agro agriculture news marathi ; Black tide breaks government procurement | Agrowon

काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

अमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी हमीभाव केंद्र मंजूर करण्यात आले. आत्तापर्यंत ११६ ज्वारी उत्पादकांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणीही केली. परंतु, पावसामुळे काळवंडलेली ज्वारी या केंद्रावर घेतली जात नसल्याने त्याबाबत शासनाने वेगळे धोरण जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

अमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी हमीभाव केंद्र मंजूर करण्यात आले. आत्तापर्यंत ११६ ज्वारी उत्पादकांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणीही केली. परंतु, पावसामुळे काळवंडलेली ज्वारी या केंद्रावर घेतली जात नसल्याने त्याबाबत शासनाने वेगळे धोरण जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

अचलपूर तालुक्‍यात ज्वारी लागवड क्षेत्र असल्याने त्याच्या खरेदीसाठी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून हमीभाव केंद्राची मागणी होत होती. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत तहसीलदार मदन जाधव यांनी हे केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली. त्यानंतर ज्वारी उत्पादक ११६ शेतकऱ्यांनी नोंदणी देखील केली. परंतु, मॉन्सूनोत्तर पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीच्या विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. त्यामुळे प्रशासनाने देखील अचलपूर खरेदी विक्री संघाला तूर्तास खरेदी सुरू न करण्यास सांगितले आहे. पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची ज्वारी काळसर झाली आहे. शासनाने काळ्या ज्वारीबाबत नव्याने आदेश काढावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अचलपूर तालुक्‍यात खरिपामध्ये ६ हजार ८६५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ज्वारीखालील सर्वाधिक क्षेत्र अचलपूर तालुक्‍यातच आहे. त्यामुळे या भागात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र तहसीलदार मदन जाधव यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, या केंद्रावर केवळ एफएक्‍यु दर्जाचा मालच घेण्याचे शासन आदेश आहेत. केंद्रावर शेतकऱ्यांनी काळवंडलेली ज्वारी आणल्यास त्याचा नाहक त्रास त्यांना होईल. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...