राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील कामांना ब्रेक
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील कामांना ब्रेक

अमरावती : ग्रामीण पेयजल योजनेतील कामांना ब्रेक

अमरावती  ः राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गंत २०१९-२० या आर्थिक वर्षातील सर्व कामांना ब्रेक लावण्यात आला आहे. तब्बल २५ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आल्याने या योजनांच्या पूर्णत्वावर जाण्यासंबंधीच आता साशंकता व्यक्‍त केली जात आहे.  महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम त्यांच्याव्दारे करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील २५ कोटी रुपयांच्या ग्रामीण पेयजल योजनांचाही त्यामध्ये समावेश आहे. केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या जलजीवन मिशनमधून ही कामे यापुढे केली जातील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. परंतु, त्याबाबत अद्याप कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे या योजना अंधातरी लटकल्या आहेत. सर्व नवीन योजनांना प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया तसेच वर्कऑर्डर थांबविण्याचे पत्र राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले आहे. केंद्र सरकारने भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नवे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पाणी वाचवा अन् घरघर पोचवा’, अशा पद्धतीच्या या योजनेसाठी ३ लाख ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या अभियानाअंतर्गंत स्वच्छता अभियान नावाप्रमाणे जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात या योजनांचा समावेश करण्यात येईल. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ज्या योजना ७५ ते १०० टक्‍के पूर्ण होणार आहेत; त्यांचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पेजयल अभियानांतर्गत २०१९-२० या वर्षात कृती आराखड्यात मंजूर असलेल्या सर्व नवीन योजनांच्या प्रक्रिया तात्पुरत्या थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखड्यात प्रस्तावित केलेल्या २११ योजनांपैकी १०२ कामे मंजूर केली आहेत. ९६ कामांचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी, १०२ कामांना शासन आदेशाप्रमाणे स्थगिती देण्यात आली आहे. सुमारे २५ कोटी रुपयांची ही कामे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com