agro agriculture news marathi ; Arrested for gang stealing orange fruit in the garden | Agrowon

बागेतील संत्रा फळे चोरणाऱ्या टोळीस अटक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अमरावती  ः बागेतील संत्रा फळांची चोरी करून शेतकऱ्यांना जेरीस आणणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीकडून दोन मालवाहू वाहनांसह संत्र्याचा ११ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. साठ क्रेटमध्ये या दोन्ही वाहनांत संत्रा फळे ठेवण्यात आली होती. 

अमरावती  ः बागेतील संत्रा फळांची चोरी करून शेतकऱ्यांना जेरीस आणणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीकडून दोन मालवाहू वाहनांसह संत्र्याचा ११ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. साठ क्रेटमध्ये या दोन्ही वाहनांत संत्रा फळे ठेवण्यात आली होती. 

जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतीमालाच्या चोरीत वाढ झाली होती. सोयाबीन, कापूस, विहिरीवरील कृषिपंप, केबल यांसह बागेतील संत्रा, मोसंबीची देखील चोरी होत होती. पोलिस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी याची गांभीर्याने दखल घेत चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांचे एक पथक नाकाबंदी व रात्रगस्तीकामी तैनात करण्यात आले होते.

दरम्यान पोलिसांनी आसेगाव पूर्णा हद्दीतील दर्यापूर फाट्यावर एका संशयीत चारचाकी वाहन (क्र.एम.एच.१६ वाय ८२३१) तपासणी करण्यासाठी थांबविले. चालकाची चौकशी केली असता त्यात संत्रा फळे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आली. अमरावतीला विक्रीकामी संत्रा नेत असल्याचे चालकाने सांगीतले. मात्र संत्रा कोठून आणला याबाबत त्याला सांगता आले नाही. त्यामुळे संशय बळावलेल्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. त्या वेळी समरसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून संत्रा फळे चोरल्याची बाब समोर आली. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनात देखील चोरीची संत्री असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वाहन (क्र.एम.एच.३१ सीएन-४८८६) थांबवून त्याची पण चौकशी केली.

याप्रकरणी टोळीच्या प्रमुखासह तब्बल ९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात शाह मोहम्मद शाह, सलीम शाह अयुब शाह, इमरान खान किफायत खान, कलीम शाह अयुब शाह, वारीस बेग जब्बार बेग, फारुक अली सादीक अली, शेख हाफीज शेख हारुण, शेख हारुण शेख मुनाफ, इरफान शाह मोहम्मद शाह, अशी अरोपींची नावे आहेत. अपर पोलिस अधीक्षक श्‍याम घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील किनगे, नरेंद्र पेंदोर, मुलचंद भांबूरकर, पोलिस हवालदार सुनील तिडके, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, संदीप लेकुरवाळे, चेतन दुबे, निलेश तेलगोटे यांनी ही कारवाई केली. 


इतर बातम्या
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...