आसेगावपूर्णा येथे पकडली बनावट खतांची फॅक्‍टरी

आसेगावपूर्णा येथे पकडली बनावट खतांची फॅक्‍टरी
आसेगावपूर्णा येथे पकडली बनावट खतांची फॅक्‍टरी

अमरातवी  ः अमरावती- परतवाडा मार्गावरील आसेगावपूर्णा येथे एका घरातून बनावट खतांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. कृषी विभाग व पोलिस पथकाने ही कारवाई केली.  मध्य प्रदेशातील देवास येथील बालाजी फॉस्पेट या कंपनीतून निघालेल्या आणि आसेगाव हद्दीत पोचलेल्या ट्रक (क्र.एमपी.०९-एचजी-६९६२) या वाहनाची झडती घेण्यात आली. त्या वेळी ट्रकचालक कैलास उजवारे (वय ३५, रा. गुजरखेडी, जि. खंडवा, मध्य प्रदेश) याची चौकशी केली असता, त्याने आसेगावातच बनावट खतनिर्मितीचा कारखाना असल्याचे पोलिसांना सांगितले. ज्ञानपुरी गोस्वामी (रा. सनावत, मध्य प्रदेश) यांच्या मालकीचा असलेल्या या ट्रकमधूनच बनावट खतांची वाहतूक होत होती, असेही चौकशीत समोर आले.  ट्रक जप्तीनंतर आसेगाव पोलिसांनी तत्काळ कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण व निरीक्षक तसेच कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार गुणवत्ता निरीक्षक, नियंत्रकांनी आसेगावातील अमित ऊर्फ तुषार ढोरे यांच्या राहत्या घरी धाड टाकली. त्यांना तेथे हलक्‍या प्रतीचे सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार रासायनिक खत ईफको कंपनीच्या बॅगसारख्या छापलेल्या १०ः२६ः२६ या रासायनिक खताच्या बॅगमध्ये कमी दर्जाचे सुपर फॉस्फेट भरले जात असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. ही बनावट बॅग २०० रुपये तर १०ः२६ः२६ चे दर १३३५ रुपये प्रती बॅग आहे. खर्च वजा जाता एक हजार रुपये प्रतिबॅगमागे कमविण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे विभागीय गुण नियंत्रण व निरीक्षण अधिकारी अनंत मस्करे यांनी सांगितले. गुण नियंत्रण विभागाच्या वतीने उपलब्ध खतांचे नमुने घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळाहून सुपर फॉस्फेटच्या ४०० व १०ः२६ः२६ च्या रिकाम्या व भरलेल्या ३८६ थैल्या, तसेच पोते शिवणारी मशिन जप्त करण्यात आली.  कृषी विकास अधिकारी कुरबान तडवी, दादासाहेब पवार, चांदूर बाजार समितीचे कृषी अधिकारी नारायण आमझरे, तालुका कृषी अधिकारी योगेंद्र संगेकर यांनी ही कारवाई केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com