अमरावतीत  बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांनी काढली कपाशी
अमरावतीत बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांनी काढली कपाशी

अमरावतीत बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांनी काढली कपाशी

अमरावती  ः मॉन्सूनोत्तर पाऊस, त्यानंतर अवकाळी पाऊस आणि आता बोंड अळीचा प्रादुर्भाव कापसावर झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बोंड अळीचे नियंत्रण शक्‍य नसल्याची जाणीव झालेल्या शेतकऱ्यांकडून पीकच काढून फेकले जात आहे.  दर्यापूर तालुक्‍यातील येवदा, पिंपळोद, उमरी, वडनेर गंगाई, राजखेड, वरुड कुलट, घोडचंदी शहीद, सांगळूद, तेलखेडा, कातखेडा शिवारात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सर्वाधिक झाला आहे. हा भाग खारपाणपट्टयात येतो. या भागात मूग, उडीद, कपाशी, तूर यांसारखी पीके घेतली जातात. संरक्षित सिंचनाचे सोयी शक्‍य नसल्याने पावसाच्या पाण्यावरच या भागातील शेतीचे भविष्य राहते. यावर्षी पाऊसमान चांगले झाले होते. पिकाची उत्पादकता चांगली राहील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यानंतर मॉन्सूनोत्तर पाऊस, आता अवकाळी पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून पुन्हा बोंड अळीचे संकट आल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. बोंड अळीचे नियंत्रण शक्‍य नसल्याची जाणीव झालेल्या येवदा येथील एकनाथ नामदेव बोरकर, संदीप चोरे, गजानन शिंगाडे, संदीप वडतकर, सावतराम कुरेकर, वरुड कुलट येथील जगदीश बगले, येरंडगाव येथील अमोल पूरी यांसह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशीचे पीक उपटून काढले आहे. यापूर्वी संततधार पावसामुळे धोक्‍यात आलेले कपाशीचे पीक वाचविण्यात शेतकरी यशस्वी ठरले होते. त्याच बळावर एकरी १५ ते २० क्‍विंटल कापूस उत्पादकतेची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, आता एक क्‍विंटलही कापूस न होता. शिवारातील पीकच काढून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वातावरणातील बदलाचा शिवारातील तूर पिकावरही दूरगामी परिणाम झाला आहे. तुरीला शेंगा धरल्या आहेत. त्यावर देखील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com