agro agriculture news marathi ; A camp of seven revenue records in Attapadi | Agrowon

आटपाडीत सातबारा नोंदीचे महसूलने भरवले शिबिर

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 डिसेंबर 2019

आटपाडी, जि. सांगली  ः‘सातबाराशी संबंधित नोंदी रखडल्या’ या दैनिक ‘ॲग्रोवन’मधील बातमीची महसूल विभागाने गंभीर दखल घेऊन विविध प्रकारच्या नोंदी सुलभ आणि गतीने एकाच छताखाली करण्याच्या दृष्टीने तहसीलमध्ये आठ दिवसांचे शिबिर चालू केले. याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, शेतकऱ्यांनीही रखडलेल्या नोंदणी करून घ्याव्यात, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केली आहे. 

आटपाडी, जि. सांगली  ः‘सातबाराशी संबंधित नोंदी रखडल्या’ या दैनिक ‘ॲग्रोवन’मधील बातमीची महसूल विभागाने गंभीर दखल घेऊन विविध प्रकारच्या नोंदी सुलभ आणि गतीने एकाच छताखाली करण्याच्या दृष्टीने तहसीलमध्ये आठ दिवसांचे शिबिर चालू केले. याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, शेतकऱ्यांनीही रखडलेल्या नोंदणी करून घ्याव्यात, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केली आहे. 

चार दिवसांपूर्वी आटपाडी तालुक्‍यात एका एका तलाठ्याकडे सहा-सहा गावचा कारभार असल्यामुळे सातबारा संबंधीची शेतकऱ्यांची अनेक दिवसापासून कामे-नोंदी रखडल्या असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. सातबारा ऑनलाइन करताना अनेक चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्तीसाठी शेतकरी अनेक दिवसांपासून हेलपाटे मारत आहे. तसेच वारस नोंदी, बॅंकांचा बोजा नोंद करणे, बोजा कमी करणे, अ.पा. नोंद करणे-कमी करणे, खरेदी-विक्रीच्या नोंदी, विविध प्रकारचे आदेशाच्या नोंदी प्रलंबित आहेत. त्या निकालात काढण्यासाठी महसूल विभागाने नोव्हेंबर २८ ते डिसेंबर ७ पर्यंत विशेष शिबिर भरवले आहे.

एकाच ठिकाणी सारे एकत्र आणले आहेत. विधानसभा निवडणूक आणि अतिवृष्टीमुळे महसूल विभागाच्या नोंदी प्रलंबित राहिल्या होत्या. शिबिराला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  मात्र शिबिरात सहीसाठी अनेक वेळा दुसरीकडे पाठवले जाते. काही प्रस्ताव तहसीलदारांच्या टेबलवर दोन दिवसांपासून सहीच्या प्रतीक्षेत आहे. शिबिरातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांची कामे सुलभ आणी गतीने करावीत, अशी मागणी आहे. 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...