण्यासाठी वाशीम जिल्ह्यात ५ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान शेतकरी कुटुंबांनी आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे प्रशासनाने शेतकऱ्यांना दुरुस्ती करण्यासाठी आवाहन केले आहे.

वाशीम जिल्ह्यातील स्थिती

  •    जिल्ह्यात १४७१०० लाभार्थी
  •    ९७५७१ शेतकऱ्यांच्या माहितीत त्रुट्या
  •    गावागावात लावणार याद्या
  •    ५ डिसेंबरपर्यंत दुरुस्तीसाठी मुदत
  •    दुरुस्तीनंतर मोकळा होईल मदतीचा मार्ग
     

इतर अॅग्रोमनी
सोयाबीनमध्ये तेजी, मक्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने खरीप मका,...
थकीत खत अनुदान ३३ हजार कोटींवरखत उत्पादन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्थिती...कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
पपईला जागेवरच १८ रुपये प्रतिकिलो दरजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम सुरू झाला असून,...
गुजरातमधून मागणी मंदावल्याने गूळ दरांत...कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातला...
वाशीम : त्रुट्यांमुळे ‘किसान सन्मान’...वाशीम  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा...
हळद, गवार बीच्या फ्युचर्स किंमतीत घटया सप्ताहात हरभरा, गवार बी, हळद व गहू यांच्या...
नागपुरी संत्रा चीनच्या 'प्रोटोकॉल'...नागपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार...
संकेश्‍वरी मिरचीचा ‘ठसका’ यंदा गायबकोल्हापूर : गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने यंदा...
वायदा बाजारात सोयाबीन, कापसाच्या...या सप्ताहात खरीप मका, हळद, गवार बी यांच्यात घट...
कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार...नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा...
देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घटनवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला...
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...