माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे नुकसान

माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे नुकसान
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे नुकसान

मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा येथील प्रयोगशील महिला शेतकरी गीताबाई राठोड यांच्या बोराच्या बागेत माकडांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद घालून नुकसान केले. तोडणीला आलेले बोर यामुळे खराब झाले.   निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करीत आहेत. या भागात संत्रा, लिंबू, पेरू, सीताफळ, बोर बागा वाढू लागल्या, असे असताना शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणामुळे कधी अवकाळी पावसाचा तर कधी अवर्षणाचा सामना करावा लागतो. कारखेडा येथील महिला शेतकरी गीता राठोड यांनी आपल्या एक एकरात ॲपल बोराची लागवड केलेली आहे. बोरांच्या या चारशे झाडांपैकी बोरांनी लगडलेल्या आणि तोडणीस आलेल्या जवळपास शंभर झाडांची दोन दिवस आधी माकडांनी मोडतोड केल्याचा प्रकार घडला. यामुळे महिला शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने झालेल्या नुकसानीची दखल घेण्याची मागणी या महिलेने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com