agro agriculture news marathi ; Crop survey excludes cotton in Morsi taluka | Agrowon

मोर्शी तालुक्‍यातील कपाशीला वगळले पीक सर्वेक्षणातून !

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश स्पष्ट असतानासुद्धा मोर्शी तालुक्‍यात चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे  कापूस उत्पादक भरपाईपासून वंचित राहण्याची भीती वर्तविली जात आहे. विमा लाभसुद्धा  या शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या या धोरणाविषयी तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. 

अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश स्पष्ट असतानासुद्धा मोर्शी तालुक्‍यात चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे  कापूस उत्पादक भरपाईपासून वंचित राहण्याची भीती वर्तविली जात आहे. विमा लाभसुद्धा  या शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या या धोरणाविषयी तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत संत्रा, कपाशीचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याने शेतकरी आधीच विवंचनेत आहेत. त्यात १८ ते २८ ऑक्‍टोंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या सर्वेक्षणाचे स्पष्ट आदेश शासन परिपत्रकात होते. तरीदेखील मोश्री तालुक्‍यातील खरीप पिकांचे पंचनामे करताना कपाशीला वगळण्यात आले. कपाशीला वगळून फक्‍त सोयाबीन व ज्वारीच्या पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे कापूस उतपादक शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून; तसेच विमाभरपाईपासून वंचित राहणार आहेत.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या व तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांनी संयुक्‍तरीत्या केलेल्या सर्वेक्षणात फक्‍त सोयाबीन व ज्वारी या दोनच पिकांचा समोवश होता; परंतु सर्वेक्षणाकरिता शासकीय कर्मचारी शेतावर गेले असता शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी काढणी, होऊन घरात पोचले होते. नेमके त्याचवेळेस शेतात उभ्या असलेल्या कपाशीच्या पिकाचे सर्वेक्षण न झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही. कृषी विभागाने केलेल्या प्रचंड जागृतीच्या परिणामी, शेतकऱ्यांनी कपाशीचा विमा काढला; परंतु नुकसान सर्वेक्षणातून कपाशीलाच वगळण्यात आल्याने कापूस उत्पादकांना विमाभरपाई मिळणार नसल्याचे सांगितले जाते. मोर्शीलगतच्या इतर तालुक्‍यातील सर्वेक्षणामध्ये सोयाबीन, ज्वारीसह कपाशीचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. 


इतर बातम्या
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...
नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
नगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...
नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...
आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
सिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...
साखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...