आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
इव्हेंट्स
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी प्रदर्शन
पुणे : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा खजिना असणाऱ्या ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञानासह विविध विषयांवर मार्गदर्शन लाभणार आहे. हे प्रदर्शन औरंगाबाद येथील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे.
पुणे : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा खजिना असणाऱ्या ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञानासह विविध विषयांवर मार्गदर्शन लाभणार आहे. हे प्रदर्शन औरंगाबाद येथील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे.
कृषी प्रदर्शनासाठी पारस ग्रुप हे मुख्य प्रायोजक आहेत. महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ॲक्मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), पूर्वा केमटेक, गरवारे टेक्निकल फायबर्स आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) हे सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनामध्ये आधुनिक शेतीची तंत्रे प्रात्यक्षिकांसह सादर केली जाणार आहेत. प्रदर्शनात बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीमधील उपायांवर मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न ‘ॲग्रोवन’चा आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ, अभ्यासकांशी संवाद साधता येईल. विविध कंपन्यांची उत्पादने तसेच नवतंत्रांची ओळख देखील होणार आहे.
शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्डस्टोअर उद्योग, ठिबक व तुषार सिंचन, टिश्यूकल्चर, ग्रीन हाउस टेक्नॉलॉजी आणि इम्प्लिमेंट्स, कृषी साहित्य ग्रेडिंग, वेईंग, सॉर्टिंग अवजारे उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
मातीतील सेंद्रिय कर्बची मोफत तपासणी
शेतकऱ्यांच्या शेतातील मातीमधील सेंद्रिय कर्बची मोफत तपासणी सुजलाम क्रॉप केअरकडून करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती प्रदर्शन बघायला येताना घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मधमाशी पालनाचे भव्य दालन
पूर्वा केमटेकद्वारे प्रदर्शनामध्ये मधमाशी पालनाचे भव्य दालन उभारण्यात येणार आहे. या दालनामध्ये मधमाशीपालनाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार असून, या ठिकाणी विविध पेट्यांची मांडणी शेतकऱ्यांना पर्वणी ठरणार आहे.
प्रवेश निःशुल्क, बक्षिसे जिंकण्याची संधी
सकाळ - ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीतून दररोज ड्रॉ काढण्यात येणार असून, यातून शेतकऱ्यांना रोहित ॲग्रोद्वारे पेरणी यंत्र, ॲण्डसलाईटद्वारे बॅटरी, लोकनेते इंजिनिअरिंगकडून नांगर जिंकण्याची संधी आहे.
चर्चासत्रांचे नियोजन असे
शनिवार, ता. २८ डिसेंबर
- विषय - गटशेतीतून समृद्धी
- वक्ते - डॉ. बी. एम. कापसे, फळबाग, गटशेती तज्ज्ञ
- वेळ - सकाळी ११ ते २
- विषय - शेतमाल प्रक्रिया उद्योगाची उभारणी
- वक्ते - गीताराम कदम (न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे)
- वेळ - दुपारी ३ ते ५
रविवार, ता. २९ डिसेंबर
- विषय - नैसर्गिक शेतीचे अनुभव
- वक्ते - सुभाष शर्मा (यवतमाळ)
- वेळ - सकाळी ११ ते २
- विषय - मधमाशीपालन ः एक पूरक उद्योग
- वक्ते - नानासाहेब इंगळे (देऊळगाव सिद्धी, जि.नगर)
- वेळ - दुपारी ३ ते ५
सोमवार, ता. ३० डिसेंबर
- विषय - पीकपद्धती बदलातून किफायतशीर शेती
- वक्ते - उदय देवळाणकर (कृषी विभाग, औरंगाबाद)
- वेळ - सकाळी ११ ते २
- 1 of 5
- ››