औरंगाबाद वाटाणा १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद वाटाणा १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल
औरंगाबाद वाटाणा १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी ( ता. २८) वाटाण्याची १४३ क्विंटल आवक झाली. या वाटण्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १००० ते १३०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. ११९ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर चारशे ते ६५० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. ७९२ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला १३०० ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सात क्विंटल आवक झालेल्या वांगी चे दर पाचशे ते सहाशे रुपये प्रतिक्विंटल राहिले. गव्हाची आवक चार क्विंटल दर दर २५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १७ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला ० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. वाल शेंगांची आवक सात क्विंटल दर दर ५०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल दर राहिले. २३ क्विंटल आवक झालेल्या मकाला ६०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. काकडीची आवक बावन्न क्विंटल तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १४ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला ५००  ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. कारल्याची आवक १६ क्विंटल तर दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १६ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पत्ता कोबीची आवक ९५ क्विंटल तर दर ५०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. ८७ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवर ला आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक तीस क्विंटल तर दर सातशे ते एक हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६८ क्विंटल आवक झालेल्या गाजरला १५०० ती २००० रुपये प्रतिक्विंटल चे दर मिळाले.   मेथीची ३५००० जुड्यांची आवक झाली असून दर पन्नास ते शंभर रुपये प्रति शेकडा राहिले. पंचवीस हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला ४० ते ९० रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाला. कोथंबीरची आवक ४२ हजार जुड्यांची झाली. या कोथिंबीर ला ३० ते ११० रुपये प्रति शेकडा चा दर मिळाला.३५ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर २२०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. डाळिंबाची आवक ११० क्विंटल तर दर २५० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. सात क्विंटल आवक झालेल्या अंजिराला २८०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. पेरूची आवक ४४ क्विंटल तर दर सातशे ते एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com