किसान सन्मान योजनेपासून चरणगावचे शेतकरी वंचित

किसान सन्मान योजनेपासून चरणगावचे शेतकरी वंचित
किसान सन्मान योजनेपासून चरणगावचे शेतकरी वंचित

विवरा, जि. अकोला ः पातूर तालुक्यातील चरणगाव येथील दोनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अर्ज देऊनही ते पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या वंचितांना योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.  पातुर तालुक्यातील चरणगाव येथे ही योजना सुरू झाली असून यामध्ये काहींना लाभ मिळतो आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही. शासनाच्या लाभापासून कुणी वंचित राहू नये यासाठी निवेदन देण्यात आले आहे. या वेळी बाळू वसतकार, शैलेश देशमुख, श्रीकांत लाहोळे, संतोष वावगे, किसना इंगळे, माधव शेळके, मुरलीधर क्षीरसागर, कृष्णराव देशमुख, अरुण ताले, अमोल वसतकार, शुद्धमनी सोळंके, दशरथ खंडारे, रमेश बनचर, तुळशीराम पोरे, विजय शिंदे, गजानन मांजरे, योगेश शेळके, नागेश्वर  देशमुख आदीसह इतर शेतकरी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com