भंडारा जिल्ह्यात धानाच्या भेसळयुक्‍त बियाण्यांची तक्रार

भंडारा जिल्ह्यात धानाच्या भेसळयुक्‍त बियाण्यांची तक्रार
भंडारा जिल्ह्यात धानाच्या भेसळयुक्‍त बियाण्यांची तक्रार

भंडारा  ः शेतकरी उत्पादक कंपनीव्दारे विकण्यात आलेले धानाचे बियाणे भेसळयुक्‍त व बोगस निघाले. परिणामी, यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, कृषी विभागाकडे तक्रारीतून केली आहे.  धानाच्या मळणीला जिल्ह्यात वेग आला आहे. कोंढा येथील किरण पंढरी जीभकाटे, संजय कावळे, नागेश शेंडे, कृष्णा जीभकाटे या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेले बियाणे भेसळयुक्‍त निघाल्याने त्यांना उत्पादनात मोठा फटका बसला आहे. १२५ दिवसांची उगवण क्षमता असलेल्या बियाण्याला १५० कालावधी परिपक्‍वतेसाठी लागला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीव्दारा याकरिता बीजोत्पान कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर कृषी सेवा केंद्रातून या बियाण्याची विक्री करण्यात आली. त्यामुळे उत्पादन प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या येत्या काळात वाढीस लागण्याची भीती वर्तविली जात आहे.  शेतकऱ्यांनी १८ ऑक्‍टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्याची दखल घेत कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. उपविभागीय कृषी अधिकारी, पवनी तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, पंचायत समितीचे अधिकारी तसेच विक्रेता प्रतिनिधी या वेळी उपस्थितीत होते. या वेळी शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन देण्यात आले होते. शेतकरी उत्पादक कंपनीला तशा सूचनाही देण्यात आल्या. परंतु, शेतकरी उत्पादक कंपनीकडून भरपाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप आहे. शेतकरी उत्पादक कंपनीने भात बियाणे हैदराबाद विद्यापीठाचे वाण असून त्याचा केवळ बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामुळे कंपनी नुकसानभरपाईस जबाबदार नसल्याचे सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com