agro agriculture news marathi ; Cotton prices remain stable in Khandesh; Speed ​​shopping | Agrowon

खानदेशात कापूस दर स्थिर; खेडा खरेदीला वेग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला. 

जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला. 

खानदेशात पणन महासंघासह भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदीदेखील सुरू आहे. सीसीआयने सुमारे ६० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. तर पणन महासंघातर्फेदेखील सुमारे पाच हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. सीसीआयचे जळगाव, भुसावळ, जामनेर, शेंदूर्णी (ता. जामनेर), पाचोरा, शहादा (ता. नंदुरबार), शिरपूर (जि. धुळे) तर महासंघाचे केंद्र भडगाव, धरणगाव, अमळनेर व मालेगाव (जि. नाशिक) येथे सुरू आहेत. सीसीआय व महासंघाच्या केंद्रात १२ टक्‍क्‍यांच्या आर्द्रतेच्या कापसाला ५२०० रुपयांवर दर मिळत आहे. तर १५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आर्द्रतेच्या कापसाला पाच हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. या केंद्रात शेतकरी व किरकोळ व्यापारी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. शासकीय खरेदी वेगात सुरू असल्याने खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर मागील १० दिवसांपासून स्थिर आहेत.
 
१८ टक्के किंवा अधिक अधिक आर्द्रतेच्या कापसाला खानदेशात खेडा खरेदीत किमान ४५०० तर १२ टक्के आर्द्रता व चांगल्या दर्जाच्या (शुभ्र, मऊ) कापसाला ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. एकाच शेतकऱ्याकडे ६० ते७० क्विंटल कापूस असल्यास त्यांना खेडा खरेदीत ५१०० रुपयांचा दर मिळत आहे. तर १० ते २० क्विंटल कापूस विक्रीसंबंधी खेडा खरेदीमध्ये ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीदार देत आहेत. 

खानदेशात सुमारे ८५ जिनींग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये खरेदी सुरू असून, काही कारखानदार कापसाची खेडा खरेदी एजंटच्या माध्यमातून करून घेत आहेत. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार भागात गुजरात, मध्य प्रदेशातील जिनींग प्रेसिंग कारखानदारांचे एजंट कापसाची खरेदी करीत आहेत. मागील १० ते १५ दिवसांपासून वातावरण बऱ्यापैकी कोरडे व निरभ्र राहील्याने शेतात कापसाचा दर्जा चांगला आहे. त्याची वेचणी सुरू आहे. या दर्जेदार कापसालादेखील चांगले दर खेडा खरेदीत पुढे मिळू शकतात.

जिनींग प्रेसिंग कारखान्यांप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी (उंटावद होळ, ता. शहादा) व धुळे तालुक्‍यातील जवाहर सहकारी सूतगिरणीतही कापसाची खरेदी सुरू आहे. या गिरण्यांमध्येही कापसाची आवक बऱ्यापैकी झाली आहे. खरेदी सुरू असल्याने दरांवर फारसा दबाव दिसत नसल्याचे सांगण्यात आले.  
 


इतर बातम्या
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
खानदेशातून थंडी गायबजळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
परभणी जिल्ह्यात रब्बीत २४.०६ टक्के...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...